स्वप्नातही वाटे मिठी तुझी हवी हवीशी..

Penulis : SpandanKavita on Monday, 12 February 2018 | February 12, 2018

Monday, 12 February 2018


जिथे प्रत्यक्ष भेट नाही होत ,दुरावा ,अबोला सुरु होतो तेव्हा मनमुरात ,कुणीही न थांबवता,आपल्याला हवे तसे आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत जगण्यासाठी....भेटण्यासाठी...
"स्वप्न "हेच एकमेव हक्काच भेटायच ठिकाणं...

येईन म्हणतीय आज स्वप्नात तुझ्या..
भेटुनही, राहून गेलेली ती शेवटची मिठी मारायची तुला..!!
@सोनाली कुलकर्णी

comments | | Read More...

प्रेम,प्रारब्ध अन... ती व्यक्ती....

Penulis : SpandanKavita on Saturday, 10 February 2018 | February 10, 2018

Saturday, 10 February 2018

आयुष्यात आपल्याही नकळत बऱ्याच व्यक्ती आपल्याला भेटतात, ....मग एखाद्या व्यक्तीच्या चांगुलपणामुळे,समंजस स्वभावामुळे,सुप्त गुणामुळेही ,सहवासामुळे...एखादी व्यक्ती आवडू लागते आणि प्रेम ही होते...मग ते प्रेम आयुष्यभर सोबत असेल,नसेल याची खात्री नसली तरी ...

"ती व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप मनाच्या जवळची होऊन जाते आणि मनात कायम घर करून राहते.
आणि ती तयार झालेली सुंदर सहवासाची फुले आयुष्यभर सोबत करतात फक्त आठवणं बनून ...! "
कुणालाही दोष न देता त्या आठवणींना जपता आणि कुरवाळता आलं पाहिजे...कारण ज्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यात जितका कालावधी प्रारब्धात लिहिला आहे तितकाच काळ ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि पुन्हा ती वेळ संपताच निघूनही जाते....हे स्वतःच्या मनाला समजावणं गरजेचं असतं.

कधी कधी दोन लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात ते नेहमी एकत्र राहण्यासाठी नाही तर एकमेकांना आयुश्यात खूप काही शिकवण्यासाठी ,एकमेकांना ग्रो करण्यासाठी...किंवा काही पूर्व जन्माच्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी....आणि एकदा पुरेसे एकमेकांकडून शिकले , की ते निघून जातात आपापल्या मार्गाने...

हा खरंतर हे ही ठीकच आहे..ना..

प्रत्येकाचे आयुष्य जगण्याचे रस्ते वेगळे असतात..
आयुष्याचे प्लॅन्स वेगळे असतात कोणतीही कमिटमेंट नसेल तर आणि दोघांच्याही आयुष्य जगण्याचे प्लॅन्स वेगळे असतील तर ...एकमेकांत मुळात अडकण्यात अर्थच नसतो.निर्माण होणाऱ्या नात्याला भावनिक बेस असला तरी बऱ्याचदा प्रॅक्टिकल होऊन  नात्यांना पहावं लागत.कारण नुसतं भावनिक होऊन आयुष्य जगता नाही येत आणि नातीही टिकवता येत नाहीत.
कारण आपण नियतीच्या हातातले कटपुतले असतो...मग उगाच  स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा 
जे काही त्या व्यक्तीच्या सहवासात मिळाले ,शिकलं गेलं ते सोनेरी क्षण मनावर कोरून ठेवावेत आणि वर्तमान स्वीकारून आणि आपल्या भविष्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि तेच योग्य असतं.
स्वतःसाठी जगणं हे ही खूप महत्वाचे असतेच की ...आपण आपल्या स्वता:वरही प्रेम करतोच ना...
म्हणूनच ,काहीही झालं तरी ....life is going on..so ,jindgi  jio khushise.!!

स्पंदन@सोनाली कुलकर्णी
११-फेब्रुवारी-२०१८

comments | | Read More...

चॉकलेटवाणी आवाज तुझा....

Penulis : SpandanKavita on Friday, 9 February 2018 | February 09, 2018

Friday, 9 February 2018कितीही चॉकलेट खाल्लेतरी मन कधीच भरत नाही ना....
अगदी तसंच तुझ्या आवाजाचही होत बघ....
बस, फक्त तू बोलत राहावंसं आणि मी ऐकतच राहावंसं वाटतं...😍😘🍫🍫

स्पंदन@ सोनाली कुलकर्णी
#चॉकलेटडे2018
comments | | Read More...

बस,यहीं दुआ कर देना...

Penulis : SpandanKavita on Thursday, 8 February 2018 | February 08, 2018

Thursday, 8 February 2018

Dear,
ऐसे मोड़पे हम दोनों मिले की 
ना हम आपके हो सके ,ना आप हमारे..
बस, अभी यहीं दुआ है कि,
अगले जनम मैं ऐसे मिलना की,
 हम खुदभी इक-दुसरेसे को 
इक दुसरेसे दूर नहीं कर पायेंगे..!!
@सोनाली कुलकर्णी


comments | | Read More...

Happy Rose day...2018

Penulis : SpandanKavita on Wednesday, 7 February 2018 | February 07, 2018

Wednesday, 7 February 2018
अडखळणार्या शब्दांना माझ्या,
आज गुलाबाने धिर दिला
तुझ्या पर्यंत पोहचण्याचा ,
माझा मार्ग जरा सोपा झाला

तुला पहाताच ,
मनाची चलबिचल सुरु झाली
खिश्यात लपवलेले फुल खिश्यातच ,
रहाते काय याची मनात भिती वाटू लागली

तितक्यात तूझ गोड हसंण ,
पुन्हा मला घायाळ करुन गेल
काही नाही आज धाडस केलच पाहीजे ,
असे मनाला बजावून गेल

हळूच hi ,hello करत खिश्यात हात घातला...
मी फुल तुला देणार इतक्यात ,
तुच गुलाब मला दिलास याचा 
सुखद धक्का माञ बसला,

थोडीशी तु लाजलीस ,
अन् म्हणालीस वेड्या साध गुलाबाच    
द्यायलाही किती घाबरतोस,
 घाबरु नकोस इतका ह्या गुलाबाइतकाच ,
तुही मला आवडतोस

 गुलाबानेही तुझ्या शब्दांना साथ देत ,
आपल्या प्रेमाची सुरवात तर झाली
अजन्म विसरणार नाही अशीच,
हृदयात आजच्या Rose day ची नोंद झाली.

🌹🌹🌹🌹  Happy Rose day.🌹🌹🌹🌹
स्पंदन @सोनाली कुलकर्णी
comments | | Read More...

तुझ्या आठवणींना सांभाळणं इतकं सोपं नाही ...

Penulis : SpandanKavita on Tuesday, 6 February 2018 | February 06, 2018

Tuesday, 6 February 2018

वादळांने पालापाचोळा सैरावैरा उडावा अन्
 त्यांना पकडायला जाव तर हाताशी काहीच लागत नाही ना तसेच....
तुझ्यासोबतच्या क्षणांचही मनात वादळ सुरु झाल कि....
ते सारे क्षण सैरावैरा होतात....
मन चित्त हरवत..अन्
तुझ्या आठवणींना उराशी सांभाळण कठिण होत रे...
...तुला वाटत इतक सोप नाहीये तुझ्या आठवणीत जगणं..
इतकंच सांगायचय तुला...
स्पंदन@सोनाली कुलकर्णी
comments | | Read More...
 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>