Home » , , , , , , , » कथा : जेव्हा नात गुदमरत..

कथा : जेव्हा नात गुदमरत..

Penulis : SpandanKavita on Thursday, 25 January 2018 | January 25, 2018
तो अन् ती दोघ एकमेंकाच्या प्रेमात हरवलेले..
तो तिची काळजी घ्यायचा.तिला हव तस वागायचा,तिची प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून करायचा...ती त्याच्या ह्या प्रेमळ ,गोड स्वभावामुळे त्याच्यात गुंततच गेली..स्वतःच अस्तित्वच हरवून बसली..स्वतःपेक्षाही त्याच्यावर जास्त प्रेम करु लागली
पण तिच्या ह्या अती प्रेमामुळे तो माञ कंटाळला..निशब्द होऊ लागला.
त्याने एक दिवस तिला सांगितल आता माझ तुझ्यावर प्रेम नाहीये....तिला समजेनासे झाले तिला आधि चेछ्टा वाटली...पण दिवसेंनदिवस त्याच्या वागण्यातला बदल तिला सहन होईना,..ती खुप रडायची पण तो परत बदलला नाही....
तो अस् वागण्यामागच तिला कारण ही सांगेना.....तो तिला म्हणे तू चांगलीच आहेस ...पण आपल्यात पूर्वीसारख काही नाहीये आणि हेच खर आहे..
तिला समजून चुकल...तिच काय चुकल ते....
हातातली वाळू हातात घट्ट पकडावी तर ती हातातून निसटून जातेच .फुलपाखरालाला मुठीत धरुन ठेवल तर ते गुदमरुन मरतच ना....तसच काहीस आपल्याही नात्याच झाल असाव....आपल्या अति प्रेमामुळे त्याचाही जिव गुदमरला असावा.....
अन् मग तिने ठरवलं......
नाही द्यायचा ञास त्याला कधिच....
आठवणीच गाठोड संभाळून ठेवायच अगदी शेवटच्या श्वासापर्यंत......
अन् ती शेवटचा निरोप घ्यायला त्याच्याजवळ गेली....पण त्याने तिला दूरुनच तिला पाहून रस्ता बदलला....तिचा क्षणभर श्वास गुदमरलाही पण...तिच अति प्रेम असणार्या व्यक्तीला ती नको होती कारण.....त्याला त्याच आयुष्य त्याच्या पद्धतीने जगायच होत...
तशी तर चुक कुणाचीच नाही पण.....
नियतीने ठरवलेला काळ दोघांनी मनमुराद एकमेंकासोबत जगला....होता..फक्त तो आता भूतकाळातात जमा झाला होता.
तिला तो नेहमी म्हणायचा....आपल्यात आपण कधीच एकमेंकाना bye नाही म्हणायच नेहमी 'परत भेटू'च म्हणायच....
पण आज तिला bye म्हणण्यासाठीही तो दिसला नाही....
तिला कळून चुकल 'नात्यातला ओलावा संपला की जबरदस्ती करुन कोणतच नात टिकत नाही..अन् एकतर्फी झाल कि ते नात निर्जिवच होत'
तिला त्याच्या विरहापेक्षाही स्वतःच्या त्याच्यावर केलेल्या अतीप्रेमाचा राग येत होता.
तिने त्याचा रस्ता सोडला...
अन् त्याच्या आयुष्यातून कायमच निघून जाण्याचा निर्णय घेतला.फक्त त्याच्या आंनदासाठी.
बोध : " अति तिथे मातीच " मग ते अती प्रेमाच्या बाबतीतही
प्रत्येकाला प्रत्येकाची space मिळायलाच हवी...नाहीतर ते नात गुदमरत आणि कालांतराने दुरावतही
Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>