निमित्य ग्लास फुटण्याचे

गेले कित्येक वर्षे जीवापेक्षा जास्त जपलेला ,नेहमी फक्त माझ्यासाठीच वापरणारा काचेचा ग्लास आज हलकासा धक्का लागला आणि फुटला...

ग्लास फुटण्याचं दुःख तर आहेच पण त्यामागच्या बऱयाच वर्षांच्या त्याच्याशी जोडल्या गेलेल्या भावना खूप जास्त आहेत.
तो दिसला नाही ,सापडला नाहीतर optinal म्हणून दुसरा वापरणं कधी मला जमलंच नाही.कारण त्याची replacement  कधीच करावीशी वाटली नाही.
खरतर, एक ग्लास फुटल्याने तसा काही फरक नाही पडतं,same तसाच ग्लास पुन्हा मिळू शकतो ,

पण खोलवर विचार केला तर,
एखाद्या गोष्टीत आपण भावनिक गुंतलो की गोष्ठी अवघड होतात. मग एखाद्या आपल्याला आवडलेल्या ,आपली कायम सोबत करणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी ,प्राण्याची सवय असो वा सजीव गोष्टीशी, असो वा निर्जीव गोष्टीशी असो त्यासोबत झालेली attachment सहजासहजी कमी होत नाही.
आणि जेव्हा ती गोष्ट आता आपल्या सोबत नाही ही जाणीव होते तेव्हा होणारा त्रास खूप जास्त असतो.

प्रॅक्टिकल लोक असली तर ते ती गोष्ट सहजपणे विसरून जातात ,पण भावनिक लोकांना 
व्यक्ती असो,प्राणी असो वा एखादी वस्तू....
त्यानां आपण जिवापाड जपत असू तर त्या
प्रत्येक तुटलेल्या ,फुटलेल्या, गमावलेल्या ,हातातून निसटून गेलेल्या गोष्टीना विसरणं फार सोपं नसत...
कारण...
बऱ्याचदा ,आपल्या मेंदूपेक्षा आपल्यावर आपलं "मनच " राज्य करत असत...
आणि मनाची जेव्हा त्या गोष्टीबद्दल विचार करण्याची तीव्रता कमी होईल तसे
कालांतराने त्या सगळ्या गोष्ठीचा विसर पडत ही असेल पण...
त्या गोष्टी आपल्या आठवणीत कायम 'मनात आणि स्मरणात ' राहतातच.
कारण गोष्ट कोणतीही असो त्यासोबतच्या आठवणीना मरण नसतं😊
@सोनाली कुलकर्णी

#निमित्य_ग्लास_फुटण्याचं

0 comments: