8 मार्च महिला दिन.....!!!
समस्त महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा!!! स्वतःला जपा ,स्वतःची काळजी घ्या.अन्याया विरुद्ध लढा.स्वतःच अस्तित्व जपा!!
माझ्या शुभेच्छा देऊन तर झाल्या ....😊😊
अश्याच शुभेच्छाचा
सगळीकडे महिलांवर आज वर्षाव सुरू आहे. व्हाट्सउप ,फसबूक इनबॉक्स शुभेच्छानी तुडुंब भरलं असेल
चांगली गोष्ट आहे!!!!
पण ह्या शुभेच्छा पाहिल्या की मनात बऱ्याच गोष्टी मन ढवळून काढू लागतात...
खरचं स्त्री ....एक बाई म्हणून सुरक्षित आहे???
रोज ऐकायला येणारे महिला वरचे अन्याय,
रोज अनेक वाईट नजराना फेस करणाऱ्या महिला,
कॉर्पोरटे मध्ये असो,सुशिक्षित असो वा अडाणी असो वा कामगार म्हणून नवऱ्याच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिला,शेती मजदूरी करणाऱ्या , वा..... रस्त्यावरून जाणारी महिला असो वा ट्रेन ,बस ,रिक्षा ने प्रवास करणारी महिला असो....वा.... इथे सोशल मीडिया वर वावरणारी महिला असो....
कोण safe आहे???
अन्याय, अत्याचार,, अवाजवी छळ, वाईट नजरा, चारित्र्यावरचे शिंतोडे ,धाक,दरारा ....ह्या सगळ्याला प्रत्येकीला सामोरे हे जावंच लागत...मन मोकळे पणाने ,स्वच्छंदी वावरावे म्हणल तरी,एक महिला म्हणून सगळया पाबंदया....महिलांवरच..!
का तर ती स्त्री आहे म्हणून...??
खरंतर..... 
प्रत्येक पुरुषाने आपल्या भोवतीच्या महिलाच नव्हे मग ती लहान मुलगी असो ,कॉलेज मुलगी असो वा म्हातारी बाई असो....किंवा बरोबरीची महिला असो..
प्रत्येकवेळी प्रत्येक महिले मध्ये आई ,बहीण शोधायची गरज नाही पण एक मैत्रीण म्हणून , एक बाई म्हणून तर प्रत्येक स्त्रीला आदर देण्याची गरज आहे....!कुणालाही तुमच्याशी बोलताना भीती वाटू नये,तुमचाही आदर वाटावा ,एक सपोर्ट वाटावा असे वावरायला हवे.आणि असे झाले तर बरेच महिलांच्या बाबतीत होणारे विचित्र प्रकार थांबतील.

वरचा मुद्दा कॉमन आहे पण मला अजून एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे...
प्रत्येक पुरुषासोबतच,प्रत्येक बाईने ,दुसऱ्या बाईचा आदर करणे गरजेचे आहे...
हल्ली .....बाईच बाईची दुष्मन असल्यासारखी वागते..बाईच बाई विरुद्ध कटकारस्थान करताना दिसते.खरंतर प्रत्येक महिलेने स्वतःला समजावले पाहिजे ,आपण दुसऱ्या महिलेला रिस्पेक्ट दिला तर आपल्यालाही मिळेल आणि
इतरही दुसऱ्या महिलांना रिस्पेक्ट देतील.
माणूस जन्म एकदाच मिळतो असे म्हणतात...
मग प्रत्येकीने समोरच्या महिलेला नका मानू मैत्रीण ,सखी ,सून ,मुलगी ,बहीण पण तिच्यातल्या स्त्रीत्वाचा आदर करा.आपुलकीही नका दाखवू पण....तिचे पाय नका खेचू ,तिला तुम्हीच नका नावं ठेवू ,तिच्या चारित्र्यावर तुम्हीच शिंतोडे नका उडवू.
कारण जेव्हा आपण कुणा एकीला बोलत असतो तेव्हा आपल्या बद्दलही चार व्यक्ती बोलत असतात.
आपणच आपल्याला बदलायला हवं!
तरच सासूने सुनेचे केलेलं छळ थांबतील ,आजही सुरू असलेली हुंडाबंदी थांबेल,मानसिक हराष्मेंट थांबेल.स्त्रीला एक स्त्री म्हणून वेगळा सन्मान मिळेल ,एक महिला खंबीरपणे दुसरीच्या मागे उभी आहे हे  समजलं तर तिच्यावरचे अन्याय अत्याचार कमी होतील.

नुसते एक दिवस शुभेच्छा देऊन काही नाही होणार.
प्रत्येकाने आपल्यातली माणुसकी जागी केली पाहिजे.स्त्रीच्या स्त्रीत्वाच,तिच्या कामाचं, तिच्यात असलेल्या शक्तीचा,तिच्या आईपणाचा एक माणूस म्हणून  कौतुक,आदर पूर्ण वर्षातले 365 दिवस केला तरच हा महिला दिन सार्थकी लागेल.
तरच हा महिला दिन साजरा करणं सार्थकी ठरेल.

0 comments: