रांजणवाडी प्रकरण....

 8 दिवसांपूर्वी उजव्या डोळ्याला बारीक फोडी जाणवली.मला वाटलं रांजणवाडी आली असेल मग मी लगेचच शेकायला सुरुवात केली.की जेणेकरून रांजणवाडी येणारच नाही .
पण शेकून काही उपयोग झाला नाही 4 थे दिवशी रांजणवाडी मोठी झाली पुन्हा लसूण लावणे ,कोरफड गर लावणे ,चहा पावडर गरम करून शेकने ,डाळीने गरम करून शेकल.
5 वे दिवशी अजूनच मोठी होऊन ,चेहरा ,डोळा सगळंच सुजल.एकदम मी चिनी दिसायला लागले😂पण
डोळा अतिशय जास्त ठसठसायला लागलं.डोळा उघडणे पण शक्य होईना

आज 7 दिवस झाले ,शेवटी काही घरगुती उपायाने फरक पडेना म्हणून डॉक्टर कडे जाऊन आले.
डॉक्टरांनी सगळी हिस्टरी विचारली ,8 दिवसांपूर्वी मी काय काय केलं ,काही चावल होत का....
डॉक्टरांनी त्यांच्या मशीनरीवर पूर्ण चेक केलं ,तर त्याना काहीतरी डोळ्याला bacterial infection झाल्याच दिसलं तेही काहीतरी चावल्यामुळे जंतू संसर्ग झाला आहे असे म्हणाले.
तर असे झाले होते की,
गेल्या आठवड्यात गणपती साठी दुर्वा हव्या होत्या म्हणून बिल्डिंग भोवतीने हराळी(दुर्वा)काढल्या. त्यानंतर घरी आल्यावर दुर्वा निवडल्या होत्या .
तर ते करताना ...मला काही कळलं नाही पण,
बहुतेक तेव्हाच काहीतरी डोळ्याला चावल असावं..किंवा मी त्या दुर्वांचा हाथ डोळ्याला लावला असावा.
डोळा चेहरा प्रचंड सुजला आहे.औषध घेऊन फरक पडेलही आता पण
मी आपली रांजणवाडी समजून  5-6 दिवस तसेच काढले.लगेच डॉक्टर पाहिला असता तर जास्त वाढलं नसत.

पोस्ट लिहिण्याचा उद्देश हाच की मैत्रिणींनो,
दुखणं कोणतंही असो
अगदी कोणत्याही अवयवाच असो...सहन करण इतकं सोपं नसतंच पण आपणच आपले डॉक्टर होऊन ज्यावेळी आपल्यावर उपचार करतो त्यावेळी आपल्याला नेमकं आपल्याला काय झालं असेल याच ज्ञान नसतं.
म्हणूनच काहीही व्हायला लागलं की पहिले डॉक्टर गाठावा.
कोणतीच गोष्ट अंगावर काढू नये.
स्वानुभवावरून डोक्यात प्रकाश पडलेली गोष्ट शेअर करावीशी वाटली..कारण प्रत्येकवेळी आपण विचार करतो तश्याच गोष्टी असतीलच असे नाही😊
@सोनाली कुलकर्णी


0 comments: