जीवनाचे घड्याळ

जीवनाचे घड्याळ... नुसतं घड्याळ नाही, तर ते आहे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक सुंदर प्रवास. प्रत्येक अंक फक्त वेळ दाखवत नाही, तर जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्याची आठवण करून देतो.
१ - जन्म: हा प्रवास सुरू होतो, जेव्हा आपण या जगात येतो. एक निरागस, नवीन सुरुवात.
२ - बालपण: हा काळ म्हणजे खेळ आणि निरागसता. चिंता-मुक्त आणि आनंदाचा काळ, जिथे प्रत्येक दिवस एक नवीन शोध असतो.
३ - खेळ: बालपणातला हा महत्त्वाचा भाग. खेळ आपल्याला जगायला शिकवतात, टीमवर्क आणि हार-जीत स्वीकारायला शिकवतात.
४ - स्वप्नं: हळूहळू आपण मोठं होतो, आणि डोळ्यासमोर येतात अनेक स्वप्नं. काहीतरी मोठं करण्याची जिद्द आणि आकांक्षांचा टप्पा.
५ - प्रवास: आता खरी धावपळ सुरू होते. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास, जिथे प्रत्येक पाऊल आपल्याला पुढे घेऊन जातं.
६ - प्रेम: आयुष्याला एक वेगळीच उब मिळते. नात्यांना, भावनांना एक अर्थ प्राप्त होतो आणि आपण एकटे नाही हे जाणवतं.
७ - संघर्ष: आयुष्य आपली परीक्षा घेतं, अडथळे येतात. हाच काळ असतो, जिथे आपण आतून अधिक मजबूत आणि कणखर बनतो.
८ - यश: मेहनतीचं फळ मिळतं आणि स्वप्नं प्रत्यक्षात उतरतात. हा क्षण आपल्याला आपल्या प्रयत्नांची जाणीव करून देतो.
९ - शांतता: या टप्प्यावर मनाला समाधान मिळतं. आयुष्याचा खरा अर्थ समजून येतो, आणि आपण शांततेने प्रत्येक क्षण अनुभवतो.
१० - आठवणी: आयुष्याच्या या टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो. जगलेल्या क्षणांची, अनुभवलेल्या आठवणींची उजळणी करतो.
११ - म्हातारपण: शरीर थकून गेलेलं असलं, तरी मनातील अनुभवाचा साठा अमूल्य असतो. हा काळ असतो जुन्या आठवणींमध्ये रमण्याचा आणि आयुष्याकडे कृतज्ञतेने पाहण्याचा.
१२ - शेवट: जीवनाची सांगता.

हे घड्याळ आपल्याला हेच सांगतं की, जीवनातील प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे. बालपणाची निरागसता असो, तारुण्याचा संघर्ष असो, यशाचा आनंद असो, किंवा म्हातारपणातली शांतता असो... या सगळ्यांतूनच आयुष्य पूर्ण होतं.

"एखाद्या गोष्टीचा शेवट म्हणजे त्याची नवी सुरुवात…"
ही ओळ आपल्याला जीवनाची क्षणभंगुरता आणि त्याचवेळी प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगण्याची आठवण करून देते.
 मृत्यू हा सुद्धा शेवट नसून, एका नवीन प्रवासाची सुरुवात असते.

सहज नजरेत आलेला हा फोटो खूप आवडला आणि जगण्याकडे positive दृष्टिकोन बनवण्यासाठीच हा लेख लिहिण्याचा प्रयत्न.....
!!श्री स्वामी समर्थ!!
@सोनाली कुलकर्णी 

लेख आवडला तर नक्की शेअर करावा आणि नवीन लेख वाचण्यासाठी follow नक्की करा..!!

#lifelessons #आयुष्य #fbviralpost2025シ #fbpost #viralpost2025 #ShareThisPost #followmeplease #followers #highlight
गोड बोलणारी लोक जास्त आपली का वाटतात??

