Ganpati Visarjan at home | Ganpati Uttarpuja vidhi Marathi | Ganpati Visarjan Puja | गणपती उत्तरपूजा

 Ganesh Visarjan at Home: गणपती विसर्जन कसे करता

गणपती उत्तरपूजा | अगदी सोप्यापद्धतींने करा गणपती बाप्पाची उत्तरपूजा |गणपती विसर्जन विधीसाहित उत्तरपूजा |ganapti uttarpuja |Ganpati Uttar Pooja Marathi | Ganpati Visarjan Pooja Vidhi | Ganpati Visarjan Puja | गणपती उत्तरपूजा | बाप्पाच्या निरोपाची घरी तयारी करताना उत्तर पूजा


पार्थिव गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. तसाच अनंत चतुदर्शीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी विसर्जन पूजा केली जाते. यालाचा गणपती उत्तर पूजा असेही संबोधले जाते. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गणपती विसर्जन पूजा कशी करावी? 

संपूर्ण घरच्या घरी गणपती कसे विसजर्न करावे याचा व्हिडिओ नक्की पहा

आपापल्या कुळाचाराप्रमाणे घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस गणपती पूजन केले जाते. अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येते. लोकमान टिळकांनी गणेशोत्सव सुरू करताना तो १० दिवस असावा, असे निश्चित केल्याचे सांगितले जाते. त्यानुसार, गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते. पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्य प्राप्ती होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.

उत्तरपूजा विधी थोडक्यात : 
आचमन  :
ॐ केशवाय नमः । 
ॐ नारायणाय नमः । 
ॐ माधवाय नमः । 
या नावांनी दोनदा आचमने करावी. 
ॐ गोविंदाय नमः । या नावाने पाणी सोडावे.

पंचोपचार पूजा
श्रीसिद्धिविनायकमहागणपतीप्रीत्यर्थं गंधादिपंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये । 
महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामिः । 
अक्षतां हरिद्रां कुंकुमं च समर्पयामि । श्रीमहागणपतये नमः । 
सिंदूरंदूर्वांकुरान् कालोद्भवपुष्पाणि च समर्पयामि ।

वरीलप्रमाणे मंत्र म्हणून गणपतीला गंध , फुले , अक्षता , हळद – कुंकू , दूर्वा , शेंदूर हे उपचार वाहावेत .

श्रीमहागणपतये नमः । धूपं समर्पयामि । महागणपतये नमः ।
दीपं समर्पयामि । महागणपतये नमः । नैवेद्यं समर्पयामि ।

वरील मंत्र म्हणून गणपतीला धूप , दीप ओवाळावा व नंतर नैवेद्य दाखवावा . 
कापूर लावून आरती करावी व पूजेच्या शेवटी दिलेले मंत्रपुष्पाचे व प्रार्थनेचे मंत्र म्हणावेत .

आरती , मंत्रपुष्प व प्रार्थना करुन झाल्यानंतर गणपतीला मोदकाचा नेवैद्य दाखवावा  आणि त्यानंतर दही पोह्यांचा नेवेद्य दाखवून  यांची शिदोरी द्यावी

गणपती विसर्जन मंत्र

यातुं देवगणा: सर्वे पुजामादाय पार्थिवीम।
इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च।।

मंत्राचा अर्थ  : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि आमच्या इच्छा ,मनोकामना पूर्ण करण्यासाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे. श्री महागणपतिपूजन केलेल्या मूर्तीर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे.
 

संपूर्ण घरच्या घरी गणपती कसे विसजर्न करावे याचा व्हिडिओ नक्की पहा 

गणपती उत्तरपूजाविधी आणि  विसर्जनसहित


घरातील गणपतीच्या विसर्जनापूर्वी  निरोपाची एकत्र आरती म्हणून बाप्पाला विसर्जनाला नेले जाते. दरम्यान घरच्या घरी विसर्जन करण्यासाठी मोठा टब, बादली, घंघाळामध्ये बाप्पाला विसर्जित करण्यापूर्वी त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये फुलांच्या पाकळ्या, गंगेचे पाणी मिसळून ठेवा. विसर्जनाची मूर्ती 3 वेळेस पाण्यात भिजवून नंतर पूर्ण मूर्ती बुडवा.
टीप : तुम्ही कृत्रिम तलाव ,नदी विहीर मध्ये गणपती विसर्जन करणार असाल तर , तिथे गेल्यावर धूप,दीप हळदी कुंकू फुल वाहून आरती करावी आणि त्यानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन करावे😚

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी, आभाळ भरले होते तु येतांना, आता डोळे भरून आलेत तुला पाहून जातांना..गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! गणपती पूजेनंतर म्हणतच्या आरत्या ,प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली (सर्व आरत्या माझ्या she plans dinner youtube चॅनेलवर उपलब्ध आहे ) गणपती स्तोत्र मराठी मध्ये साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका #गणपतीविसर्जनविधी #ganpatiuttarpuja #गणपतीउत्तरपूजा #गणपतीविसर्जन #गणपतीविसर्जनपूजा #GanpatiVisarjanPuja #GanpatiVisarjanPoojaVidhi #GaneshVisarjan2021 #Ganpativisarjan2021 #विसर्जन #visarjan #viral #viralvideo #ganpatibappamorya

0 comments: