Love

Penulis : SpandanKavita on Sunday, 20 August 2017 | August 20, 2017

प्रेम....
एका जाणिवेच्या पलीकडे जाऊन जेव्हा नात तयार झालं की तिथे  तू माझा ,मी तुझी,माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सतत सांगण्याचीही खरंच गरज नसते.
ती जाणीवच मुळात आपण एकमेकांसाठी आहोत असेल तर  निष्पापपणे ती डोळ्यातूनच दिसून येते मग तिथे अश्या वरवर वाटणाऱ्या  बेभरोष्याच्या शब्दांची गरज राहतच नाही.
बेभरोष्याच्या म्हणतीय कारण.... वरवर नुसतं माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ते प्रेम नाही होत ना...आजकाल कुणीही कुणालाही हे शब्द म्हणतात......पण ते प्रेम आज आहे ,उद्या नाही अगदी कुणीतरी बेरीज वजाबाकीचा खेळ करावा तसाच असतो....
आजकाल शब्दांची जागाही स्माईलीज ,इमोजीनी घेतलीय.ती गोड गोड चित्र पाहून हुरळून जाणं साहजिकच आहे...हे सार काही मनाला भुरळ घालून जाणार  असंल तरी ते क्षणिक आहे,मृगजळच आहे.तिथे मनाचा ओलावा कितपत असतो हे सांगणे आणि कळणे शक्यच नाही.
आईस्क्रीमसारख वरवर गोड छान वाटणार दिखाऊ ,लगेच वितळून जाणार आणि पुन्हा कधीही पूर्ववत न होणार प्रेम काय उपयोगाच??
खरंच प्रेम इतकं सोपं असतं का??नक्कीच नाही
खरं प्रेम म्हणजे कंमीटमेंट असते...
एका मनाने दुसऱ्या मनाला दिलेली.
तिथे एकमेकांच्या भावनांचा आदर असतो ,अगदी मनातलं जश्याच्या तसं नाही पण 'त' म्हंटल्यावर ताक भात असेल हे कळण्याइतकं प्रामाणिक नक्कीच असत.
जिथे एकमेकांच्या भावनांचा आदर असतो तिथे एकमेकांना टाळण्याचा प्रश्नच नसतो .आणि हा प्रश्नच उद्घभवला नाही तर ते नातं सहज सोपं आणि सुंदर होत.तिथे संवादही सरळ नीट होतो,प्रत्येकवेळी आपल प्रेम सिद्ध करायची गरजही भासत नाही.आपलेपणाचा ओलावा टिकून राहतो.
नुसतं एकमेकांच्या सोबत असण्याचाही शाश्वत आधार वाटतो.तिथेच खरं प्रेम असतं.
स्पंदन @सोनाली कुलकर्णी
Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>