Recent Posts

किती सांगायचय तुला.....(story) / Love Letter - Kiti Sangaychy tula

Penulis : SpandanKavita on Wednesday, 20 September 2017 | September 20, 2017

Wednesday, 20 September 2017

किती सांगायचय तुला.....(story)ते दोघ..एकेकाळी एकमेंकामध्ये रमुन जाणारे आज त्याच्यात एव्हडा दुरावा निर्माण झालाय ना आज ते एकमेकांशी दोन शब्दपण निट नाही बोलु शकत......माघार कोण घेणार...?आपल्यात काय राहिलय बोलण्यासारख.?....

तो तिला म्हणे पहिल वाटायचं तुझ्या बद्दल....आता काहिच वाटत नाहि....जे काहि भुतकाळात घडलं ते दोघांच्या mutual  understanding  ने झालं...तु मला दोष देऊ नकोस....आणि विसरुन जा सगंळ....वर्तमानात जगायला शिक...नीट वाग....

त्यावर तिने त्याला लिहिलेल पञ....

प्रिय......
काहि बोलण्यासारख नाहि राहिल आपल्यात  तरीही हा माझा शेवटचा प्रयत्न.....
किती स्वतांच्या सोईच बोलतोस.तु......माझ लग्न झाल तेव्हा का नाहि केलास हा विचार ...हा जर आधि केला असतास तर आज तुझ लग्न झाल्यावर  तुला आणि मला ञासच नसता झाला.......मलापण भूतकाळात नाहीच जगायचं पण तू आणि तुझ वागण भाग पाडत  वागायला ....मला काय हवाय हे समजूनच  घ्याययचं नाही ठरवलंय  का तू ....??
मला हवाय माझ्या भूतकाळात मध्ये असलेला तू ...जश्याचा तसा ....माझी कुठेतरी काळजी करणारा ,,,,,माझ्यावर थोड तरी प्रेम करणारा,,,,,माझ्या भावनांचा respect करणारा ,,,,,,हो मी तुझी अर्धांगिनी नाहीये पण तशी treatment  तू मला दिलीयस न कधीतरी ,,,,,,,मी तुला तुझ सर्वव्स नाही मागत रे,,,पण तुझ्या मनात हृदयात माझ्यासाठी एक जागा आहे कायमची ,,,,कळू दे न मला कधीतरी ....कस असत माहिती का तुला ,,.एखाद्याच्या इच्छा अपूर्ण राहिल्यानां कि सगळ्यांनाच त्रास होतो ,,,,,तुझ्या
शब्दांवर, तुझ्या स्पर्शावर मी उभी राहिले,,पुन्हा ,,.तुला माहिती हे ,,,तू माझा आधार आहेस ,,,.,आई बाबा नंतर मी कुणाला इतक महत्व दिल असेल तर तुलाच ,,,फक्त असे तू मला पोरख नको न करूस ..

तुझ्याकडून जास्त अपेक्षा नाहीये माझी ,,तू मला थोडीतरी किंमत द्यावीस असे वाटत ,,,,रस्तावर पडलेल्या कुत्रासारख नको न वागूस ,,,avoid  करायचं मला पण जमतं तुझ्यासारखं पण तुझा विचार येतो तुला कस वाटत असेल ??

आपल्या नसलेल्या नात्याचा पण चोथा झालाय .,सगळ एकतर्फी झालाय आता ,,,तुला वाटत तुझा संसार मोडेल ,,तिचा विश्वासघात कसा करू?,..हम्म्म ...मग मी पण केलायचं न विश्वासघात कुणाचा तरी ,...पण का केला?कुणासाठी केला?
तस तर मलापण काहीच गरज नव्हती असे वागायची ,,.झाल असत सगळ नीट थोडे दिवस लागले असते  पण जीव अडकलाय न तुझ्यात ...

तुला वाटतय मी सहज बाहेर पडाव सगळ्यातून पण तेवढ शक्य आहे का?,..तू पडला असशील सगळ्यातून बाहेर पण नाही म्ह्नटलं तरी होतेच मी तुझ्यासोबत ..४-५ दिवस गायब झाले तरी सांगून सवरून गायब व्हायची ,...मी कधीच तुझ्यासारखं Avoid नाही केल ....मला काळजी वाटायची मी माझ्या स्वार्थासाठी करेन पण त्याची झळ तुला पोचली तर मला महागात पडेल कारण  मी तुझ्या सोबत नाही .
तुझ्या सोबत नसण्याच किती दुख झेललंय तुला सांगून नाही पटणार ,....

