Home » , , , » प्रेम,प्रारब्ध अन... ती व्यक्ती....

प्रेम,प्रारब्ध अन... ती व्यक्ती....

Penulis : SpandanKavita on Saturday, 10 February 2018 | February 10, 2018

आयुष्यात आपल्याही नकळत बऱ्याच व्यक्ती आपल्याला भेटतात, ....मग एखाद्या व्यक्तीच्या चांगुलपणामुळे,समंजस स्वभावामुळे,सुप्त गुणामुळेही ,सहवासामुळे...एखादी व्यक्ती आवडू लागते आणि प्रेम ही होते...मग ते प्रेम आयुष्यभर सोबत असेल,नसेल याची खात्री नसली तरी ...

"ती व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप मनाच्या जवळची होऊन जाते आणि मनात कायम घर करून राहते.
आणि ती तयार झालेली सुंदर सहवासाची फुले आयुष्यभर सोबत करतात फक्त आठवणं बनून ...! "
कुणालाही दोष न देता त्या आठवणींना जपता आणि कुरवाळता आलं पाहिजे...कारण ज्या व्यक्तीचा आपल्या आयुष्यात जितका कालावधी प्रारब्धात लिहिला आहे तितकाच काळ ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि पुन्हा ती वेळ संपताच निघूनही जाते....हे स्वतःच्या मनाला समजावणं गरजेचं असतं.

कधी कधी दोन लोक एकमेकांच्या प्रेमात पडतात ते नेहमी एकत्र राहण्यासाठी नाही तर एकमेकांना आयुश्यात खूप काही शिकवण्यासाठी ,एकमेकांना ग्रो करण्यासाठी...किंवा काही पूर्व जन्माच्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी....आणि एकदा पुरेसे एकमेकांकडून शिकले , की ते निघून जातात आपापल्या मार्गाने...

हा खरंतर हे ही ठीकच आहे..ना..

प्रत्येकाचे आयुष्य जगण्याचे रस्ते वेगळे असतात..
आयुष्याचे प्लॅन्स वेगळे असतात कोणतीही कमिटमेंट नसेल तर आणि दोघांच्याही आयुष्य जगण्याचे प्लॅन्स वेगळे असतील तर ...एकमेकांत मुळात अडकण्यात अर्थच नसतो.निर्माण होणाऱ्या नात्याला भावनिक बेस असला तरी बऱ्याचदा प्रॅक्टिकल होऊन  नात्यांना पहावं लागत.कारण नुसतं भावनिक होऊन आयुष्य जगता नाही येत आणि नातीही टिकवता येत नाहीत.
कारण आपण नियतीच्या हातातले कटपुतले असतो...मग उगाच  स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा 
जे काही त्या व्यक्तीच्या सहवासात मिळाले ,शिकलं गेलं ते सोनेरी क्षण मनावर कोरून ठेवावेत आणि वर्तमान स्वीकारून आणि आपल्या भविष्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि तेच योग्य असतं.
स्वतःसाठी जगणं हे ही खूप महत्वाचे असतेच की ...आपण आपल्या स्वता:वरही प्रेम करतोच ना...
म्हणूनच ,काहीही झालं तरी ....life is going on..so ,jindgi  jio khushise.!!

स्पंदन@सोनाली कुलकर्णी
११-फेब्रुवारी-२०१८

Share this article :

Post a Comment

 
Spandan Kavita | About Us | Contact Us | Site Map | Privacy-Policy |
Copyright © 2017. Spandan Kavita . All Rights Reserved.
>