Home » , , , , , , , , » कथा : खंत म्हातारपणाची

कथा : खंत म्हातारपणाची

Penulis : SpandanKavita on Thursday, 25 January 2018 | January 25, 2018
जोशी काका आणि कुलकर्णी काकू यांची जवळपास सारखीच परिस्तिथी सारखीच होती.
जोशीकाकू जाऊन एक वर्ष उलटून गेल होत त्यामुळे जोशीकाका त्यांच्या मुलासाबोत राहत होते.सून आणि मुलगा दोघही नौकरीला.घरी टीव्ही ,वाचन ,सोडलं तर तसा दुसरा विरंगुळा नाही.आणि मुलाला सुनेला त्यांना द्यायला अजिबात वेळ नाही मग कुठे तरी गुंतवायच म्हणून ते घरापासून जवळच असलेल्या दत्त मंदिरला फिरायला जात.
कुलकर्णी काकू पण एकट्याच त्याच्या मुलासोबत राहत होत्या ...मुला सुनेला वेळ नसल्यामुळे त्या पण एकट्याच . काश्याततरी गुंतवणे हाच त्यांचा रोजचा दिनक्रम अलीकडे त्यापण दत्त मंदिरला जायला लागल्यापासून त्यांचा वेळ जाऊ लागला.
दत्त मंदिर म्हणजे संध्याकाळी सगळे वयस्कर ,रिटायर झालेले एकत्र येऊन वेळ घालवण्याचे ठिकाणच...तसा बराच मोठा बायका –पुरुषांचा होता.तिकडेच जोशी काकांना बरेच मित्र त्याच्या वयाचे सोबती मिळाले.जोशीकाका त्याच्या ग्रुपमध्ये चांगलेच रमायला लागले.सगळेच रिटायर झालेले असल्यामुळे मस्त सगळे रोजची संध्याकाळ मजेत घालवायचे,रोजच्या गप्पा टप्पा मस्त रंगायच्या. आणि तिकडेच कुलकर्णी काकूची ओळक झाली
दोघांच्या आवडी निवडी बर्याच प्रमाणात सारख्याच,आणि दोघांची दुख:ही सारखीच.दोघांच्याही मुला –सुनेला वेळ नाही...कुणी त्याचं ऐकत नाही.त्याची मुले नोकरी ,पैसा मिळवण्याच्या नादात साधे ते एक मुल पण जन्माला लायला तयार नव्हते हि गोष्ट कुलकर्णी काकु आणि जोशी काकांच्या मनाला लागायची.आपली मुल अशी का करतात ,आपल्याला त्यांच्या आयुष्यात काहीच स्थान नाही का हि हुरहूर दोघांच्याही मनात होती. एकत्र रोज भेटण होत असल्यामुळे ओळक वाढली .ग्रुपची पिकनिक ,चित्रपट,नाटक पहायला जाणे ,सकाळी एकत्र फिरायला जाणे ,सतत गेटटूगेदर करणे अश्या गोष्टीमध्ये दोघेही रमून गेले. एकमेकांकडे मन मोकळे करत असत.,
पण कुलकर्णी काकुच्या मुलाला हे सगळ रुचल नाही.त्याने कुलकर्णी काकुंना विचारलं आई वयाच्या म्हातारपणी तुझ हे काय सुरु आहे ..बघावं तेव्हा नुसत जोशी जोशी करत असतेस.म्हातारपणी प्रेमात पडलीस कि काय? हे चालणार नाही बर का आम्हाला.
कुलकर्णी काकू नुसत शांतपणे मुलाच बोलणे ऐकून घेत होत्या.त्याच बोलण पूर्ण झाल्यावर बोलू लागल्या...
काय माहितीय का अमर ..ज्यावेळी मुलांना एकट्या असलेल्या आईला ,किंव्हा एकट्याच असलेल्या वडिलांना द्यायला वेळ नसतो त्यावेळीच त्यांना वेळ घालवण्यासाठी बाहेरची माणसे लागतात.प्रेमात वैगेरे पडण्याचे दिवस नाही राहिले माझे पण ह्या वयात छान मित्र मिळालाय मला...तसे जोशी एकटेच नाही रे ..आमचा अख्खा पूर्णच समुहच खूप भारी आहे.आमची आम्हीच एकमेंकांची काळजी करतो आणि घेतोपण .तुम्हाला साध म्हंटल आमचे हाथ-पाय चालतायत तोपर्यंत एखाद मुल जन्माला घाला तर तेपण नाही जमत आणि तुझ्याकडे आईसाठी द्यायला वेळ असेल तर बोल आणि असे प्रश्न मला विचार.
आयुष्यभर ज्यांच्यासाठी खस्ता खाल्यात ,तीच मुल अशी एका घरात राहून परकेपणा देतात,वागतात ना तेव्हा जे दुखः होत ते तुला इतक्यात कळणार नाही. अमर आजपर्यंत मी कधी चुकीची वागले नाही आणि आताही वागत नाहीये,फक्त एकटेपणाला त्रासलेले म्हणून मला घरातून बाहेरच हे जग जवळच वाटू लागल ह्यात माझी काही चूक आहे असे मला नाही वाटत आणि तुला वाटत असेल तर आई अशी का वागते याची तूच कारणे शोध.
अमर ,खरतर खूप चिडलेला पण ...त्याच्याकडे आईसाठी खरच वेळ द्यायला नव्हता त्यामुळे तो काहीच न बोलताच निघून गेला पण आज त्याच्याच मुलाने संशय घेतला होता त्यामुळे कुलकर्णी काकुंचे अश्रू अनावर झाले होते.

.

Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>