Recent Posts

Home » , » जेव्हा ओळखीचे अनोळखी होतात...

जेव्हा ओळखीचे अनोळखी होतात...

Penulis : SpandanKavita on Wednesday, 30 August 2017 | August 30, 2017

जेव्हा ओळखीचे अनोळखी होतात...

ओळख विसरून अनोळखी होऊन एखाद्यासमोर वावरणं खरंच कठीण असत ना...??
त्यातल्या त्यात ती ओळख जर आपल्या अगदी काळजाच्या जवळची असेल तर स्वतःला सावरणही खूप अवघड असतं.
पण मग त्या समोरच्या व्यक्तीला समजत नसेल का आपल्याला त्रास होतो ते की ,स्वतःच्या "स्व" पेक्षा काहीच महत्वाचे नसते आयुश्यात त्यांच्यासाठी...??
"खरं तर दुसऱ्याच मन जाणायलाही मोठं मन लागतं..."
हे ज्यांच्याकडे नसतं तेच फक्त समोरच्या व्यक्तीची अशी कुचंबणा होताना पाहू शकतात..
कदाचित त्यात त्यांना आनंद मिळतं असावा...
कसं असतं ना..काही काही वेळा आपण परिस्तिथी समोर हतबल असतो आणि फक्त गोष्टी सहन करतो ....
पण "आपण कसं वागायचं हे फक्त आपल्या हातात असतं बाकी इतरांनी कसं वागावं हे आपण कसे ठरवू शकतो "
चालायच,व्यक्ती तितक्या प्रकृती असतातच
कदाचित त्या व्यक्तीलाही आपली गरज कधी तरी पडेलच की.
आपण मात्र काळ ओसरण्याची वाट पहायची.
@सोनाली कुलकर्णी
Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>