आईच्या हातच जेवणं म्हणजे स्वर्गसुखच नाही का...

किस्सा आयुषचा.....
गेले एक महिना झालं आयुष फोनवर रोज विचारतो मम्मी काय काय बनवलेस आज जेवायला....मी विषय टाळून त्याला काही रे रोजचंच पोळी भाजी म्हणून सांगत होते...
पण मध्येच एक दिवस त्याने त्याच्या बाबांना विचारलं ....बाबा आज मम्मीने काय बनवलंय....वेळ संध्याकाळची होती ... बाबाने ...सहजचं सांगून टाकले आज "पाणी पुरीचा बेत " आहे
आयुष : बाबा..... नाही नाही...नाही...असे तुम्ही करु शकत नाही...मम्माला फोन दे....
शेवटी पुन्हा स्वारी माझ्यापर्यंत आली...
मी: बोल.....आयुष
आयुष : मम्मा, तू काय काय बनवतेस???मला काही नाही special बनवले म्हणतेस आणि बाबांसाठी सगळं special special बनवतेस.....
मला सांगितलं बाबांनी...
मी : काय काय सांगितलं ... ??
आयुष: तू पावभाजी ,मिसळ,कटलेट्स..भजी.......चायनीज...पाणीपुरी पासून सगळं सगळं केलंस......आणि मला सांगितलंस सुद्धा नाही....(त्याला वाईट वाटणार म्हणूनच मी त्याला काही सांगत नव्हते...)
तू माझ्या विना , हे सगळं सगळं का करतेस??
असे नको ना करुस तू....
आता काही काहीच करायचं नाही....काही बनवायचं नाहीस तू...
कळलं का मम्मा तुला...(असे म्हणून मलाच त्याने दाब दिला)

मी: बरं ....नाही करत उद्यापासून फक्त भाकरी वांग्याची भाजी किंवा भेंडीची भाजी करते....
आयुष: ये नाही....नाही
मला भाकरी पण आवडते वांग्याची भाजी आणि भेंडीची भाजी पण खूप आवडते...ते नाही करायचं.मला जे जे खुप आवडत ते अजिबात नाही करायचंस तू....
तू ना ,फक्त कोबीची ,कारल्याची भाजी कर....

मग मी म्हणल : आयुष .....…आम्ही मग काहीच खायचंच नाही का??????
आम्ही काय उपाशी बसायचं का रे बाळा????
असे नसते रे ....तू पण तिकडे  काकूने ,आजीने बनवलेले
छान मस्त मस्त पदार्थ खातोस ना....तुझी तर मजा सुरुय .रोज तर मला सांगत असतोस...सगळं

आयुष: sssssss ...
मम्मा......तुला कळत कसं नाहीये ग.?
मला तू उगीचच ओरडते आहेस(रडवेला ,एकदम हळवा होऊन बोलत होता)
"मला तुझ्या हातच खायचं आहे..."
किती दिवस झाले काही म्हणजे काहीच  खाल्लं नाही मी तू बवलेलं...
तू घरी बनवतेस त्या पिझ्झाची ,potato smiles ,उडीद वडे.साबुदाणा वडे.... सगळया सगळ्याची आठवण येतीय....
हे सगळं कधी संपणारे lockdown???मला पाहिजे खायला तू बनवलेलं.

त्याच हे बोलणं ऐकून ...माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं.....

(आयुष एक नंबर खवय्या आहे....वेगवेगळे पदार्थ मला सतत बनवायला लावतो म्हणूनच माझ्या youtube चॅनेलचाही जन्म झाला #sheplansdinner)

माझं छोटस पिटुकल माझ्या हातची चव miss करतंय ..पण आईपासून लांब राहणारा प्रत्येकजण हा किस्सा  नक्कीच रिलेट करेल..
जगात आईच्या हातची चव कोण miss नाही करत म्हणा...??
आईच्या हातच जेवणं म्हणजे स्वर्गसुखच नाही का😘
सोनाली कुलकर्णी
0 comments: