पावसाला पत्र | महापूर 2019

प्रिय पावसा...

 कधी कधी एका थेंबासाठी राडवणारा तू,
खरं तर तू नेहमीच हवा हवासा वाटतोस.....
पण ह्या 8 दिवसातील तुझे अक्राळी विक्राळी रूप पाहून,तुझ्यामुळे झालेला पुराचा हाहाकार पाहून तू नकोसा वाटतोयस,

तुला माहीत नसेल पण,
धीर सोडू नका ,पाऊस थांबेल ,पूर ओसरेल ,काळजी करू नका असे  फोन वरून घरच्यांना ,मित्र मैत्रिणींना  ,समजवताना आमच्या काळजाच पाणी पाणी होत....आणि लांब राहून ,आपणचा आपल्या घरच्या लोकांनां शाब्दिक धीर ,आधार देण्याशिवाय काहीच करू शकत नाही यांची खंत मनाला खात राहते...
कसंय ना,

लहानपणापासून बघत आलेले जुने वाडे,लहानपणी खेळलेली मैत्रिणीची घर,जमीन दोस्त झालेलं पाहून धस्स होतयं.कधीही गावी गेलं तरी आनंदाने ,फेरफटका मारून  येणारी शेत आता सगळं काही नुकसानीच्या विळख्यात सापडलेलं पाहून  मन आतून भरून येतंय....लहान मुलं, गरोदर बायका,म्हातारी माणसं याचं हाल सहन होत नाहीये..

माणूस स्वतःला खूप शहाणा समजतो रे पण तू वेळ आणलीयस की त्याला हतबल व्हावं लागल ,परिस्थिला शरण जावं लागल...कारण तुझ्या(निसर्गा )समोर कुणाचं काहीच चालत नाही...
बाकी , आताही हवामान खात "अतिवृष्टी चा" इशारा देतंय.... पण  पावसा बास झाली तुझी  झडती....
नाही सहन होतं...
आमचाही घरच्यापासून लांब राहून इथे जीव लागत नाहीये.....आणि पुरात अडकलेल्या सगळ्यांची अवस्था बघवत नाहीये....कष्टाने मिळवलेलं सगळं पाण्यात  जाताना ,उघड्या डोळ्याने पाहवत नाहीये..
प्लिज काहीही कर...
"पण आता तू थांब...."
अजून अंत नको पाहुस
इतकंच आमचं म्हणणं आहे...
बाकी पुढच्या सिजनला ये पण....तुझी मर्यादा नको सोडूस की तू पुन्हा आवडेनासा होशिल....इतकंच कर...!!
@सोनाली कुलकर्णी
#महापूर2019 #पावसाला_पत्र

0 comments: