तुझ्यासाठी झुरण आता जमत नाही...

आयुष्य प्रत्येक वळणावर  
नियतीच्या तालावर वळण घेत राहत.....
पण खरंतर तुझी आठवण....
माझी काही पाठ सोडत नाही....
तुझ्या आठवणी काय ,
क्षणाक्षणांला येतच राहतात,
पण काळ इतका ओसरला की,
तुझ्या आठवणी मी आता 
डोळयातून वाहून देत नाही....
मनाला समजावलं की,
पूर्वी इतका आता त्रासही होत नाही
मन माझं शहाण झालंय,
फिरत नाही ते आता चुकीच्या रस्त्यावर,
करत राहत,परिस्थिती ,वर्तमानाचा विचार 
खरं सांगू,
तुझ्यासाठी झुरण आता जमत नाही
अन
माझ्याशिवाय तुझं काही अडत नाही 
ही जाणीवही काही कमी होत नाही....
@सोनाली कुलकर्णी

0 comments: