Home » , , , , » "पाऊस ,तू आणि मी" / Rain ,U & Me

"पाऊस ,तू आणि मी" / Rain ,U & Me

Penulis : SpandanKavita on Tuesday, 10 October 2017 | October 10, 2017

"पाऊस ,तू आणि मी"

आज आभाळ खुप भरुन आलेलं ...
मनात वाटत होत...जोराचा पाऊस यावा..
तुझ्या बाईकवरुन तुला घट्ट पकडुन बसावं .... अन् तुझ्यासोबत चिंब पावसात भिजाव...!!

अशीच मी माझ्याच छान विचारात तल्लिन झाले
असताना..
तेवढयात तु मला विचारलंस...
"काय ग येतेस का माझ्या सोबत माझ्या बाईकवरुन.??" 
काय सांगु तुला ,हे सारे शब्द माझ्या कानावर पडताच किती मी सुखावून गेले .
कश्याचाही विचार न करता तुला " हो " पण म्हणाले.
अन् तुझ्यासोबत बाईकवरुन निघताच पावसाची सुरुवात झाली....
तू म्हणालास...पाऊस यायला लागलाय....थांबायचं का थोडावेळ??"

मी ....."नको,नको थांबायला" म्हणताच तूही किती गोड हसलास..आणि म्हणालास घट्ट पकडून बसं...नाहीतर पडशिल...
वाह....
"पाऊस ,तू आणि मी"
अगदी मलाही हेच हवं होत...

किती सगळं सुंदर वातावरण अगदी मनाला धुंद करणारं...!!
ह्या पहील्या पावसात तुझ्यासोबत भिजताना माझ्या ओठांवरची लाली जाण्याऐवजी अजूनच चढावी इतकी मी आंनदी झाले.... 
"जणु काही "पावसाला " आणि "तुला" माझ्या मनातलं सार काही कळाल असावं..... "
अगदी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी  जश्याच्या तश्या घडत होत्या.....

किती सगळं रोमँटिक .....चिंब चिंब भिजलेले आपण...गालावरुन ओघळणारे ते पावसाचे थेंब .... ओले झालेले कपडे....हवेतला वेडावून  टाकणारा तो गारवा आणि  तुझा अलगद झालेला स्पर्श.....सगळं कसं स्वप्नंवत होत....पण मी कशाचाही विचार न करता
मी माञ तुझ्यात वहावत होते...

खुपच खुश होते..फक्त तुझ्यामुळेच....!!!
तुझ्यासोबतचे आजचे सारे हे क्षण मनात माझ्या साजरे करत होते .
स्पंदन @ सोनाली कुलकर्णी
Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>