Home » , , , , , , , , » कथा :नविन नात्याची सुरवात..."सैर चांदण्याची"

कथा :नविन नात्याची सुरवात..."सैर चांदण्याची"

Penulis : SpandanKavita on Thursday, 25 January 2018 | January 25, 2018व्हॅलेंटाइन डे वीक सुरु झाला होता पण प्रोजेक्ट डिलीवरी स्टेजला होता....निता मिटिंग ,मॕनेजमेन्ट मध्ये तर अमित त्याच्यां प्रोजेक्ट डेडलाईन मध्ये......खुप वर्कलोड प्रेशर असल्यामुळे जराही निवांतपणा नव्हता....पण टिममधील इतरांही व्हॅलेंटाइन डे celebration साठी लवकर जायच होत...मग सगळ्यांनी मिळून ठरवल आज एक दिवस सुट,..लवकर जाऊ..उद्या लवकर येऊ अॉफिसला.
अमितचे सगळे 7feb ते 13 feb सगळे दिवस तसेच फुकट गेले होते...त्याला निता अगदी पहील्या भेटीतच पहाता क्षणी आवडली होती..पण ती त्याची मॅनेजर होती...तिला प्रपोज कस करणार...??आपल्याला जे वाटत ते तिला कळाल तर आपणच अडचणीत येऊ अस त्याला वाटत असे...तो फक्त गप्प असायचा तिला डोळे भरुन पहायचा....ती बोलेल तितकच तिच्याशी बोलायचा...
आज मनात खुपच खळबळ माजली होती...मनातलं प्रेम समोर होत...पण व्यक्त करता येत नव्हत....नुसती मनाची घालमेल सुरु होती...तितक्यातच...निता अमितच्या जवळ आली....
अरे अमित, तू किती वाजता निघणार आहेस अॉफिस मधून???
हा असा निता कडून प्रश्न अनपेक्षित समोर आल्याने तो गडबडला...
अ..अ..करत म्हणाला..
निघेन काम संपल की 8 पर्यंत....
निताने गोड स्माईल दिल ,बर जाताना बोलव मला आज सोबतच जाऊ...
अमितला ह्या वाक्याचा पुन्हा सुखद धक्का बसला...
त्याने फक्त मान डोलऊन होकार दिला...
त्याची धाकधूक सुरुच होती ..कधी एकदा राञीचे 8 वाजतात असे त्याला झाले....
काम उरकताच तो निताला म्हणाला निघायच का मॅम .??(आजवर त्याने तिला कधिच ऐकेरी हाक मारली नव्हती...)
हो झालच आहे...निघुयात आता...
अॉफिसमधून बाहेर पडले....
लख्ख चांदण्यानी भरलेल आभाळ,थंडगार वारा,सोबतीला आपली आवडती व्यक्ती...जणू काही अमितच्या मनात लड्डूच फुटत होते...
अमित ती सोबत असूनही तिच्याच विचारात बुडालेला...त्याला हे सगळ स्वप्नंवतच होत
ती पटकन बोलली ...मला खुप भूक लागलीय.....आपण हॉटेलमध्ये जाऊया का कुठेतरी???
बघ हं ,पण तूझा काही खास plan असेल तर राहू दे....
आज सगळ्याच गोष्टी अनपेक्षित घडत होत्या...तो जराही विचार न करता ,
नाही नाही...मॅम ,माझा काही प्लॅन नाही जाऊया आपण....
इथे एक ओपन स्पेस मस्त हॉटेल आहे..."सैर चांदण्याची"
पण तिकडे राञी candel light डिनर असतो..चालेल का तुम्हाला??
ती...हो ,का नाही ,खुप आवडेल मला...
काय माहीती पण आज अचानक गाडी ट्र्कवर चालली होती...अमित खुपच खुश होता...
डिनरसासाठी गेले...सगळीकडे Red Heart बलून्स...मस्त डेकोरेशन,सुंदर romantic songs,,
दिलखुष वातावरण होत..अगदी ठरवून सुद्धा इताका छान प्लॅन जमला नसता इतका सुंदर प्लॅन झाल्या सारख त्याला वाटत होत....
डिनर टेबलवर सुंदर गुलाबाच फुल होत....हळूच त्याने temptation cadbury 
बॅग मधून बाहेर काढली....अन् त्या गुलाबाच्या फुलासोबत लगेच तिला दिला....
ती पटकन बोलली ...temptation Cadbury ......wow..,,for love...देतात ना ही...
तो नजरेला नजर न देताच खाली बघू लागला....काय बोलाव काही सुचेना....
ऐक ना अमित...त्याने मान वर करुन हळूच तिच्याकडे पाहील...
ती त्याला म्हणाली ,तू मला मॅम म्हंणटलेल नाही आवडत....नितू म्हणत जा....
मॅम मध्ये आपलेपणा नाही रे वाटत.....आणि आपण तर खास मिञ आहोत ,असं कोरड्या शब्दांतून कसा रे बोलवतोस मला??
अमितला काय बोलाव काहीच कळेना...पण तरीही म्हणाला प्रयन्त करेन हं.....अॉर्डर दिली...जवळपास 5मिनिटच्या आतच एकमत झाल अन् डिनरची अॉर्डरही दिली...
ती त्याच्याकडे डोळ्यात डोळे घालून एकटक पाहू लागली...तो म्हणाला ,काय पहाताय इतके माझ्याकडे...?
अरे असा कसा रे तू....??
तुझ्या डोळ्यात जे मला दिसतय ते बघ ना ,माझ्याही डोळ्यात दिसतय का.तुला....??
आज valentine's day आहे...आणि मी तुझ्या सोबत आलीय....तुला काहीच समजत नाही का???
म्हणत एक सुंदर valentine's day greeting त्याला दिले...greeting मध्ये आत लिहीले होते..

