Recent Posts

कळेल का कधी तुला माझं प्रेम..

Penulis : SpandanKavita on Wednesday, 28 June 2017 | June 28, 2017

Wednesday, 28 June 2017

कळेल का कधी तुला माझं प्रेम..

रात्रीचे बारा वाजले तरी
माझं घड्याळ तुझ्याच भोवतीने फिरत असतं
Messanger वरील तुझ्या ग्रीन सिग्नल कडे
एकटक पाहत राहते
वाटतं असतं तुला hi ,करावं
तुझ्याशी मनसोक्त बोलावं
पण तुला माझ्या असण्या नसण्याचा
काही फरकच पडत नसतो.
तू फक्त तुझ्याच नादात.
मनात येत राहत माझ्या,
तुला नसेल का दिसत
माझाही ग्रीन सिग्नल,
जो फक्त तुझ्याचसाठी असतो??
की दिसूनही तू टाळतोयस??
मग ह्या विचारातच करत राहते
ह्या कुशिवरून त्या कुशीवर,
मनाची चलबिचल,
हृदयाची तडफड,
तुला भेटण्याची ,
तुझ्याशी बोलण्याची अनामिक ओढ
चालूच राहत..
मग
रात्रही खूप मोठी वाटू लागते
मनात माझ्या तुझ्याविषयी
हजार प्रश्न काहूर माजवू लागतात,
तुझा online चा ग्रीन दिवा मला अस्वस्थ करून जातो
तू मात्र माझ्याशी न बोलता तुझ्याच दुनियेत बुडून गेलेला.
अन अचानक क्षणात offline जातोस
मी मात्र पूर्ण रात्र तुझ्याविचारात जागी राहते
फक्त याच विचारात कधी तरी कळेलच ना तुला माझं प्रेम??
sonali कुलकर्णी
comments | | Read More...
 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>