कथा : चिरंतन प्रेम

Penulis : SpandanKavita on Thursday, 25 January 2018 | January 25, 2018मंदार आणि सानिका दोघ आज जवळपास तीन वर्षांनी एकमेंकाना समोर समोर दिसले .....पण सानिका मंदारला पाहून न पाहिल्यासारख करून तशीच पुढे निघून गेली....पण मंदारला राहावल नाही आणि त्याने सानिका म्हणून जोरात तिला आवाज दिला ...मंदारची हाक ऐकून सानिकाला पण राहवले नाही तिने लगेच पाठीमागे वळून पाहिलं कारण इतकी आर्त , जिव्हाळ्याची हाक बर्याच वर्षांनी तिने ऐकली होती....मंदारच्या “सानिका “ हाक मारण्याने तिचे डोळे पाण्याने भरले आणि ती त्याच्याजवळ गेली .
दोघांमध्ये हाय हल्लो झाल ..जणू काही अनोळखी लोकच भेटताय.....ओठावर शब्द आहेत पण ते बाहेर पडत नाहीत ....पण दोघांचे डोळे खूप काही एकमेनाकांशी बोलून जात होते.
मंदार तिला म्हणाला ..तू काहीच बोलणार नाहीस का ..??
सानिका म्हणाली ...अस काही नाही रे ,बोलतीय ना मी .
तो तिला पटकन म्हणाला ,खूप काही बदललय ना तीन वर्षात ..??
सानिका हासली आणि म्हणाली काय काय बदललय असे तुला वाटते...??मी तर आहे तशीच आहे ..अजून मी तीच आहे ....फक्त तुझ्या आठवणीना सोबती बनवून जगणारी .
तू US वरून कधी आलास....
मंदार तिच्याकडे पाहतच होता ..त्याचे डोळे फक्त तिलाच बघत होते .....तो बोलला last year मध्येच आलो ...प्रोजेक्ट सोडू शकत नव्हतो त्यामुळे तिकडेच रहाव लागल ....
पण मला वाटल तू मला सोडून गेलीस .....तू स्वत:हून माझ्याशी संपर्क तोडलास ..तू मला पूर्ण विसरली असशील तुझ लग्नही झाल असेल ...मी परत आल्यावर तुला खूप शोधल अगदी सोशल नेट्वर्किंग पासून ते तुझा बदलेला पत्ता तुझा नवीन contact number....काहीच नाही मिळाल, तू कुठेच मला नाही भेटलीस.
तूच सगळ तोडल्यावर मी काय करणार कुठे आणि किती शोदान्र तुला ..??पण माझ मन मला सांगायचं “तुझ तिच्यावर खरच खूप प्रेम आहे ..ती तुला एक दिवस नक्की भेटेल “
आणि आज बघ ना ...तू आज मला खरच भेटलीस .
सानिका त्याच्याकडे बघत फक्त “मंदार “ म्हणाली
काय सांगू तुला ..तू गेल्यावर इकडे माझ काय काय झाल ....आपण तसे लहानच होतो .मी तशी आईबाबावरच अवलंबून होते ....तेव्हा मज्जा मस्ती ,प्रेम करण खूप सोप होत रे .......पण तू US ला गेलास आणि माझे बाबा इकडे heart attack मध्ये गेले .माझ्यावर सगळी जबाबदारी पडली .
मी प्रेम करण्यात माझा वेळ घालवू शकत नव्हते माझ्यासाठी माझ्या आईची तब्बेत बहिणच शिक्षण याची जबाबदारी होती ...नोकरी शोधात मला बेंगलोर ला मिळाली मग आम्ही तिघीपण तिकडेच शिफ्ट झालो ...आईच्या आजारपणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत होता .....सगळ पेलणे अवघड होत ..मग मी माझा स्वताचा विचार करूच शकत नव्हते ...तुझी आठवण येत होती पण ...माझ्या प्रोबलेम्स मध्ये मला तुला अडकवायचं नव्हत ...मी जर तुझा आधार घेतला असता तर मी स्वताहून कधी माझ्या आईची बहिणीची जबाबदारी एकटीने घेऊ शकले नसते ..सतत तुझ्यावर अवलंबून राहिले असते ....म्हणून म्ह्नातल तू इतक्या लांबून काय आणि किती करणार तू माझ्यासाठी ??त्यापेक्षा ह्या सगळ्यापासून तुला दूरच ठेवावे ....आणि म्हणून मी सगळ स्वतहून बंद केला.....मला त्रास आजही होतोय त्या सगळ्याचा आणि तेव्ह्याहि होत होता..तुला लांब ठेवण माझ्यापासून म्हणजे खूप मोठी शिक्षाच होती माझी मला ..पण पर्याय नव्हता रे माझ्या समोर .
मागच्या महिन्यात बहिणीचे लग्न झाले ..मग म्हंटल आता परत पुण्याला यावे म्हणून इंटरव्हिव साठी आलेले आणि देवाने परत आज तुझी माझी भेट घडवून आणली .
मंदार शांत पाने सानिकाच बोलण ऐकत होता ....त्याने तिचा पटकन हात हातात घेतला आणि तिला म्हणाला काय बोलू या सगळ्यावर ..??तू किती मला परक केलस ..तुझ्यापासून मलाही लांब ठेवलस ..फक्त मला त्रास नको द्यायला आणि सगळा त्रास एकटी सहन करत बसलीस ..सगळ एकटीनेच भोगलस.हेच का तू मला ओळखलस ??
तस असत तर आजही मी तुझ्या वाटेकडेच डोळे लावून नसतो बसलो ....still i m unmarried and I love u more than myself. तू मला तेव्हाही हवी होतीस आणि आजही तूच हवी आहेस मला ...माझी “सानू “ पाहिजे मला .
आता बास झाल सगळ एकट्याने चालण....आता मला तुझ्यासोबत सप्तपदी घेऊन तुझ्या आयुष्याचा अविभ्याज घटक बनायचं .....”माझ तेच तुझ आणि तुझ तेच माझ “
आणि काळजी नको करूस तुझ्या आईसाठी आहेना मी तिचा मुलगा ....
सानिकाचे डोळे टच पाण्याने भरून आले आणि “मंदार “ म्हणत त्याला बिलगली....हो मला पण तू हवा आहेस....खूप आठवणी मध्ये मी दिवस काढले पण आता नाही .....तुला मी आता सोडून कधीच जाणार नाही.

Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>