#किस्सा_मांजरांच्या_भांडणाचा

#किस्सा_मांजरांच्या_भांडणाचा
माझ्या बिल्डिंग मध्ये दोन मांजर आहेत.... 
ती शक्यतो पार्किंग मध्ये कुठेतरी बसलेली असतात.जेव्हा जेव्हा गाडी काढायला पार्किंग मध्ये जाऊ तेव्हा तेव्हा त्यांना एकमेकांवर एकमेकांच्या अंगावर चढून खेळताना ,प्रेम करताना ,भांडताना पाहिलं.
पण काल.... आयुष मला सांगत आला 
mamma see here "cats are fighting"
मग काय कॅमेरा  लगेच रेडी ठेवला🤣
अगदी व्हिडिओ शूट करण्याइतके समोरासमोर आले..
बहुतेक खरंच जाम दोघाचं भांडण झाले असावे.एकमेकांच्या अंगावर धावून जात होते....पण आम्हा प्रेक्षकांना पाहून ते आपला राग कंट्रोल करत होते....
एक दुसर्यापासून लांब जरा गेलं की त्याच्या मागून लगेच दुसरं जायचं... एकाने आडोसा घेतला तर दुसरा दोन पाय वर करून पहायचा...
आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इतकी भारी खुन्नस एकमेकांना देत होते की.....असे वाटतं होत की हे तर माणसांसारखे वागत आहेत अगदी खाऊ की गिळू अश्याच पद्धतीने....
शेवटी काय जसे सख्खे शेजारी कसे दुसऱ्याच्या घरातले भांडण एन्जॉय करतात तसे आम्हीही यांचे भांडण एन्जॉयच केलं म्हणायचं.
काय नुसता माणसांनाच नाही राग येत...प्राण्यांनापण खूप राग येतो....!!
आज काय विशेष मध्ये मी घेऊन आलीय .....
तुमच्यासाठी #मांजरांचंभांडण,😂😂😂😂
@सोनाली कुलकर्णी

#banglorediaries

0 comments: