Recent Posts

Home » , » Love Letter

Love Letter

Penulis : SpandanKavita on Friday, 1 September 2017 | September 01, 2017

प्रेमपत्र १ :तुझ्या इच्छा, तेच माझं स्वप्न 


प्रत्येक बायकोची /प्रेयसीची आपल्या नवऱ्याच्या /प्रियकराच्या इच्छा बद्दल व्यक्त होणार सुंदर पत्र..माझ्या लेखणीतून...
प्रिय...
तुला स्वप्नं पहायला नाही आवडत ,पण मला तुझ्यासाठी स्वप्नं पाहायला खुप आवडतं.....कारण
तुझ्या एक एक इच्छा ,आंकाक्षा सत्यात उतरताना मलाही पहायचंय...
त्या उत्तुंग उंचाईवर ....तू बहरतांना मला पहायचंय..तुझ्या चेहर्यावरचा सुखद आनंद मनाच्या कप्यात कोरुन ठेवायचायं.....
जे तुझ ध्येय आहे...तिथेपर्यंत पोहचण्यासाठी...मी आहे ना तुझ्या सोबत....तुझी ऊमेद वाढवण्यासाठी....खचलास तर तुला परत ऊभारी देण्यासाठी....मला तर तुझ्या इच्छा पुर्णत्वाला नेण्यासाठी तुझी ताकद बनायचंय...तुझ्या त्या प्रत्येक क्षणांचा साक्षिदार बनायचंय....
मला माहीतीय...आजवर तुला काहीच मिळाल नसेल लवकर पण.....तू प्रयत्नांची पराकाष्ठा करतोयसच ना....
तुला नाही आवडत तर नको बघूस तू स्वप्नं पण.. माझ्या स्वप्नांना तू तर नक्कीच पुर्ण करतोस ना नेहमी....म्हणुनच मी तुझ्या इच्छांना माझी स्वप्न बनवलीत...
अन् मला नक्की माहीतीय....
तू माझ्या प्रेमासाठी....माझ्या स्वप्नांसाठी अटोकाठ प्रयत्नशील राहशील...ती फक्त सत्यात आणण्यासाठी..तू नक्कीच प्रयत्न करशिल..आणि आहेच ना मी तुझ्यासोबत तुझी सावली बनून....अगदी माझ्या शेवटच्याश्वासांपर्यंत.....
तुझ्या ध्येलाला नवी पालवी फुटावी,
तशी स्वप्ने माझी पुर्ण व्हावी ..
यशकिर्ती मिळता तुजला,
तुझी इच्छा सारी पुर्णत्वेला यावी..
फक्त तुझीच,
सखी,सोबती...मितवा
स्पंदन@सोनाली कुलकर्णी
Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>