आयुष्य आणि कोरोना.....
हल्ली  मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्ठीनंतर 
काश.......???
ह्या शब्दांनंतर प्रश्न चिन्ह सतत नजरेसमोर उभा राहत...
नियती,नशीब ,परिस्थिती ,संकट म्हणून वेळ अशीच निघून चालली आहे.
मार्ग मिळत नाही....
मनात जगण्याची उमीद असली तरी आपलं 
आयुष्य आपल्या हातात राहिलेलं नाही
हे सत्य मनाला दुर्लक्ष करूनही नाकारता येत नाही...
परिस्थिती हाताबाहेर जशी जास्त जातीय तसे
मन सुन्न होतय....

तरीही....
हाताची बोट सारखी कुठे असतात तसेच  सगळीच आयुष्याची वर्ष कुठे सारखी असणार ,आयुष्यात चढउतार हा असणारच,
काही दिवस, काही महिने ,एखादं वर्ष  असच खराब असणारच ,
असे म्हणत मनाला समजवत,
 हेही वर्ष आलं तस ,निघूनही जाईल....कदाचित पुढचं वर्षही असेच असेल... असेही मनाशी घट्ट गाठ बांधून चालायला हवंय...
सध्या नियतीचे फासे पलटले आहेत,तरीही
जगण्याची इच्छा ,मला काही होऊ नये याची खटाटोप प्रत्येकजण इथे करत आहेच....
जगलो वाचलो तर...
भविष्यकाळ ....नक्की चांगला असेल ह्या आशेवर....इथे प्रत्येक जण स्वतःच्या आर्थिक ,रोजीरोटीच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्नशील आहे....
अकाली आलेली दुःख विसरण्याच प्रयन्त करत आहेत...
धडपडत ,पुन्हा उभारण्याचा प्रयन्त करत आहे
तरीही शेवटी....प्रत्येकाच नशीब...!
बिघडलेली आयुष्याची घडी पुन्हा सुरळीत व्हायला वेळ तर नक्कीच लागेल पण.....
हातातून अनेक गोष्टी सुटून चालल्या आहेत.
पेशन्स संपत चालले आहेत पण
मनातील विचार चक्र काही थांबत नाही...
काश.....???
ह्या शब्दांनंतर येणारे विचार.....
अस्वस्थ करून जातात..!
@सोनाली कुलकर्णी 
@सोनाली कुलकर्णी - शब्द माझ्या अंतरीचे

#lockdown2021  #coronavirus
8 मार्च महिला दिन.....!!!
8 मार्च महिला दिन.....!!!

सगळीकडे महिलांवर शुभेच्छा देऊन आज वर्षाव सुरू असण्याचा दिवस . व्हाट्सउप ,फसबूक इनबॉक्स शुभेच्छानी तुडुंब भरलं असेल
चांगली गोष्ट आहे!!!!
पण ह्या शुभेच्छा पाहिल्या की मनात बऱ्याच गोष्टी मन ढवळून काढू लागतात...
खरचं स्त्री ....एक बाई म्हणून सुरक्षित आहे???
रोज ऐकायला येणारे महिला वरचे अन्याय,
रोज अनेक वाईट नजराना फेस करणाऱ्या महिला,
सुशिक्षित असो वा अडाणी असो, वा कॉर्पोरटे मध्ये काम करणारीअसो, कामगार म्हणून नवऱ्याच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला,शेती मजदूरी करणाऱ्या , वा..... रस्त्यावरून जाणारी महिला असो वा ट्रेन ,बस ,रिक्षा ने प्रवास करणारी महिला असो....वा.... इथे सोशल मीडिया वर वावरणारी महिला असो....
कोण safe आहे???
अन्याय, अत्याचार,, अवाजवी छळ, वाईट नजरा, चारित्र्यावरचे शिंतोडे ,धाक,दरारा ....ह्या सगळ्याला प्रत्येकीला सामोरे हे जावंच लागत...मन मोकळे पणाने ,स्वच्छंदी वावरावे म्हणल तरी,एक महिला म्हणून सगळया पाबंदया....महिलांवरच..!
का तर ती स्त्री आहे म्हणून...??
खरंतर..... 
प्रत्येक पुरुषाने आपल्या भोवतीच्या महिलाच नव्हे मग ती लहान मुलगी असो ,कॉलेज मुलगी असो वा म्हातारी बाई असो....किंवा बरोबरीची महिला असो..
प्रत्येकवेळी प्रत्येक महिले मध्ये आई ,बहीण शोधायची गरज नाही पण एक मैत्रीण म्हणून , एक बाई म्हणून तर प्रत्येक स्त्रीला आदर देण्याची गरज आहे....!कुणालाही तुमच्याशी बोलताना भीती वाटू नये,तुमचाही आदर वाटावा ,एक सपोर्ट वाटावा असे वावरायला हवे.आणि असे झाले तर बरेच महिलांच्या बाबतीत होणारे विचित्र प्रकार थांबतील.

वरचा मुद्दा कॉमन आहे पण मला अजून एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे...
प्रत्येक पुरुषासोबतच,प्रत्येक बाईने ,दुसऱ्या बाईचा आदर करणे गरजेचे आहे...
हल्ली .....बाईच बाईची दुष्मन असल्यासारखी वागते..बाईच बाई विरुद्ध कटकारस्थान करताना दिसते.खरंतर प्रत्येक महिलेने स्वतःला समजावले पाहिजे ,आपण दुसऱ्या महिलेला रिस्पेक्ट दिला तर आपल्यालाही मिळेल आणि
इतरही दुसऱ्या महिलांना रिस्पेक्ट देतील.
माणूस जन्म एकदाच मिळतो असे म्हणतात...
मग प्रत्येकीने समोरच्या महिलेला नका मानू मैत्रीण ,सखी ,सून ,मुलगी ,बहीण पण तिच्यातल्या स्त्रीत्वाचा आदर करा.आपुलकीही नका दाखवू पण....तिचे पाय नका खेचू ,तिला तुम्हीच नका नावं ठेवू ,तिच्या चारित्र्यावर तुम्हीच शिंतोडे नका उडवू.
कारण जेव्हा आपण कुणा एकीला बोलत असतो तेव्हा आपल्या बद्दलही चार व्यक्ती बोलत असतात.
आपणच आपल्याला बदलायला हवं!
तरच सासूने सुनेचे केलेलं छळ थांबतील ,आजही सुरू असलेली हुंडाबंदी थांबेल,मानसिक हराष्मेंट थांबेल.स्त्रीला एक स्त्री म्हणून वेगळा सन्मान मिळेल ,एक महिला खंबीरपणे दुसरीच्या मागे उभी आहे हे  समजलं तर तिच्यावरचे अन्याय अत्याचार कमी होतील.

नुसते एक दिवस शुभेच्छा देऊन काही नाही होणार.
प्रत्येकाने आपल्यातली माणुसकी जागी केली पाहिजे.स्त्रीच्या स्त्रीत्वाच,तिच्या कामाचं, तिच्यात असलेल्या शक्तीचा,तिच्या आईपणाचा एक माणूस म्हणून  कौतुक,आदर पूर्ण वर्षातले 365 दिवस केला तरच हा महिला दिन सार्थकी लागेल.
तरच हा महिला दिन साजरा करणं सार्थकी ठरेल.

तूर्तास मैत्रिणींनो,

स्वतःतील "ती" भरकटुन न देता "ती"ला जपा!!
स्वतःची काळजी घ्या.अन्याया विरुद्ध लढा.स्वतःच अस्तित्व टिकवून ठेवा!
समस्त महिलांना, जगतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!!!😊😊

@सोनाली कुलकर्णी 
@सोनाली कुलकर्णी - शब्द माझ्या अंतरीचे 
#internationalwomensday #womensday #स्पंदनकविता
मराठी राजभाषा दिवस ....यानिमित्ताने लेख
सध्या गेली पूर्ण वर्ष बंगलोर मध्ये वास्तवास आहे
पण आपलं मन जस आपल्या माणसामध्ये गुंतलेलं असत त्यांच्यासाठी झुरत असतं तसच परराज्यात गेल्यावर आपल्या राज्यभाषेबद्दलही झुरत....

आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात गेल्यावरच आपल्या मराठी भाषेची  खरी गोडी कळते......
मग आपल्याही नकळत इंग्लिश हिंदी बोलता बोलता मराठी शब्द तोंडात येतो तेव्हा .....जाणवत मराठी भाषेशी जोडलेली आपली नाळ किती घट्ट आहे ते....

खेळताना मुलं इंग्लिश मध्ये भांडतात .....पण ती भांडण भांडण नाही वाटतं..... संथ पाण्यावर तरंगणाऱ्या पानासारखी वाटतात... आणि मग जाणवतं आपल्या मराठी भाषेत किती .....जिवंतपणाआहे.
आपला....राग ,दुःख सुख आनंद सगळं सगळं काळजापर्यंत पोहचवते आपली मायबोली.

Don't do beta ,ऐसा नहीं करनेका beta
पेक्षा 
"असं नाही करायचं हं बाळा" म्हणलं की 
न रागवताही समजुदार पणाने सांगणे फक्त आपल्या मराठी भाषेतच आहे.....

Come early, ,जलदी आ जावो
पेक्षा लवकर येशील ना??म्हणल की
पुढे मी वाट पाहतेय हे न सांगता आपण सहज सांगून जातो....


रोजच खाली नवीन ओळखीची झालेल्या मैत्रिणी भेटल्या की अनेक शब्द ,वाक्य रचना......
प्रत्येक क्षणाक्षणाला आठवतात,आपुलकीच्या वाटतात पण बोलता नाही येत.
इथे इंग्लिश
बोलण्याशिवाय   पर्याय नाही उरलेले आम्ही मराठी 
मराठी माणस शोधतो मराठी बोलण्यासाठी...

आपण आपल्या महाराष्ट्रमध्ये हिंदी लोकांच्या भाषेत हिंदी बोलतो पण इथे परराज्यात आपली भाषा कुणी शिकायचाही प्रयत्न कधी करताना दिसत नाही
ते स्वतःच्या भाषेबद्दल जराही तडजोड नाही करत....
पण आपण महाराष्ट्र मध्ये करतो....
हे मला क्षणोक्षणी जाणवत.....

आज मराठी राज्यभाषा दिनाबद्दल सर्वांना सांगावं वाटतं
आपणच आपल्या भाषेला पाहुण्यांसारख नको वागवायला...
आपला मराठी बाणा ताट ठेवून फक्त मराठी भाषाच बोलू...
"मी मराठी ,माय मराठी "
हे ब्रीद वाक्य सार्थ करू आणि नवीन पिढीलाही त्याची गोडी लावू...!!
आपल्या मराठी भाषेचा गोडवा आपणच जपू....!!
@सोनाली प्रसाद कुलकर्णी

मौन....
मनातलं प्रेम मनातच जळत राहत....
तेव्हा मौनाशिवाय पर्याय नसतो कारण...
व्यक्त होण्यापेक्षा विरहात जळणाऱ्या मनाला मौनानेच फुंकर घालणं जास्त गरजेच असत.
@SpandanKavitaa 
#म
#मराठी 
#मनातलं
#RTmarathi
स्पर्श...
न बोलताही स्पर्श खूप काही बोलून जातो....
@सोनाली कुलकर्णी

Follow me on instagram @spandankavitaa 


#marathiqoutes #marathilovequotes 
#charoli #marathicharoli #maharashtra_ig  #mumbaibloggers #marathikavitaanicharoli #marathikavita #qoutesoftheday
#photographylovers #lovequotes #happyworldphotographyday 
#म #मनातलं  #photography #photooftheday #marathilovequotes #gulzar #kavita #marathikavitablog #instashayri #spandankavitaa #marathicharoli  #marathiwriter #positivequotes #positivevibes  #punekar_rocks #qoutesoftheday

आयुष्यात एकतरी हक्काचा कृष्ण असावा
फ्लॉवरच्या भाजी मधल्या  कुठे कुठे लपून बसलेल्या ,सहजासहजी न दिसणाऱ्या
आळ्या शोधून काढायला 
आपलं मन आणि नजर दोन्ही स्थिर लागतं तसंच ,
आपल्याही मनातल्या नाकारात्मक विचारांच्या
आळ्या काढून टाकायला....
आपल्या मनात स्वतःच अस्तित्व कोरलेला,
आपल्याला हवा असणारा ,
सखा सोबती....
कृष्ण असावा लागतो....
जो आपलं विचलित मन स्थिर करेल
जो योग्यदिशेने आपल्याला घेऊन जाईल आणि कायम साथ देईल!!
@सोनाली कुलकर्णी
@सोनाली कुलकर्णी - शब्द माझ्या अंतरीचे

(Pc: खालील सदर कृष्णाचे painting  कुणीतरी रमेश पटेल म्हणून आहेत यांनी हे oil painting काढलं आहे...)
प्रेम...

सारं काही संपलेलं आहे ,
याची जाणीव झाल्यावरही तेच
प्रेमाचं चित्र मनात पुन्हा रेखाटन ,
तीच स्वप्न पुन्हा बंद डोळयांनी पाहणं ...
वेडेपणा आहे खरा पण,
कदाचित हेच निर्व्याज प्रेम असावं.
@सोनाली कुलकर्णी


विरह
काही क्षणाचा,तासांचाही विरह 
सहन न व्हावा ,
इतकं प्रेम कधीच कुणावरही असू नये...
कारण एकंदरीतच हा प्रेमाचा प्रवास....
फार स्वतःसाठी त्रासदायक असतो.
@SpandanKavitaa 

#म #मराठी #शब्दकिमया #शब्दकट्टा #प्रेम