प्रिय अमित,
खरतर ,तुझ्या पहाताच क्षणी प्रेमात पडले होते ...
मी रोजच नजरेला नजर देऊन जेव्हा माझ्याकडे पाहतोस तेव्हा तेव्हा तुझ्या डोळ्यातले तुझे ते माझ्या विषयीचे प्रेमभाव मनापासून वाचते.पण तू कधीतरी विचारशील म्हणून थांबले होते...तू अगदी सरळ साधा आहेस . मला माहीतीय तू तूला वाटल तरी नाही बोलणार...कारण तू स्वतःपेक्षा माझा जास्त विचार करतोस..
माझ्या मनाची पण तगमग आज थांबवायची आहे ..माझ्या मनात लपवलेले तुझ्या विषयीच प्रेम तुझ्यापर्यंत माझ्या शब्दरूपी ओळीनी पोहोचवते
तुला आज एकच सांगायचय...
"नयनास माझ्या होतात तुझेच भास...
रहायचे आहे मज फक्त तुझ्याच काळजात..."
मी पण खुप उशिर केलाय तुला सागांयला पण...मी तुझ्या प्रेमात आहे.. I love u!!
तुझीच नितू...

अमित निशब्द झाला...
त्याने तिचा हात हातात घेतला ...हो मलाही तू खुप आवडतेस पण...तुला माझ्या भावनां कळाल्या अन् मी तुला गमावल तर..मी कसा राहीन या विचाराने मी बोललो नाही...
प्रेम अस सहज मिळाल तर त्याला अर्थ असतो...कुणाच मन दुखवून,मागे लागून मिळवण्यात अर्थ नसतो.....
आजचा दिवस माझ्यासाठी खुपच सुंदर अविस्मरणिय आहे.....
आयुष्यभर जपून ठेवेन ह्या क्षणांना....हृदयात...तुझ्यासोबत....
तू मला हवीयस..आणि मीही खुप प्रेम करतो तुझ्यावर...
ya really u r my Valentine ..Nitu
love u so much!!
अव्यक्त ते दोघे ,ऐकमेंकासमोर प्रेम व्यक्त करुन सैर चांदण्यासोबत करुन..अगदी आनंदाने..... हातात हात घालून हॉटेलमधून बाहेर पडले..
एका नविन नात्याला जन्म देऊन....
स्पंदन @सोनाली कुलकर्णी

Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>