हल्ली लोकांना "गोड बोलणारे" लोक जास्त आवडतात. कारण गोड बोलण्यात गोडवा आहे, आपुलकी आहे, समोरच्या माणसाला आनंद देणारा एक हलकासा स्पर्श आहे. 
पण "खरे बोलणारे" लोक बहुतेक वेळा टाळले जातात ,नको वाटतात. कारण खरं बोलणं म्हणजे सत्य मांडणं, आणि सत्य हे नेहमीच कडू असत .

गोड बोलणारे लोक आपल्याला हसवतात, वर वर का होईना कौतुक करतात, आपण जे करतो त्याला बिनधास्त पाठिंबा देतात. खूपदा त्यांच्यासोबत राहिलं की अहंकार सुखावतो, मनाला समाधान मिळतं. पण खरे बोलणारे लोक आरसा दाखवतात. आपल्यातल्या चुका, कमतरता, चुकीचे निर्णय हे ते स्पष्टपणे सांगतात. म्हणून त्यांचं बोलणं टोचतं, कडवट वाटतं,नकोस वाटत.

खरं म्हणजे प्रत्येकाला दोन्ही प्रकारचे लोक हवे असतात. गोड बोलणारे लोक आपल्याला आत्मविश्वास देतात, आणि खरे बोलणारे लोक आपल्याला घडवतात. पण दुर्दैवाने आज लोक "सत्य" स्वीकारायला तयार नाहीत. सत्याला भिडण्याची हिंमत कमी झाली आहे. म्हणूनच "गोड बोलणाऱ्यांची" गर्दी आयुष्यात जास्त करून घेतात, आणि मनापासून "खरे बोलणारे" एकटे पडतात.

मात्र आयुष्य खरंच बदलवणारे, प्रगतीच्या मार्गावर नेणारे हे गोड बोलणारे नसतात, तर खरे बोलणारेच असतात ,ज्यांना खरंच तुमच्या बद्दल काळजी असते ,त्यांना तुमचं खरंच चांगल झालेलं पाहायचं असत. तुम्ही चुकत असाल तर ते आपल्याला टोकतात , ते तुमच्याबाबतीत परखड मत व्यक्त करतात.वेळेअगोदर सावध करण्याचा प्रयत्न करतात.जरी ते शब्द कडू वाटले तरी आपल्याला सत्य दाखवतात, चुका लक्षात आणून देतात, योग्य मार्ग दाखवतात.

लोकांना बहुतेकदा आपल्या भावनांना सुखावणारे शब्द हवे असतात, म्हणून ते गोड बोलणाऱ्यांना जवळ करतात.
पण आपल्या चुका दाखवणारे सत्य मनाला टोचतं, म्हणून खरे बोलणाऱ्यांना दूर ठेवतात.
खरं तर गोड बोलणं तात्पुरता आनंद देतं,
आणि खरं बोलणं आयुष्य बदलून टाकतं.

म्हणूनच, ज्यांच्याकडून आपल्याला खरं बोलून ऐकावं लागतं, त्यांना दूर न ढकलता, त्यांचा सन्मान करायला शिकायला हवं. कारण खरे बोलणारे लोक हे आपल्याला हवे असतात जरी त्या क्षणी ते नकोसे वाटले तरीही आपले चुकते पाऊल सावरण्यासाठी...!!
@सोनाली कुलकर्णी 

#lifelessons #relationship #follwers #highlights #fbpost2025シ #अनुभवाचेबोल
नात्यात आपण समोरच्या व्यक्तीला गृहीत धरतो तेव्हा

आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात, ज्यांच्याशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. आई-वडील, भावंडं, नवरा,सासरची मंडळी अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी ही नाती आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग असतात. त्यांच्यावर आपलं खूप प्रेम असतं आणि तसेच त्यांचेही आपल्यावर प्रेम असतं. पण कधी कधी, याच प्रेमाच्या नात्यात नकळतपणे एक चूक आपल्याकडून नियमित घडत असते ती म्हणजे आपण त्यांना गृहीत धरतो.

समोरच्या व्यक्तीने आपल्याला गृहीत धरले की आपल्याला त्याचा त्रास वाटतो,चिडचिड होते कधीकधी खूप रागही येतो...
पण..आपणही कुणाला तरी गृहीत धरत असतोच की...
खरतर "सगळे नियम हे फक्त इतरांसाठी नसतात, आपल्यासाठीही असतात" हे आपण विसरूनच जातो. 
आपल्यालाही वाटतं की ही व्यक्ती आपलीच आहे, ती कुठे जाणार आहे? ती आपल्याला समजून घेईलच की, झालीच आपल्याकडून चुक तर माफ करेलच की आणि याच विचारात आपण कधी कधी त्यांच्या भावनांचा, त्यांच्या अपेक्षांचा किंवा त्यांना काय हवंय याचा विचार करणं सोडून देतो.

गृहीत धरण्याचे अनेक प्रकार असू शकतात.
 कधी आपण त्यांच्या वेळेची कदर करत नाही, कधी समोरच्या व्यक्तीने मदत करेलच असे सहज गृहीत धरतो, 
कधी पटकन काहीतरी बोलून त्यांच्या भावना दुखावतो,हल्ली तर whatsapp वर msg करून सुद्धा मनातला राग व्यक्त करतो ,समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावतो आणि एवढ सगळ करून 'ती व्यक्ती आपलीच आहे, समजून घेईल' या विचाराने दुर्लक्षही करतो. 
याचा परिणाम काय होतो? ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो, तिलाच आपल्या या वागण्याने त्रास होतो. हळूहळू, मनात नाराजी निर्माण होते , गरज नसताना दुरावा निर्माण होऊ लागतो आणि कधी कधी तर एकमेकांशी बोलू सुद्धा नये इतकी कटुता निर्माण होऊ शकते.

आपल्याला हे भान ठेवायलाच हवं की, कोणतंही नातं हे गृहीत धरण्यासाठी नसतं. प्रेम आणि आदरानेच ते टिकून राहतं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, तिला आदर देणं, तिच्या भावनांचा विचार करणं आणि त्या व्यक्तीला सुद्धा आपल्याकडून काय हवे ते समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. 

तिच्या असण्याला महत्त्व देणं, तिने केलेल्या गोष्टींची कदर करणं आणि वेळोवेळी आपलं प्रेम व्यक्त करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
नात्यांमधील ही गृहीत धरण्याची सवय आपल्याला आणि आपल्या प्रिय व्यक्तीला दोघांनाही त्रास देऊ शकते.
 म्हणून कोणतीही गोष्ट करताना, क्षणभर विचार करायला हवा. आपल्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीला आपण गृहीत धरत तर नाही ना? 
कारण, काही नाती खरोखरच अनमोल असतात आणि ती जपायलाच हवीत.
@सोनाली कुलकर्णी 

#सहज_सुचलं_म्हणून 
#realationshipgoals #नातं #follower #followersシ゚


काही मनातलं..खूप दिवसानंतर..
काळाच्या ओघात आपण आपल्या कितीतरी आवडी निवडी ,छंद मागे सोडून जातो ना....
इच्छा असूनही वेळ मिळत नाही किंवा तशी अनुकूल परिस्थिती नसते....
मनाला कळत असत की आपण खूप बदलत चाललो आहे..पण कसंय ना.... कितीही आतून मागे सुटून जाणाऱ्या गोष्टींचे वाइट वाटले तरीही,
नियतीने ठरवलेल्याच गोष्ठी आपल्या आयुष्यात घडत असतात हे मनाला पटवून घ्यावं लागतं !!
Be positive असे वारंवार सांगावं लागत!!
Facebook @सोनाली कुलकर्णी 

सोनाली कुलकर्णी - शब्द माझ्या अंतरीचे
8 मार्च महिला दिन.....!!!
8 मार्च महिला दिन.....!!!

सगळीकडे महिलांवर शुभेच्छा देऊन आज वर्षाव सुरू असण्याचा दिवस . व्हाट्सउप ,फसबूक इनबॉक्स शुभेच्छानी तुडुंब भरलं असेल
चांगली गोष्ट आहे!!!!
पण ह्या शुभेच्छा पाहिल्या की मनात बऱ्याच गोष्टी मन ढवळून काढू लागतात...
खरचं स्त्री ....एक बाई म्हणून सुरक्षित आहे???
रोज ऐकायला येणारे महिला वरचे अन्याय,
रोज अनेक वाईट नजराना फेस करणाऱ्या महिला,
सुशिक्षित असो वा अडाणी असो, वा कॉर्पोरटे मध्ये काम करणारीअसो, कामगार म्हणून नवऱ्याच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला,शेती मजदूरी करणाऱ्या , वा..... रस्त्यावरून जाणारी महिला असो वा ट्रेन ,बस ,रिक्षा ने प्रवास करणारी महिला असो....वा.... इथे सोशल मीडिया वर वावरणारी महिला असो....
कोण safe आहे???
अन्याय, अत्याचार,, अवाजवी छळ, वाईट नजरा, चारित्र्यावरचे शिंतोडे ,धाक,दरारा ....ह्या सगळ्याला प्रत्येकीला सामोरे हे जावंच लागत...मन मोकळे पणाने ,स्वच्छंदी वावरावे म्हणल तरी,एक महिला म्हणून सगळया पाबंदया....महिलांवरच..!
का तर ती स्त्री आहे म्हणून...??
खरंतर..... 
प्रत्येक पुरुषाने आपल्या भोवतीच्या महिलाच नव्हे मग ती लहान मुलगी असो ,कॉलेज मुलगी असो वा म्हातारी बाई असो....किंवा बरोबरीची महिला असो..
प्रत्येकवेळी प्रत्येक महिले मध्ये आई ,बहीण शोधायची गरज नाही पण एक मैत्रीण म्हणून , एक बाई म्हणून तर प्रत्येक स्त्रीला आदर देण्याची गरज आहे....!कुणालाही तुमच्याशी बोलताना भीती वाटू नये,तुमचाही आदर वाटावा ,एक सपोर्ट वाटावा असे वावरायला हवे.आणि असे झाले तर बरेच महिलांच्या बाबतीत होणारे विचित्र प्रकार थांबतील.

वरचा मुद्दा कॉमन आहे पण मला अजून एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे...
प्रत्येक पुरुषासोबतच,प्रत्येक बाईने ,दुसऱ्या बाईचा आदर करणे गरजेचे आहे...
हल्ली .....बाईच बाईची दुष्मन असल्यासारखी वागते..बाईच बाई विरुद्ध कटकारस्थान करताना दिसते.खरंतर प्रत्येक महिलेने स्वतःला समजावले पाहिजे ,आपण दुसऱ्या महिलेला रिस्पेक्ट दिला तर आपल्यालाही मिळेल आणि
इतरही दुसऱ्या महिलांना रिस्पेक्ट देतील.
माणूस जन्म एकदाच मिळतो असे म्हणतात...
मग प्रत्येकीने समोरच्या महिलेला नका मानू मैत्रीण ,सखी ,सून ,मुलगी ,बहीण पण तिच्यातल्या स्त्रीत्वाचा आदर करा.आपुलकीही नका दाखवू पण....तिचे पाय नका खेचू ,तिला तुम्हीच नका नावं ठेवू ,तिच्या चारित्र्यावर तुम्हीच शिंतोडे नका उडवू.
कारण जेव्हा आपण कुणा एकीला बोलत असतो तेव्हा आपल्या बद्दलही चार व्यक्ती बोलत असतात.
आपणच आपल्याला बदलायला हवं!
तरच सासूने सुनेचे केलेलं छळ थांबतील ,आजही सुरू असलेली हुंडाबंदी थांबेल,मानसिक हराष्मेंट थांबेल.स्त्रीला एक स्त्री म्हणून वेगळा सन्मान मिळेल ,एक महिला खंबीरपणे दुसरीच्या मागे उभी आहे हे  समजलं तर तिच्यावरचे अन्याय अत्याचार कमी होतील.

नुसते एक दिवस शुभेच्छा देऊन काही नाही होणार.
प्रत्येकाने आपल्यातली माणुसकी जागी केली पाहिजे.स्त्रीच्या स्त्रीत्वाच,तिच्या कामाचं, तिच्यात असलेल्या शक्तीचा,तिच्या आईपणाचा एक माणूस म्हणून  कौतुक,आदर पूर्ण वर्षातले 365 दिवस केला तरच हा महिला दिन सार्थकी लागेल.
तरच हा महिला दिन साजरा करणं सार्थकी ठरेल.

तूर्तास मैत्रिणींनो,

स्वतःतील "ती" भरकटुन न देता "ती"ला जपा!!
स्वतःची काळजी घ्या.अन्याया विरुद्ध लढा.स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवा!
समस्त महिलांना, जगतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!!!😊😊

@सोनाली कुलकर्णी 
@सोनाली कुलकर्णी - शब्द माझ्या अंतरीचे 
#internationalwomensday #womensday #स्पंदनकविता
आपली हक्काची माणस मनापासून जपा
आपण आपल्या काळाच्या ओघात वाहत असतो,आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या मागे लागलेलो असतो....आणि अश्या वेळी ,आयुष्यात कधी कोणावर कश्या पध्दतीने आघात होऊ शकतात ,
कोणाला कोणत्या आणि कश्या अवघड प्रसंगातून जावं लागेल काही, काहीच सांगता येत नाही.….
आयुष्य खूपच अनिश्चित आहे......
पण त्यातून बाहेर पडायला..
आपण खचलेलो असताना,आपलं मन हरलं तरी योग्य दिशेला घेऊन जाणारी एखादी हक्काची व्यक्ती हवीच....!!
जी आपला त्यावेळी आधार ही बनते आणि मार्गदर्शकही बनू शकते .नव्याने उभारण्याची मनात जिद्द निर्माण करते....
आणि त्या व्यक्तीमुळे का असेना,आपल्याला  जगण्याची ,आयुष्य सावरून पुन्हा उभारण्याची ओढ मनात निर्माण झाली की,
भूतकाळात घडलेल्या कटू गोष्टीवर पडता पडून पुन्हा जोमाने कामाला लागून सकारात्म जगता येते.

म्हणूनच काहीही झालं तरी 
"आपली हक्काची माणस मनापासून जपा"
आयुष्यात तीच उपयोगाला येतात.
©सोनाली कुलकर्णी
भीती....

#भीती....

पार्किंगचा चढ...तस तर ह्या चढावरून कित्येकदा  two wheeler चढून जाते....पण असा काही अनुभव गेल्या कित्येक दिवसात आला आहे की,
मी जेव्हा जेव्हा  गाडी काढून बाहेर पडायला लागते आणि मनात येत की हा मोठा चढ आपण चढुचं नाही शकणार त्या त्या वेळी....
माझी गाडी मधेच चढावर जाऊन अटकते, वरती चढतंच नाही....गाडी सावरण कठीण होत....
परिणामी.... मी पुन्हा गाडी बंद करते ,स्लोप वरून पुन्हा खाली घेताना ती झरकन खाली येते.मग गाडी खाली घेवून पुन्हा स्टार्ट करते ,आणि पुन्हा चढ चढायला जाते तर तिथेच जाऊन अडकते....
कालही same तसच 3 वेळा झालं..
शेवटी अहोनां बोलावलं ,त्यांनी 2 min मध्ये गाडी चढवून बाहेर काढली...पण मला शेवटपर्यंत जमलंच नाही.
तसं पहायला गेलं तर मी नेहमीच तिथून गाडी नेते...
पण ज्या ज्या वेळी मनात माझ्या भीती  निर्माण होते की आपण हे नाही करू शकणार त्या त्या वेळी हे असंच होत...

आपल्याला काही घडणाऱ्या गोष्टी दिसत असतात ,जाणवत असतात ,कळतही असतात  पण आपण त्यावर काहीच बोलू शकत नाही कारण... आपल्या  
"मनात त्या गोष्टीबद्दल जी अनामिक भीती असते " 
ती खरंच खरी झाली तर??
हा प्रश्न त्या त्या वेळी आपल्या डोळ्यासमोर.... घिरट्या घालत असतो.

