नागपंचमी2020

#नागपंचमी2020

कोणताही नाग असो ,साप असो स्वतःहून ,मुद्द्यांम दंश करत नाही...जोपर्यंत आपण त्यानां डिवचत नाही तोपर्यंत ते आपल्याला काहीही करत नाहीत. 
शेतात काम करणाऱ्याना तर रोज अनेक साप दिसतात.
शेतकऱ्यांचा साप हा मित्र आहे...तो शेतजमीन भूषभूषित करतो असे म्हणले जाते. जाणता अजाणता ,चुकून शेतकऱयांचा पाय पडला तरच तो त्यालाही दंश करतो.
मी लहानपणापासून शेतात ,घरच्या अवती भवती अनेक साप ,नाग बघितले आहेत.पण त्याना मुद्द्यांमहून त्यानां मारलेल् मी पाहिलेल नाहीये.

माझी आज्जी म्हणायची 
"तो ज्या वाटेने आला त्याच वाटेने निघून जाईल....शांत रहा, लांब रहा.त्यानां त्रास देऊ नका.त्यांना मारून पापात भर करून नका घेऊ."

माझं आजुळ नागठाणे जे वाळवा तालुका ,सांगली जिल्यात येत तिथेही जेव्हा जेव्हा सुट्टीला मी जायची तेव्हा अनेक नाग पाहिले आहेत ....अगदी मामाच्या म्हशीच्या गोठ्यात येऊन बसायचे.घराच्या अंगणात फिरायचे.....पण तिथेही ते लोक कधी मारायचे नाही.मामा म्हणायचा एक दोन दिवस दिसेल पुन्हा निघून जाईल पुन्हा नाही दिसणार.ते आपल्याला काही करत नाहीत.

32 शिराळा मावशीच गाव...
तिथे तर नागपंचमी म्हणजे एक वेगळाच उत्सव ,जल्लोष असतो.दरवर्षी नागदेवाची पालखी निघते. पूर्वी घरोघरी खऱ्या नागांची पूजा केली जायची पण कोर्टाने बंदी घातल्यापासून तो प्रकार बंद झाला आहे.पण तिथे घरोघरी सर्प मित्र आहे.त्यांना सापाची भीती नाहीच वाटतं.. तिथे तर अगदी जखमी सापाला योग्य उपचार देऊन पुन्हा बरे करून पुन्हा झाडाझुडपात सोडून देतात.
खरंच काही काही गावामध्ये नागाला देवाचं रूपच  मानतात.त्यांच्या वाट्याला कुणीच जात नाही.

नाग, साप यांना पाहिलं की आपल्याला भीती वाटते ,
हो अगदी मलाही खूप जास्त भीती वाटते पण..
त्यांच्यापासून स्वतःच संरक्षण स्वतः च करा म तेही त्यांच्यापासून लांब राहूनच ,उगीच आकांडतांडव करून साप साप करून घाबरून न जाता,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांना मुद्द्यांमहून आपल्याला दंश करतील या भीतीने शक्यतो मारू नका,
जवळपास सर्प मित्र असेल तर त्याना बोलवा...आणि त्यांचेही जीव वाचवा.
ह्याच नागपंचमीच्या शुभेच्छा🐍!!!
सोनाली कुलकर्णी

(नागाचा व्हिडिओ क्रेडिट : 32 शिराळा)

#32शिराळा  #नागपंचमी

0 comments: