Home » , , , , , , , , , » वाटा बदल्याकी सगळच बदलत....

वाटा बदल्याकी सगळच बदलत....

Penulis : SpandanKavita on Thursday, 25 January 2018 | January 25, 2018गीता जूना आठवणींचा अल्बम चाळत होती..
मनात अचानक त्याच्या आठवणींची खळबळ उडाली..
खुप काळ लोटला....अताशा तो मला विसरलाही असेल...ही भावना तिच्या मनात रेंगाळत होती...
क्षणात तिला वाटल ...डोळे झाकून पहाव ...की आता तो कसा दिसत असेल...अन् तिने डोळे मिटले....
.....
तेवढ्यात डोअर बेल वाजली....
तिचा त्याला आठवण्याचा सुर लागलेला अचानक भंग झाला....
ती वैतागाने उठली....
दरवाजा उगडला.....
अन्....
मोठ्याने ओरडली...."तू"....
पहाताच त्याला थोडीशी भांबावली,गडबडली...तिला काय करावे काही कळेना....
त्याचीही तिच्याहून वेगळी अवस्था नव्हतीच....
पहाताच त्याला घट्ट बिलगून जाव वाटल खर...पण....मनात आठवणी ताज्या असल्यातरी खुप काही बदलेल होत....
तो...ती.....त्याच्यांतल अंतर....आणि नावापुरत होत म्हणायच ते अगदी प्रेमही....
पण कसही का असेना....
आठवणीचा अल्बम चाळताना....डोळे मिटून ज्याला आठवत होती तोच अचानक समोर येऊन ऊभा होता.
एक सुखद धक्का घेऊन....
त्याला पाहूनच मनातले सगळे काहूर थांबले होते.....
ती त्याला येना म्हणून आत घेतल...
औपचारिक आदरातिथ्य झाल....
पण दोघात काय बोलायाचा हा प्रश्न होताच...
सन्नाटा पसरल्यासारखी दोंघामध्ये शांतता होती....
दोघ ऐकमेकांच्या नजरेला नजर द्यायलाही टाळत होते...
कधी काळी एकमेंकाच्या प्रेमात तुंडूब बुडालेल्या दोघांना बोलण्यासारख काहीच नव्हत.....
ती अचानक बोलली खुप बदलायस रे तू.....
तो म्हणाला तू ही बदलीयस....
पूर्वीसारखी वाटत नाहीस....पहीली किती बडबडी होतीस..आता एकदम शांत शांत वाटतीयस...
ती:खुप वर्षानी तू अचानक समोर आलायस ...थोडीशी गडबडलीय...
पण तूला एक जाणवतय का???
तो :काय ग....
नात्याचा अर्थ बदललाकी सगळच बदलत....अन् त्या नात्यातल खुप अंतर वाढत गेल की....ते नातही कांलातराने विसस्मृतीत जात.....मग फक्त आठवणीच रहातात...
आजच आपल्या कॉलेज फोटोचा अल्बम पहात होते...आठवत होते तूला......
पण आता तू समोर आहेस माझ्या...पण तुझ्यापेक्षा त्या आठवणी जवळच्या वाटतायत मला.....
वाटल होत तू समोर आलास तर तसेच अगदी प्रेम पुन्हा वाटेल का ...??
पण खरच नाही वाटत......ते प्रेम....
तुला वाटतय का तसच प्रेम..
तोही नाही म्हणाला.....
ती म्हणाली त्याला...का नाही वाटत याच कारण....माहीतीय का तुला....???
कारण आपण भुतकाळाला बंंदिस्त काळजात बंद केलय.....आणि वर्तमानकाळाशी हात मिळवणी केलीय....वाटा बदलल्या की....सगळच नजरेआड होत...पुन्हा जुळवाव म्हणटंल तरी नव्याने नाही जुळत..
मनाची तार तुटली की तुटलीच....नाही जोडता येत परत...
"जितक जवळ राहून नात जिंवत रहात तितकच ते मनाच अंतर वाढल की मृत होत"..
असो.....
भुतकाळातात नकोच डोकवायला.......आपण
आज इकडे अचानक कसा काय.....???
स्पंदन@सोनाली कुलकर्णी

Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>