Recent Posts

तू नसताना..

Penulis : SpandanKavita on Wednesday, 25 October 2017 | October 25, 2017

Wednesday, 25 October 2017तू नसताना..

तुझ्यापर्यंत पोहचण्यासाठी कोणताच मार्ग नसतो ना तेव्हा....
फक्त डोळे बंद करुन तुला आठवत रहाते...
अन् मग जणू तुझ अस्तित्व अवतीभोवती वावरत असल्याचा भास मनास होतो. 
बघ ना....तू सोबत नसूनही, तु सोबत असण्याचा आंनद हे वेड मन निखळ,
 निर्वाजपणाने घेत असते ,तुझ्या वाटेकडे डोळे लावून... 
पुन्हा तुझ्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग शोधत.... 
पुन्हा दिसशिल...
पुन्हा कधीतरी भेटशिल..
याच आशेवर....अगदी चातकपक्षाप्रमाणे....!! 
स्पंदन@सोनाली कुलकर्णी


comments | | Read More...

अंगण मनाचं .../ Angan manach ..

Penulis : SpandanKavita on Tuesday, 24 October 2017 | October 24, 2017

Tuesday, 24 October 2017

अंगण मनाचं ...
मनाचं अंगण मोठ असत खरं ,
पण तिथे मनाचा खेळ सुरु झाला कि
भावना उफाळून येतात ,
मन अस्वस्थ व्हायला लागत.
कधी त्या वास्तवात घेऊन जातात,
तर कधी भुतकाळात डोकावतात,
तर कधी भविष्यकाळाची चिंता निर्माण करतात,
तर कधी सुखद आठवणीत घेऊन येतात ,
तर कधी दुःखाच्या लकेरी आठवू लागतात.
ह्या सुख-दुःखाच्या आठवणी अन अनेक विचारांचे महामेरू मनाच्या
अंगणात मनसोक्त कधी पिंगा घालू लागतात
हे आपल्यालाच कळतच नाही.
आपण मात्र फक्त जगत जातो तो येणारा प्रत्येक क्षण
कधी हळवं होऊन तर,कधी हसत तर कधी रडत.....जगण्याची आशा न सोडता....आपलं आयुष्य सुंदर करण्यासाठी ..अगदी खंबीरपणे.
स्पंदन@सोनाली कुलकर्णी
comments | | Read More...

ये लवकर वाट पहातीय......"पावसा"!!!

Penulis : SpandanKavita on Tuesday, 10 October 2017 | October 10, 2017

Tuesday, 10 October 2017

ये लवकर वाट पहातीय......"पावसा"!!! 

तुझ्या विरहाचे दिवस मोजता मोजता ,
अचानक तुझ्या येण्याचे वेध लागावे ..
अन् तुझ्या नुसत्या "मी येतोय" ह्या वाक्यांनी 
आकाशही ठेंगण वाटाव..
मग मनात असंख्य आपल्या ,
भेटीची चिञ रंगवायला सुरवात व्हावी..
त्या प्रत्येक भेटीतला तू कसा असशिल ,
हे आठवून गालातल्या गालात मीच हसाव..
आणि तू येताच मी माझ देहभान ,
हरवून तुझ्यात विरघळून जाव...
तुझ्यासोबत तन,मन  उल्हासित होऊन ,
तुझ्यात मनसोक्त चिंब भिजून जाव....
हो आता.. बास झालं ना...
आता उन्हाच्या रुपात होणारा,
तुझ्या विरहाचा छळ..
 ये लवकर वाट पहातीय......"पावसा"!!!
स्पंदन@सोनाली कुलकर्णी 

comments (1) | | Read More...

"पाऊस ,तू आणि मी" / Rain ,U & Me

"पाऊस ,तू आणि मी"

आज आभाळ खुप भरुन आलेलं ...
मनात वाटत होत...जोराचा पाऊस यावा..
तुझ्या बाईकवरुन तुला घट्ट पकडुन बसावं .... अन् तुझ्यासोबत चिंब पावसात भिजाव...!!

अशीच मी माझ्याच छान विचारात तल्लिन झाले
असताना..
तेवढयात तु मला विचारलंस...
"काय ग येतेस का माझ्या सोबत माझ्या बाईकवरुन.??" 
काय सांगु तुला ,हे सारे शब्द माझ्या कानावर पडताच किती मी सुखावून गेले .
कश्याचाही विचार न करता तुला " हो " पण म्हणाले.
अन् तुझ्यासोबत बाईकवरुन निघताच पावसाची सुरुवात झाली....
तू म्हणालास...पाऊस यायला लागलाय....थांबायचं का थोडावेळ??"

मी ....."नको,नको थांबायला" म्हणताच तूही किती गोड हसलास..आणि म्हणालास घट्ट पकडून बसं...नाहीतर पडशिल...
वाह....
"पाऊस ,तू आणि मी"
अगदी मलाही हेच हवं होत...

किती सगळं सुंदर वातावरण अगदी मनाला धुंद करणारं...!!
ह्या पहील्या पावसात तुझ्यासोबत भिजताना माझ्या ओठांवरची लाली जाण्याऐवजी अजूनच चढावी इतकी मी आंनदी झाले.... 
"जणु काही "पावसाला " आणि "तुला" माझ्या मनातलं सार काही कळाल असावं..... "
अगदी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी  जश्याच्या तश्या घडत होत्या.....

किती सगळं रोमँटिक .....चिंब चिंब भिजलेले आपण...गालावरुन ओघळणारे ते पावसाचे थेंब .... ओले झालेले कपडे....हवेतला वेडावून  टाकणारा तो गारवा आणि  तुझा अलगद झालेला स्पर्श.....सगळं कसं स्वप्नंवत होत....पण मी कशाचाही विचार न करता
मी माञ तुझ्यात वहावत होते...

खुपच खुश होते..फक्त तुझ्यामुळेच....!!!
तुझ्यासोबतचे आजचे सारे हे क्षण मनात माझ्या साजरे करत होते .
स्पंदन @ सोनाली कुलकर्णी
comments | | Read More...

प्रेम मुक्या जीवांच.....

प्रेम मुक्या जीवांच.....

बोलता येणारे सगळेच शब्दात प्रेम व्यक्त करतात....
पण आज मी माझ्या डोळ्यांनी सुखद अनुभवल...पाहील त्या दोन मुक्या जीवांच प्रेम....

मला नेहमीच वाटायचं प्रेम व्यक्त करायला शब्दांची गरज असते.....पण नाही अस काहीच नसत....प्रेमात व्यक्त होण्यासाठी बोलणं नाही तर मनाच्या खर्या प्रेमाच्या भावना महत्वाच्या असतात.....

त्या दोघांना मी अगदी कुतुहलपणे पहात होते...
जवळपास ते दोघ एकमेंकांशी सलग एक तास तरी नॉन स्टॉप बोलत होते...बोलणं म्हणजे त्याच्यां खाणाखुणा....खाणाखुणा करत होते...मध्येच हासत होते.

नजरेला नजर भिडवत लाजत होते...ती हळुच त्याच्या खांद्यावर डोक टेकवत होती...तो तिचा हात हातात घेत होता...त्याच्यांकडे पाहुन वाटल ...बापरे बोलता न येताही फक्त स्पर्श अनभवून,खाणाखुणा करुन केव्हडा हा रोमांन्स...!!


तो पर्यंत मी विचार करत होते ते एकंमेंकांना I love u कसे म्हणत असतील....??तितक्यातच....तीने हातवारे केलेले मी पाहिले

...तिने हाताची दोन बोटे त्याच्या डोळ्यांकडे दर्शवली.. ती त्याला सांगत होती माझ्या डोळ्यात बघ..तो खुप गोड हासला...तो तिच्या डोळ्यांत पहाताच, तिने स्वतःकडे बोट केल आणि नंतर त्याच्या कडे बोट दाखवून स्वतःचे दोन्ही हात घट्ट बंद केले...आणि नंतर फॉईग किस देऊन हवेत फुंकला...


मी तर पहातच राहीले....किती सहजपणे तीने स्वतःच्या खाणाखुणामधुन त्याला सांगितल 'माझ तुझ्यावर प्रेम आहे'

फक्त नजरेनेच जाणुन घेतल...'नजरेने नजरेला कळल..'


खरच ना..
नजरेतून दिसणारे अन् स्वर्शातून अनुभवणारे प्रेम....त्यातला अनोखा आंनद....एकदम सहीच...
प्रेमाला कोणत्याच परिभाषेचं बंधंन नसत ना??

मुक्यानेपण काळजाला भिडणारं, मनात कायमच घर होईल असे प्रेम व्यक्त करता येत ना...

स्पंदन@सोनाली कुलकर्णी .

comments | | Read More...

​स्वतःच अस्तित्व स्वतःच जपायला हव...

स्वतःच अस्तित्व स्वतःच जपायला हव... 


का कुणाचा सतत विचार करायचा ??
आपल स्वत: च असे काही अस्तित्व आहे कि नाही ...
कश्याला रहायचं सतत दुसर्यावर अवलंबून ??सतत कुणीतरी सोबत का लागत ? कश्यासाठी ??
का जगता नाही येत आपल्याला एकट्याला ??का काहीच करू शकत नाही आपण कुणाच्या मदतीशिवाय ,.?? का स्वताःचे निर्णय घेण्याची  क्षमता  आपल्यात नाही का? का लाऊन घ्यायच्या अश्या सवई ....??

अवलंबून रहाण्याची सवय खुप वेळा महागात पडते....लोग दगा फटका १०१% करतातच ....पण आपण त्यावेळी कितीही त्रागा केला तरी काहीही उपयोग नसतो.

आपण कस वागायचं ? हे आपण  स्वताः ठरवू शकतो  पण दुसरी पुढची व्यक्ती कशी वागणार किंवा तिने कस वागाव हे आपण नाही ठरवू शकत ....कारण
 "आपल्या स्वताःच्या मनाचा रिमोट कंट्रोल आपल्याच  हातात आहे,..इतरांचा नाही ."
आणि खर तर हे सगळ्यांनाच एक गोष्ट माहिती आहे आणि बोधकारक पण आहे.

"पक्षी झाडांच्या फांदीवर बसतात  तिथेच आपल घरपण बनवतात ते त्या फांदीवर अवलंबून असतात किंवा त्या फांदिवर विश्वास असतो म्हणून नाहीतर त्यांचा त्यांच्या पखांवर विश्वास असतो फांदी तुटली मोडली तरी नविन घर बनवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते त्यांना वाटेल  तेव्हा  ते उडु शकतात."
मग हे पक्ष्यांना कळु शकत तर आपल्यासारख्या माणंसाला का नाही कळत?
हे जमणं फारस शक्य वाटत नसलं तरी फारस अशक्यपण नाही.

Remember only  one thing : Believe in yourself and stop trying to convince others for increase dependecy.

स्पंदन@सोनाली कुलकर्णी
comments | | Read More...

Destiny -Story / प्रारब्ध (Story)

प्रारब्ध (Story)स्वरा आणि मयुरी एकाच इंटरनॅशनल  कंपनीमध्ये एकञ काम करत होत्या .स्वराच्या आग्रहाखातर मयुरी तिची रुम पहायला तिच्या रुमवर गेली होती.तसा दोघींना गप्पा मारायला एकांत मिळतच नसे, मयुरीला नेहमीच घरी जायची गडबड असायची.पण आज मयुरी छान गाणं गुणगुणत होती..


"तेरा मुझसे है पहले का नाता कोई        
यूँ ही नहीं दिल लुभाता कोई          
जाने तू या जाने ना, 
माने तू या माने ना"

पण ती गाण गुणगूणत अचानक रडू लागली...
स्वराला काहीच कळेना.
स्वराने विचारलही का रडतीय तर ती अजूनच रडायला लागली.इतक छान गाणं म्हणत होतीस आणि अचानक काय झाल तुला??
"प्लिज मयू,रडणं थांबव आधी आणि सांग काय झाल??"
मयुरी दिसायला सुंदर ,पण स्वभावाने अबोल होती.नेहमी शांत शांत असायची.स्वराची आणि तिची तशी अलीकडचीच ओळख त्यामुळे मयुरीबद्दल पर्सनल गोष्टी माहीत नव्हत्या.
पण मयुरीचे रडणे पाहून स्वराला खुप सारे प्रश्न पडले आणि त्या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी तिला बोलत करावच लागणार होत.
पुन्हा स्वराने विचारल..."मयू काय झालय...मनमोकळेपणाने बोल ग..जे मनात आहे ते सांगून टाक सगळ तुला मोकळ वाटेल ग."
मयुरीला ही कुणाला तरी सांगाव, खुप खुप रडावस वाटत होत आणि मयू व्यक्त व्हायला सुरु झाली..
 स्वरा ,प्रारब्ध काय असत ना ते जवळून अनुभलय ग मी...ते आपल्या हातात नसत मुळात कधी...आज काय उद्या,काय घडणारे कुणालाच नाही ग 
कळत कधी..
स्वराला मयू काय आणि कश्याबद्दल बोलतीय काहीच कळत नव्हत....
ती म्हणाली, अग मला कळेल असे सांग ना जरा...

हम्म...म्हणत मयू पुन्हा बोलू लागली...

मी आणि केतन ..कॉलेजपासूनचे मिञ.आमचं ऐकमेकांवर खुप प्रेम होत .कॉलेजमध्ये सगळे चिडवायचे पण घरी माहीत नव्हत...पण एक किस्सा असा घडला कि
आम्ही दोघ सिंहगडला फिरायला गेलेलो आणि येताना केतनची बाईक पंक्चर झाली अंधार पडायला आलेला,दोघांच्याही मोबाईल बॅटरीज डाऊन...घरी आईने काळजी करत सगळ्या आमच्या ग्रुपला फोन केले मग तिला कळाल केतनही नाहीये आणि आम्ही दोघ सोबत आहोत.कसे बसे करुन आम्हाला एक सभ्य माणूस भेटला अन् त्याच्या फोरव्हिलरमधून घरी परतलो.तोपर्यंत आमच प्रेमाच गुपित दोघांच्याही घरी कळालेल.आम्हाला तसा घरातून फारसा विरोध नाही झाला पण लगेच आमच लग्न ठरवून टाकल आणि साखरपुडाही  झाला.
स्वरा आश्चर्याने विचारली, " अग तुझा साखरपुडा झालाय आणि तू हे आज सांगतीयस मला
काय ग तू...किती छान गोष्ट असताना तू का आता रडतीयस...??"
मयूरीच्या डोळ्यातले पाणी येण काही थांबत नव्हते..
स्वरा,सगळच जर मनासारख घडल ,झाल तर ते नशिब कसल ग....??
साखरपुडा होऊन जेमतेम एक महीनाच झाला होता आता पुढच्या महीन्यात लग्न आणि केतन चा अक्सिडेंन्ट झाला.
एका मिञाच्या लग्नाला पनवेलला गेलेले...येताना बाईकला साईडने जाणार्या ट्रक ड्रायव्हरच नियंत्रण गेल आणि त्याला धडक दिली .केतन आणि त्याचा मिञ दोघही डिव्हाडरवळ जोरात आदळले.
दोघेही कोमात गेले.हेलमेट नसल्याने केतनला डोक्याला जबरदस्त मार लागला मरता मरता वाचला पण त्याला सगळ्याच जुन्या गोष्टी पुर्णपणे आठवत नाहीयेत.आठवल तरी पुन्हा विस्मरणात जातो.त्याच्या बाबांनाही ह्या धक्याने पॅरालेलीस अटॅक आला.आता घरी कमावणार कुणीच नाही.खर्च आजारपण ही खुप आहे.आई बिचार्या एकट्या पडल्या.आता 'माझा' तोच ते काय त्यानां आधार.
स्वरा खुप हळवी होऊन म्हणाली...अग मयु खुप वाइट झाल पण तुमच लग्न नाही ना झाल..मग सगळी जबाबदारी तू का एकटीवर घेतलीस??

स्वरा,अग लग्न होणारच होत...फक्त आमच प्रारब्ध आडव आल ग..
जे व्हायच होत ते घडून गेल पण....    अजूनही  केतनवर माझ खुप प्रेम आहे .आजही तो माझ्या स्पर्शाने नक्कीच सुखावत असेल.त्याच्या डोळ्यात पाहील की अजून तो माझाच केतन वाटतो.. म्हणूनच ते गाण म्हणताना मला रडायला आल गं.

लग्न झाल असते तर मी काय सोडुन गेले आसते का त्याला??मी त्याला माझ मानलंय.लग्न झाल नसल तरी मी त्याची मनाने बायकोच आहे .त्याच्यासाठी माझ्या घरच्याचा विरोध पत्करुन त्याच्यासोबत रहातीय .मला खाञी आहे आज ना उद्या सार काही ठिक होईल.

त्याला आज पुर्णपणे आठवत नाही पण तरीही तो मला 'मयू' म्हणून हाक मारतो...तू जाऊ नकोस म्हणतो...याचा अर्थ त्याला माझा सहवास आवडतो.त्याची मला वाटणारी काळजी आवडते.माझा आधार वाटतो.

आणि स्वरा कस असत ना...

" सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्यातर ते आयुष्य कसले.आयुष्य आपली परिक्षा घेत असते...आपण फक्त परिक्षार्थी बनून पुरेपुर परिक्षेला उतरायच.निर्णय परमेश्वराच्या हाती"
....बस...मी इतकाच विचार करुन पुढे,चाललीय .

चल "केतन माझी वाट पहात असेल ग"
मी निघते म्हणत चप्पल पायात घालती आणि म्हणाली
"तू नको जास्त विचार करुस स्वरा..."
आता अजून काय प्रारब्धात घडायच ते घडू दे ग.
त्याला आठवेल तेव्हा सगळे आठवू दे, मी त्याची वाट पाहीन माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत.
स्पंदन@सोनाली कुलकर्णी 
comments | | Read More...

आठवणींचे ढग ...

आठवणींचे ढग ... 


अंबरात दाटून येऊ लागले की चाहूल लागते ती बरसण्यार्या पावसाची....
अन् त्या चाहूलीनेच पिसारा फुलवून मोर नाचू लागतात....
तसच काहीस आजकाल माझपण होत......
तुझ्या आठवणींचे ढग मनात दाटून येतात आणि तुझ्या प्रेमाची बरसात सुरु होताच ,
मी तुझ्या गोड आठवणींमध्ये चिंब भिजून जाते...अन् मनोमनी माझ्या मनाचा पिसारा फुलू लागतो..
गोड गुलाबी गालावर हास्याच्या लहरी निर्माण होतात...अन आरश्यात पाहुन स्वःताला, माझी मीच लाजते.
क्षणभर तो आरसाही संभ्रमात पडतो माझ्या मनातलं गुपीत तो क्षणात ओळखतो
मी बेधुंद होऊनी दोन्ही हात बाजूला करुन आनंदाने गिरक्या घेत रहाते.
अन पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडते...तुझ्या आठवणींचे ढग
मनी दाटुन येतात ...
चिंब भिजता त्यात ,
मन माझे हर्षुनी जाते....
#स्पंदन @ सोनाली कुलकर्णी
comments | | Read More...
 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>