Happy father's day!!

"बाबा"

बाप म्हणजे आदरयुक्त व्यक्तिमहत्व,
आपल्या पिढीमध्ये आपण आदर द्यायचा म्हणजे अहो जावो करून बाबांना बोलवायच.
मग तसही बाबा म्हणल की, तेव्हा प्रेम असायचं पण बाबांबद्दल मनात खुप भितीपण असायची ,सगळ्या गोष्टी फक्त आईजवळच बोलल्या जायच्या.आपण बाबांचे सर्वस्व जरी असलो तरी नात्यात ती थोडीशी अडी असायचीच.

पण काळ बदलला....बाबा नावाची व्यक्ती संकल्पना जरी बदलली नाही तरी त्याच स्वरूप नक्कीच बदल आहे

"अहो बाबांचा" जेव्हा एकेरी "ये बाबा" झाला ना तेव्हा....
 तो जगातला सगळ्यात जवळचा आपल्या मुलांचा मित्र झाला. कोणतंही मित्रत्वाच नातं नात्याला परिपूर्ण करून बोलत करतं.
आणि बाबांना एकेरी नावाने हाक मारली तरी ते चारचौघात दिसायला चांगलं नाही दिसत म्हणणारे अनेक आहेत  पण....त्या एकेरी हाकेवर वसलेलं हे नातं मात्र नक्कीच खूप जास्त घट्ट झालं आहे हे मात्र नक्की खरंय.

खरंतर
पिढ्यांवर पिढ्या बदलत गेल्यातरी,
बापासाठी लिहायला हे आभाळही कमी पडेल...
खरंतर एका आभाळाखाली सगळयांनाच सावरण देवाला तरी कुठे शक्यय म्हणूनच त्याने प्रत्येकाला  सावरायला ,मायेचा हात डोक्यावरून फिरवायला प्रत्येकाच वेगळं आभाळ दिल....आणि ते आभाळ म्हणजेच "बाबा"

आणि ह्या आभाळाइतकं काहीच सुरक्षित नाही .

'बाबा' नावाचं लेबल लागलं की त्या बाबा होण्याच्या आनंदासोबतच आयुष्यभर ,कितीही हळवा ,प्रेमळ असलेला प्रत्येक बाप हा जबाबदारीने ,विचाराने वागतो.बाळाची चाहूल लागताच आईसारखच तोही स्वतःला बदलवतो.
आईने 9 महिने पोटात वागवलं तरी,आपल्या पिल्लाचा तो पहिला रडलेला आवाज येइपर्यंत बाबाच्या जीवात जीव नसतो.आईच्या काळजाचा आपण तुकडा असलो तरी बापाच आपण 'जगणं' असतो,'आयुष्य' बनलेलो असतो.

लहान असतो तेव्हा बाबाच्या अलवार स्पर्शाने सुखावले जातोच पण मोठे होत जातो तसे बाबा अजून दिलासा देणारा हक्काचा मित्र वाटू लागतो.
पावलोपावली आयुष्य जगताना कितीही, कुठेही अडचण येऊ दे मी तुझ्या सोबत आहे याचा विश्वास म्हणजे बाबा..

मला जे मिळालं नाही ते तुला सगळं मिळवून देईन ,मिळवायला मदत करीन हा ध्यास मनात धरून जगत असतो तो बाबा....

बाबा ,बऱ्याचदा कठोर होतो ,रागावतो,पण बाबा ही अशी व्यक्ती आहे की तो अव्यक्त राहून आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम करत असतो....
फक्त तो नजरेने बोलत असतो.....
ज्याला आपल्या बापाची नजर कळली त्याला "बाप" ही गोष्ट नक्कीच कळली असे म्हणायला काहीच हरकत नाही.

खरंतर 'तो' आहे म्हणून 'आपण' आहोत.
बाबा बद्दल व्यक्त.... 
करायला नुसत्या एका दिवसाची गरज नाहीयेच मुळी.
तो तर त्याची सगळी स्वप्नं  आपल्या नजरेने जगत असतो
क्षणाक्षणाला देवासारखा आपल्या सुख दुःखात आपला आधार बनतो. आयुष्य ताठ मानेने शिकायला शिकवतो.त्याच्या कुवती प्रमाणे आपलं आयुष्य घडवतो.

प्रत्येकाचा बाबा हा "बेस्टच" असतो.
बस फक्त प्रत्येकाने आपल्या स्वप्नांसोबत 
"बापाच्या स्वप्नांना" आपल्या आयुष्यात स्थान दिले पाहिजे...त्याच्यासोबत त्याला गरज असतानाही त्याच आयुष्य जगल पाहिजे.
आणि मग आपला बाबा नक्कीच आयुष्यभर सुख समाधानाने जगेल आणि आनंदी राहील😊

अश्या तमाम बाबांना ,वडिलांना आणि हो लाडक्या बाबालाही,
पितृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!

@सोनाली कुलकर्णी

0 comments: