डिप्रेशन_आणि_त्यामागची_मानसिकता

#डिप्रेशन_आणि_त्यामागची_मानसिकता

प्रत्येकालाच आयुष्यात बरच काही हवं असतं ,बरच काही करायचं असत पण प्रत्येकाच्या सगळ्याच इच्छा कधीच पूर्ण होत नाही.आणि मग भावनांचा ,विचाराचा  ,योग्य पद्धतीने निचरा नाही झाला की माणूस एकाकी पडू लागतो.
डिप्रेशन मध्ये जाऊ लागतो. डिप्रेशन येण्याची मुख्य कारण पैसा,आजारपण, आयुष्यात येणार अपयश ,प्रेमातली भांडण असो वा ब्रेकअप असो... आणि बऱ्याचदा मनात असलेली अति महत्वकांक्षा...अशी बरीच कारण असू शकतात 
हे सारं काही विनाशाच्या ,निराशेच्या वाटेकडे घेऊन जात.

अश्या वेळी  योग्य सोबती,समाजवणार कुणी आपलं  नसेल तर मनातल्या गोष्टी मनात राहू लागतात..
आतल्या आत साचत जातात.माणूस एकटं एकटं राहू लागतो.
समोर कुणी असेल तरी आपल्याच तंद्री मध्ये राहतो.ना कुणाशी बोलावं वाटतं ,ना कुणाला काही सांगावं वाटतं..
त्यावेळी आपला कुणावरच विश्वास राहिलेला नसतो अगदी स्वता:वरही.
प्रत्येक गोष्ट बोलली गेली तर प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन निघू शकत पण...ती मनात तशीच राहिली तर 
माणूस फक्त आतल्या आत जळत राहतो आणि हे जळण इतकं टोकाचं होत की....
मग कठीण होत ते स्वतःला सावरण.स्वतःला सांभाळणं.
मग कितीही डॉक्टरांचे सल्ले घेतले तरी इथे स्वत:च स्वतःला सांभाळायचं असत. माणूस एकदा मनाने कमकुवत झाला की त्याला धीराने आयुष्य  जगणं कठीण जाऊ लागते....
मग वाटू लागतं ,का ,कश्यासाठी आपण जगतोय??
जर आयुष्य आपल्याला हवं तसं जगता येत नसेल तर आयुष्य जगण्याला अर्थ आहे का??
आयुष्य स्वस्त नसलं तरी प्रत्येकाच अगदी मस्तही नसतंच....
बरेच खाचखळगे येतच राहतात.त्याना फेस करणं मेंदूच्या बाहेर जातं तेव्हा.... मन अस्थिर होत....जगणं नकोस वाटतं...वाट्याला येत ते फक्त डिप्रेशन.
आणि मग एक क्षण येतो भावनेच्या भरात स्वतःला संपवण्याचा.
(ती एक मानसिक फेज असते ...त्यावेळी जवळ प्रेमाची व्यक्ती असेल ,समजून घेणारी किंवा सांगणारी तरच ह्या फेसजमधून हळूहळू बाहेर काढू शकते.त्या व्यक्तीचा शाब्दिक आधार आयुष्याच गणित बदलू शकते)

आयुष्यात एकवेळ जास्त हातात पैसा नसेल तरी चालेल पण आपल मन मोकळं करायला आपली हक्काची माणस हवी.जिथे आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी share केल्या जातील आणि मनाचा योग्य समतोल
साधला जाईल.आणि हे खूप गरजेचे आहे.

नाहीतर आपल विज्ञान ,मेडिकल शास्त्र कितीही पुढे गेलं तरी माणूसाची कोणतीच मानसिकता बदलण्याची ताकद त्या देवामध्येही नाहीये.

@सोनाली कुलकर्णी

#Ripsushantsingrajput

0 comments: