श्रावण सोमवारी शिवामूठ कशी वहावी |shivamuth kashi vahavi |श्रावणात शिवामूठ वाहण्याची पूजा कशी करावी?

 


श्रावण सोमवारी शिवामूठ कशी वहावी |shivamuth kashi vahavi |श्रावणात शिवामूठ वाहण्याची पूजा कशी करावी?

श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा आणि उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवमूठ वाहतात. मूठभर तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातूची शिवमूठ एकेक सोमवारी शिवाला वाहतात.


श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा
➧ त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करुन पूजा करावी.
➧ एका थाळीत शंकराची पिंड ठेवावी किंवा मंदिरातील शिवमंदिरात जावं , त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने अभिषेक करावा
➧ त्यानंतर शंकराची पिंडीवर  अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षता, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावे, निरांजनाने,अगरबत्तीने  ओवाळावे 
 ➧पूजा करत असताना “ॐ नम: शिवाय” या मंत्राचा जप करावा
➧ त्यानंतर शिवलिंगावर त्या त्या दिवसाप्रमाणे मूठ अर्पण करावी.
➧धान्यमूठ शिवलिंगावर उभी धरुन वाहावी, ही शिवामूठ वाहताना पुढील मंत्र म्हणावा-
 शिवामूठ वाहताना “शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर देवा”, 
असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी.
➧त्यानंतर शंकराची आरती म्हणावी आणि शंकराकडे सुख-समृद्धीची प्रार्थना करावी
➧दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा

कुठल्या दिवशी शिवाला कुठली मूठ वाहावी?
➧ पहिला श्रावणी सोमवार –  तांदूळ शिवमूठ
➧ दुसरा श्रावणी सोमवार –  तीळ शिवमूठ
➧तिसरा श्रावणी सोमवार –  मूग शिवमूठ
➧ चौथा श्रावणी सोमवार – जव शिवमूठ
➧पाचवा श्रावणी सोमवार –  सातू शिवमूठ


श्रावण सोमवारी शिवामूठ कशी वहावी,shivamuth kashi vahavi,shivamooth,शिवामूठ,Shravan Somvar 2020 Shivamuth in Marathi,श्रावण सोमवार शिवामूठ पूजा मराठीमध्ये,shravan mahinyat somwari shivamuth kashi wahavi,shivamuth in shravan somwar,shivamuth puja,shravan somvar puja vidhi marathi,shravan somvar vrat in marathi,shravan somvar 2021,shravan somvar puja vidhi

0 comments: