Happy Rose day...2018

Penulis : SpandanKavita on Wednesday, 7 February 2018 | February 07, 2018
अडखळणार्या शब्दांना माझ्या,
आज गुलाबाने धिर दिला
तुझ्या पर्यंत पोहचण्याचा ,
माझा मार्ग जरा सोपा झाला

तुला पहाताच ,
मनाची चलबिचल सुरु झाली
खिश्यात लपवलेले फुल खिश्यातच ,
रहाते काय याची मनात भिती वाटू लागली

तितक्यात तूझ गोड हसंण ,
पुन्हा मला घायाळ करुन गेल
काही नाही आज धाडस केलच पाहीजे ,
असे मनाला बजावून गेल

हळूच hi ,hello करत खिश्यात हात घातला...
मी फुल तुला देणार इतक्यात ,
तुच गुलाब मला दिलास याचा 
सुखद धक्का माञ बसला,

थोडीशी तु लाजलीस ,
अन् म्हणालीस वेड्या साध गुलाबाच    
द्यायलाही किती घाबरतोस,
 घाबरु नकोस इतका ह्या गुलाबाइतकाच ,
तुही मला आवडतोस

 गुलाबानेही तुझ्या शब्दांना साथ देत ,
आपल्या प्रेमाची सुरवात तर झाली
अजन्म विसरणार नाही अशीच,
हृदयात आजच्या Rose day ची नोंद झाली.

🌹🌹🌹🌹  Happy Rose day.🌹🌹🌹🌹
स्पंदन @सोनाली कुलकर्णी
Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>