आयुष्य आणि कोरोना.....

हल्ली  मनात येणाऱ्या प्रत्येक गोष्ठीनंतर 
काश.......???
ह्या शब्दांनंतर प्रश्न चिन्ह सतत नजरेसमोर उभा राहत...
नियती,नशीब ,परिस्थिती ,संकट म्हणून वेळ अशीच निघून चालली आहे.
मार्ग मिळत नाही....
मनात जगण्याची उमीद असली तरी आपलं 
आयुष्य आपल्या हातात राहिलेलं नाही
हे सत्य मनाला दुर्लक्ष करूनही नाकारता येत नाही...
परिस्थिती हाताबाहेर जशी जास्त जातीय तसे
मन सुन्न होतय....

तरीही....
हाताची बोट सारखी कुठे असतात तसेच  सगळीच आयुष्याची वर्ष कुठे सारखी असणार ,आयुष्यात चढउतार हा असणारच,
काही दिवस, काही महिने ,एखादं वर्ष  असच खराब असणारच ,
असे म्हणत मनाला समजवत,
 हेही वर्ष आलं तस ,निघूनही जाईल....कदाचित पुढचं वर्षही असेच असेल... असेही मनाशी घट्ट गाठ बांधून चालायला हवंय...
सध्या नियतीचे फासे पलटले आहेत,तरीही
जगण्याची इच्छा ,मला काही होऊ नये याची खटाटोप प्रत्येकजण इथे करत आहेच....
जगलो वाचलो तर...
भविष्यकाळ ....नक्की चांगला असेल ह्या आशेवर....इथे प्रत्येक जण स्वतःच्या आर्थिक ,रोजीरोटीच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्नशील आहे....
अकाली आलेली दुःख विसरण्याच प्रयन्त करत आहेत...
धडपडत ,पुन्हा उभारण्याचा प्रयन्त करत आहे
तरीही शेवटी....प्रत्येकाच नशीब...!
बिघडलेली आयुष्याची घडी पुन्हा सुरळीत व्हायला वेळ तर नक्कीच लागेल पण.....
हातातून अनेक गोष्टी सुटून चालल्या आहेत.
पेशन्स संपत चालले आहेत पण
मनातील विचार चक्र काही थांबत नाही...
काश.....???
ह्या शब्दांनंतर येणारे विचार.....
अस्वस्थ करून जातात..!
@सोनाली कुलकर्णी 
@सोनाली कुलकर्णी - शब्द माझ्या अंतरीचे

#lockdown2021  #coronavirus

0 comments: