Recent Posts

आठवणींची गोधडी

Penulis : SpandanKavita on Wednesday, 29 November 2017 | November 29, 2017

Wednesday, 29 November 2017

तुझ्या आठवणींच्या ठिगळांची गोधडी बनवून मनाच्या गाभाऱ्यावर पसरली की तुझ्या विरहात कुडकूडणार मनही उबदार होत ...बघ!
@सोनाली कुलकर्णी
#तू_आणि_तुझ्याआठवणी, #winter_post

comments | | Read More...

गरज असते ती फक्त चार प्रेमाच्या शब्दांची

Penulis : SpandanKavita on Friday, 10 November 2017 | November 10, 2017

Friday, 10 November 2017

आयुष्यात आपण खुप काही मिळवतो ,कधी कधी गमवतोही, सुख असो वा दुःख असो प्रत्येकवेळा माणूस शोधात असतो ते आपल्या जवळच्या व्यक्तीच्या चार प्रेमाच्या शब्दांच्या.....
कारण तेच चार प्रेमाचे शब्द माणसाला उभारी देतात....नाराज मनाला उमेद देतात,खुप वेळा कोलमडलेल्या मनाला जगण्यासाठी नवीन बळ देतात....जगण्याची दिशा देतात....

माणूस भुकेला असतो तो फक्त आपलेपणाच्या ओलाव्यासाठी मग तो  हारलेला असो ,जिंकलेला असो,प्रेमात असो वा विरहात एकाकी....कुठूनतरी ऊब गरजेची असते ती फक्त चार प्रेमाच्या शब्दांचीच...

अश्याच अर्थाची हर्षलची( हर्षल नार्वेकर) खुप सुंदर चारोळी आहे...

प्रेमाचे चार शब्द, कधी कागदावर तर
कधी मनावर कोरले जातात...
कोलमडलेल्या मनाला जगण्याच
एक नव बळ देऊन जातात..!

स्पंदन@सोनाली कुलकर्णी

comments | | Read More...

आठवणं

Penulis : SpandanKavita on Tuesday, 7 November 2017 | November 07, 2017

Tuesday, 7 November 2017

जागा,ठिकाण,माणसं,परिस्तिथी,काळ,वेळ,दिवस .....
सगळं बदल तरी ,तुझी आठवण मनात तशीच तळ ठोकून आहे...

सार काही बदलतरी तू अजून तसाच ,
माझ्या मनाच्या गाभार्यात खोलवर रुजतोस....
पुन्हा, पुन्हा तुझ्याच प्रीतीच्या भोवऱ्यात,
आठवणींसोबत नव्या नवरीसारखा नांदतोस...
स्पंदन@सोनाली कुलकर्णी

comments | | Read More...
 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>