Home » , , , , , , , , , » कुणाला किती गरज होती हे नक्की कळेल....

कुणाला किती गरज होती हे नक्की कळेल....

Penulis : SpandanKavita on Friday, 26 January 2018 | January 26, 2018
निवांत बसलाच आहेस तर
काॅल लाॅग चेक कर
आऊटगोईंगला इनकमिंगने भाग
आणि उत्तर धक्कादायक अाले तरी
संयत,संतुलित वाग
कोणाला कोणाची
किती गरज होती,आहे,असेल?
आरसपानी प्रश्न आहे
उत्तर ... आरशातच दिसेल
@ Vaibhav Vanita joshi

किती खराखुरा विचार आहे ना हा...
आपणच आपल्या आयुष्यातल्या व्यक्तींना माझं माझं  म्हणत कुरवाळत बसतो....
आपण पुढाकार घेतला तर काय फरक पडतो ह्या विचारात असतो.सतत स्वतःहुन संवाद साधत रहातो.
पण खरच आपण इतकं महत्त्व देण गरजेच असत का असा प्रश्न निर्माण होतो खरा...कारण नेहमी एखादं नातं असो वा नुसती मैञी असो टिकवण्याची गरज आपल्यालाच का असावी???आपण त्या व्यक्तींवर अवलंबून असतो कि त्याच्यांमध्ये वहावत जातो ???

आपण समजतो आपण महत्त्व जास्त दिल्याने ती व्यक्ती आपल्या सोबत सतत राहील किंवा आपल्याला गरज पडेल तेव्हा उपलब्ध होईल...पण नाही ....ही स्वतःची समजूत करुन घेण 100%चूक आहे...
तसं तर जगात कुणिच कुणाचे नसतं....

"जन्माला एकटे येतो,मरतानाही एकटेच जातो....
"जोडतो जे जिवंत असताना ते क्षणभंगूर,क्षणिक,कधीतरी संपणारच असतात.....मतभेद अविश्वास,स्पर्धा ,चढाओढ,कुचकेपणा सुरु झाल कि सगळं संपत. मग रहातं ते 'तडजोड'करुन एक निर्जिव नातं."

फक्त आपण त्यांना 'आपलं' अस नावं देऊन स्वतःचीच फसवणूक करत असतो...सगळ्यांसोबतचे चार  आंनदाचे क्षण जे मिळतील तेव्हढेच आपले समजून जास्त अपेक्षाचा इतरांकडून डोलारा उभा न करता आयुष्य जगलं तरच किती कुणाला कुणाची गरज होती ह्या प्रश्नांचा नक्किच ञास नाही होणार.
स्पंदन@ सोनाली कुलकर्णी
Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>