आपलं mindset मध्ये जे फिक्स झालेलं असत तेच घडत असतं .जो मी अनुभव अनेकवेळा अनुभवला आहे...अगदी वेगवेगळ्या गोष्टी संदर्भात की मनातली भीती अनेकदा खरी ठरते...

आपण कितीही म्हणालो निगेटिव्ह विचार करायचा नाही तरी देखील एखादी गोष्ट अचानक मनात कुजबुजून जाते आणि ती गोष्ट तथास्थु म्हणाल्या सारखी खरी होते....
याच कारण काय काय असावं याचा विचार मी प्रत्येकवेळी करते....पण उत्तर काही मिळत नाही .

कदाचित
आपण त्यावेळी मनाने स्थिर नसतो, किंवा  एखादी गोष्ट आपल्याला  जमणार नाही,मिळणार नाही,किंवा आपल्या हातातून निसटून जाणार ...अश्या अनेक गोष्टीची मनात भीती असू शकते.
आणि भीती म्हणजे नकारात्मक विचारांचंच खरं कारण असतं हे अनुभवावरून समजूनही घडणाऱ्या गोष्टी टाळता नाही येत.मनाचा कंट्रोल आपल्या हातात असला तरी....अचानक मनात येणाऱ्या विचारांना आळा घालणे सहज शक्य नसतं.
@सोनाली कुलकर्णी
मनाचंसामर्थ्य

#मनाचंसामर्थ्य

क्षणभर मागे वळून पाहिलं की,
"पूर्वीचे आपण आणि आजचे आपण "
यामध्ये बदलत गेलेलो आपण याचा ग्राफ.....आणि मधल्या घडून गेलेल्या असंख्य गोष्टी ,घडामोडी, सुख दुःखाचे क्षण....आलेले चढउतार....एका चित्रफिती सारखे डोळ्यासमोरून झरकन निघून जातात...

प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येऊन गेलेले असतात की ,त्यावेळी पूर्ण नकारात्मकता आपल्या भोवतीने असतानाही आपण तरून निघून सकारात्मक झालो,त्या त्या  प्रसंगातून त्रास झाला तरी व्यवस्थित सही सलामत बाहेर पडलो.आपल्या आयुष्याचा आपणच आनंद शोधत शोधत इथे पर्यन्त आलो आहोत.
आणि मग एक जाणीव होते,
आपल्यात प्रचंड potential आहे कोणत्याही परिस्तिथीला सामोरे जाण्याचे.कोणत्याही गोष्टीला साकार करायला जिद्द जितकी महत्वाची असते तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे "मनाचं सामर्थ्य"
कारण गोष्ट,प्रसंग कोणताही असो मनानं एखादी गोष्ट  खंबीरपणे ठरवली की...वेळ लागेल पण सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तश्या घडू शकतात,साकार होऊ शकतात.
फक्त आपल्या मनाची इच्छाशक्ती प्रबळ हवीय.

इच्छाशक्ती प्रबळ असेल तर
कितीही दुःख ,अडचणी वाट्याला आले तरी ...
ते कुरवाळत बसण्याऐवजी....आपण विचारांनी सामर्थ्यवान होतो.आणि अशक्य गोष्टी शक्य करण्याकडे आपण सरसावतो.

म्हणूनच फक्त मन कुमकुवत होऊ न देणे हे प्रत्येकाला जमलेच पाहिजे त्यामुळे अवघड वाटणार आयुष्य सुंदर आपल्यालाही दिसत.
©सोनाली कुलकर्णी

स्पष्ट नकार दिल्याने गोष्टी सोप्या होतात
शब्दांच्या आडून फक्त चालढकल करून
'हो/नाही '
करण्यापेक्षा कधीही स्पष्ट नकार दिलेला कधीही चांगला असतो ,
त्यामुळे अवघड वाटणाऱ्या गोष्टी सोप्या होतात.
@सोनाली कुलकर्णी