Home » , , , , , , , » एका नदीचे समुद्रात विलीन होतानाचे भाव.....

एका नदीचे समुद्रात विलीन होतानाचे भाव.....

Penulis : SpandanKavita on Friday, 26 January 2018 | January 26, 2018


एका नदीचे समुद्रात विलीन होतानाचे भाव.....
*******************************
तुझ्यात विलीन होण्यासाठी माझ्यासारख्याच वाहणार्या,तुझ भरभरुन कौतूक करणार्या,तुझ्या प्रेमात बुडालेल्या....तुझ्या भव्य उदरात मिसळून जाण्यासाठी आतूर असणार्या असंख्य नद्या आहेत....याची कल्पना असतानाही.....मनाशी ठरवलयं.....तूच माझा भाग्यविधाता आहेस.
माझा असा तू एकटा कधिच मला मिळणार नाहीस हे माहीत असूनही माझ तुझ्यावर आजही तितकच प्रेम आहे....

एकदा तुझ्यात एकरुप झाल कि चिंता कश्याचीच नाही.....तुझ्या लाठांसोबत फक्त मनसोक्त जगायचं....हळूच तुझ्या किनार्याला जाऊन बिलगायच अन् तुला मिळालेल्याअसंख्य मैञीणीसोबत तुझ्यातच रमायच....स्विकारलय मी त्यांनाही तुझ्यासोबत फक्त तु हवा आहेस म्हणून ....फक्त तूझ्या भव्यदिव्य,अथांग सागराचा हिस्सा व्हायचय...

मी संथ वहाणारी नदी,
अन् तू माझाच विशाल सागर..
झाले तुझ्याच विश्वात विलीन मी,
असाच सामाऊन घे मजला आयुष्यभर...
स्पंदन@सोनाली कुलकर्णी
Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>