#भीती....

पार्किंगचा चढ...तस तर ह्या चढावरून कित्येकदा  two wheeler चढून जाते....पण असा काही अनुभव गेल्या कित्येक दिवसात आला आहे की,
मी जेव्हा जेव्हा  गाडी काढून बाहेर पडायला लागते आणि मनात येत की हा मोठा चढ आपण चढुचं नाही शकणार त्या त्या वेळी....
माझी गाडी मधेच चढावर जाऊन अटकते, वरती चढतंच नाही....गाडी सावरण कठीण होत....
परिणामी.... मी पुन्हा गाडी बंद करते ,स्लोप वरून पुन्हा खाली घेताना ती झरकन खाली येते.मग गाडी खाली घेवून पुन्हा स्टार्ट करते ,आणि पुन्हा चढ चढायला जाते तर तिथेच जाऊन अडकते....
कालही same तसच 3 वेळा झालं..
शेवटी अहोनां बोलावलं ,त्यांनी 2 min मध्ये गाडी चढवून बाहेर काढली...पण मला शेवटपर्यंत जमलंच नाही.
तसं पहायला गेलं तर मी नेहमीच तिथून गाडी नेते...
पण ज्या ज्या वेळी मनात माझ्या भीती  निर्माण होते की आपण हे नाही करू शकणार त्या त्या वेळी हे असंच होत...

आपल्याला काही घडणाऱ्या गोष्टी दिसत असतात ,जाणवत असतात ,कळतही असतात  पण आपण त्यावर काहीच बोलू शकत नाही कारण... आपल्या  
"मनात त्या गोष्टीबद्दल जी अनामिक भीती असते " 
ती खरंच खरी झाली तर??
हा प्रश्न त्या त्या वेळी आपल्या डोळ्यासमोर.... घिरट्या घालत असतो.

आपलं mindset मध्ये जे फिक्स झालेलं असत तेच घडत असतं .जो मी अनुभव अनेकवेळा अनुभवला आहे...अगदी वेगवेगळ्या गोष्टी संदर्भात की मनातली भीती अनेकदा खरी ठरते...

आपण कितीही म्हणालो निगेटिव्ह विचार करायचा नाही तरी देखील एखादी गोष्ट अचानक मनात कुजबुजून जाते आणि ती गोष्ट तथास्थु म्हणाल्या सारखी खरी होते....
याच कारण काय काय असावं याचा विचार मी प्रत्येकवेळी करते....पण उत्तर काही मिळत नाही .

कदाचित
आपण त्यावेळी मनाने स्थिर नसतो, किंवा  एखादी गोष्ट आपल्याला  जमणार नाही,मिळणार नाही,किंवा आपल्या हातातून निसटून जाणार ...अश्या अनेक गोष्टीची मनात भीती असू शकते.
आणि भीती म्हणजे नकारात्मक विचारांचंच खरं कारण असतं हे अनुभवावरून समजूनही घडणाऱ्या गोष्टी टाळता नाही येत.मनाचा कंट्रोल आपल्या हातात असला तरी....अचानक मनात येणाऱ्या विचारांना आळा घालणे सहज शक्य नसतं.
@सोनाली कुलकर्णी

1 comment:

  1. Khara aahe ... bhitila aawar ghalta yeto pan vicharanchya vegala adavna kathin jate...

    ReplyDelete