Home » , , , » विसरले होते तुला, पण आज पुन्हा आठवलास...

विसरले होते तुला, पण आज पुन्हा आठवलास...

Penulis : SpandanKavita on Monday, 21 August 2017 | August 21, 2017

विसरले होते तुला, पण आज पुन्हा आठवलास...


विसरले होते तुला,
पण आज पुन्हा आठवलास...
काळासोबत मागे जाऊन,
थोडासा तो भुतकाळ नव्याने बघितला...
हातात हात होता तुझा,
मनही तुझ्याचसाठी वेडे  होते...
स्पर्श होताच तुझा,
अंग अंग रोमांचित झाले होते...
उबदार तुझी मिठी होताच ,
श्वास ही तुझ्यात गुंतले होते..
क्षणांचही भान न ठेवता,
आपले जीव एकमेकात एकरुप झाले होते..
जगून घेतले ते सारे क्षण,
 पुन्हा तू सोबतही नसताना..
काळ लोटला तरी....
काळजाला हवा फक्त तुला आठवण्याचा बहाणा....
झरकन सारे क्षण डोळ्यासमोरुन निघुन गेले...
भुतकाळ पुन्हा जगताना ,
तुझ्या आठवणीची शिदोरी ताजीतवानी करुन गेले...
-सोनाली कुलकर्णी
Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>