तुझ्यावर मी Depend नाहीये ....किवां तुझ्या शिवाय चालू शकत नाही असेही नाही ,..पण तुझ्या आठवणी मला जगू नाही देताय ...हि कातरवेळ आहे न ती घेऊन जाते तुझ्या आठवणीत ..मग आठवत तुझ माझ्या आयुष्यातलं स्थान ,,..

माझ प्रेम खोट कधीच नव्हत ,,..तुझ्या साठी जे काही करायचं ..ते सगळ केलय मी माझ ,कर्तव्य समजून .....आणि तू पण मला खूप काही दिलयस ,.म्हणून तर आठवणी आहेत ...

आहोत जिवंत तर प्रेम तसच टिकून ठेवायला काय हरकत आहे,...??त्याला पैसे तरी नाही द्यावे लागत.

तू तुझ कर्तव्य ,..कर तुझ्या Priorities जप ...माझा त्याला विरोध नाहीये ...पण कस आहे ना ,,..,दुसर्या तिसर्या priorities न मान असतो किंमत असते ,..त्यांना ,.असे useless बनवून नाही चालत,मी असे केले असते तर तू माझ्या आयुष्यातच नसतास आज.

जगासमोर तीच तुझी बायको आहे ,,,,पण मनात तरी  राधेची जागा दे मला .तुला विसरेन ना मी तो  माझा शेवटचा श्वास असेल ...मला
भेटायच तुला शेवटच बघ तेवढातरी न्याय दे मला.

तुझीच....
(तु मानलस तर..)

@pragatikul(17/4/2016)
comments | | Read More...

Love Letter

Penulis : SpandanKavita on Friday, 1 September 2017 | September 01, 2017

Friday, 1 September 2017

प्रेमपत्र १ :तुझ्या इच्छा, तेच माझं स्वप्न 


प्रत्येक बायकोची /प्रेयसीची आपल्या नवऱ्याच्या /प्रियकराच्या इच्छा बद्दल व्यक्त होणार सुंदर पत्र..माझ्या लेखणीतून...
प्रिय...
तुला स्वप्नं पहायला नाही आवडत ,पण मला तुझ्यासाठी स्वप्नं पाहायला खुप आवडतं.....कारण
तुझ्या एक एक इच्छा ,आंकाक्षा सत्यात उतरताना मलाही पहायचंय...
त्या उत्तुंग उंचाईवर ....तू बहरतांना मला पहायचंय..तुझ्या चेहर्यावरचा सुखद आनंद मनाच्या कप्यात कोरुन ठेवायचायं.....
जे तुझ ध्येय आहे...तिथेपर्यंत पोहचण्यासाठी...मी आहे ना तुझ्या सोबत....तुझी ऊमेद वाढवण्यासाठी....खचलास तर तुला परत ऊभारी देण्यासाठी....मला तर तुझ्या इच्छा पुर्णत्वाला नेण्यासाठी तुझी ताकद बनायचंय...तुझ्या त्या प्रत्येक क्षणांचा साक्षिदार बनायचंय....
मला माहीतीय...आजवर तुला काहीच मिळाल नसेल लवकर पण.....तू प्रयत्नांची पराकाष्ठा करतोयसच ना....
तुला नाही आवडत तर नको बघूस तू स्वप्नं पण.. माझ्या स्वप्नांना तू तर नक्कीच पुर्ण करतोस ना नेहमी....म्हणुनच मी तुझ्या इच्छांना माझी स्वप्न बनवलीत...
अन् मला नक्की माहीतीय....
तू माझ्या प्रेमासाठी....माझ्या स्वप्नांसाठी अटोकाठ प्रयत्नशील राहशील...ती फक्त सत्यात आणण्यासाठी..तू नक्कीच प्रयत्न करशिल..आणि आहेच ना मी तुझ्यासोबत तुझी सावली बनून....अगदी माझ्या शेवटच्याश्वासांपर्यंत.....
तुझ्या ध्येलाला नवी पालवी फुटावी,
तशी स्वप्ने माझी पुर्ण व्हावी ..
यशकिर्ती मिळता तुजला,
तुझी इच्छा सारी पुर्णत्वेला यावी..
फक्त तुझीच,
सखी,सोबती...मितवा
स्पंदन@सोनाली कुलकर्णी
comments | | Read More...
 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>