मराठी राजभाषा दिवस ....यानिमित्ताने लेख

सध्या गेली पूर्ण वर्ष बंगलोर मध्ये वास्तवास आहे
पण आपलं मन जस आपल्या माणसामध्ये गुंतलेलं असत त्यांच्यासाठी झुरत असतं तसच परराज्यात गेल्यावर आपल्या राज्यभाषेबद्दलही झुरत....

आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात गेल्यावरच आपल्या मराठी भाषेची  खरी गोडी कळते......
मग आपल्याही नकळत इंग्लिश हिंदी बोलता बोलता मराठी शब्द तोंडात येतो तेव्हा .....जाणवत मराठी भाषेशी जोडलेली आपली नाळ किती घट्ट आहे ते....

खेळताना मुलं इंग्लिश मध्ये भांडतात .....पण ती भांडण भांडण नाही वाटतं..... संथ पाण्यावर तरंगणाऱ्या पानासारखी वाटतात... आणि मग जाणवतं आपल्या मराठी भाषेत किती .....जिवंतपणाआहे.
आपला....राग ,दुःख सुख आनंद सगळं सगळं काळजापर्यंत पोहचवते आपली मायबोली.

Don't do beta ,ऐसा नहीं करनेका beta
पेक्षा 
"असं नाही करायचं हं बाळा" म्हणलं की 
न रागवताही समजुदार पणाने सांगणे फक्त आपल्या मराठी भाषेतच आहे.....

Come early, ,जलदी आ जावो
पेक्षा लवकर येशील ना??म्हणल की
पुढे मी वाट पाहतेय हे न सांगता आपण सहज सांगून जातो....


रोजच खाली नवीन ओळखीची झालेल्या मैत्रिणी भेटल्या की अनेक शब्द ,वाक्य रचना......
प्रत्येक क्षणाक्षणाला आठवतात,आपुलकीच्या वाटतात पण बोलता नाही येत.
इथे इंग्लिश
बोलण्याशिवाय   पर्याय नाही उरलेले आम्ही मराठी 
मराठी माणस शोधतो मराठी बोलण्यासाठी...

आपण आपल्या महाराष्ट्रमध्ये हिंदी लोकांच्या भाषेत हिंदी बोलतो पण इथे परराज्यात आपली भाषा कुणी शिकायचाही प्रयत्न कधी करताना दिसत नाही
ते स्वतःच्या भाषेबद्दल जराही तडजोड नाही करत....
पण आपण महाराष्ट्र मध्ये करतो....
हे मला क्षणोक्षणी जाणवत.....

आज मराठी राज्यभाषा दिनाबद्दल सर्वांना सांगावं वाटतं
आपणच आपल्या भाषेला पाहुण्यांसारख नको वागवायला...
आपला मराठी बाणा ताट ठेवून फक्त मराठी भाषाच बोलू...
"मी मराठी ,माय मराठी "
हे ब्रीद वाक्य सार्थ करू आणि नवीन पिढीलाही त्याची गोडी लावू...!!
आपल्या मराठी भाषेचा गोडवा आपणच जपू....!!
@सोनाली प्रसाद कुलकर्णी

0 comments: