lockdown आणि work from home वाल्यांची गोष्ट

#lockdown_आणि_workfromhome_वाल्यांची_गोष्ट

सध्या सगळेच अवघड परिस्थितीतून जात आहेत
पण प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे,
सध्या सगळयात जास्त वाईट परिस्थिती आहे 
ती त्या लहान मुलांची आणि work from home करणाऱ्या  आईबाबांची.....
मुलांसमोर त्यांचे आई बाबा नुसतेच समोर आहेत....हक्काचे आईबाबा हवे तसे मिळत नाहीत,
मुलांना घरी असूनही शांतता पाळावी लागते,
बाहेरजावून खेळता येत नाही,
दंगा मस्ती सगळं गुंडाळून नाईलाजाने फक्त मोबाइल ,tv ,tab पाहत बसावं लागतं.रात्री आईबाबा जेव्हा फ्री होतात तेव्हा मुलं बोअर होऊन होऊन कंटाळलेली असतात.

आणि त्या आईबाबांनासुद्धा मुलांसोबत वेळ घालवाला अशी इच्छा असूनही,
work from home नावाची सोईस्कर सवलत असूनही
वेळेअभावी दोघांच्याही हातात 
घरातलं सगळं सांभाळत, laptop आणि workload च भीषण सत्य आहे!!

कस असतं ना, समोर असूनही  सुख ,आनंद वेळेअभावी नाही मिळाला की जास्त त्रास होतो
बाकी काय.....
दिवस येतो आणि जातोय....
फक्त नोकरी शाबूत आहे आणि एकमेकांसमोर असल्यातच सुख मानायचं!!

पण शेवटी राहून राहून वाटत...
....., बंद घरट्यात बंदिस्त असलेल्या साऱ्या पिल्लांना पुन्हा  फुलपाखरासारखे बागडण्यासाठी ,
पूर्वीची मजा मस्ती आनंद सुखाचे दिवस येण्यासाठी,
त्यांचं बालपण मनमुराद जगण्यासाठी
.....देवा लवकर संपव रे हा कोरोना.... !!

@सोनाली कुलकर्णी

1 comment: