प्रारब्ध - प्रेम कथा | मराठी कथा,


स्वरा आणि मयुरी एकाच मल्टिनॕशनल कंपनीमध्ये एकञ काम करत होत्या .स्वराच्या आग्रहाखातर मयुरी तिची रुम पहायला तिच्या रुमवर गेली होती.तसा दोघींना गप्पा मारायला एकांत मिळतच नसे, मयुरीला नेहमीच घरी जायची गडबड असायची.पण आज मयुरी छान गाणं गुणगुणत होती..

“तेरा मुझसे है पहले का नाता कोई     
 यूँ ही नहीं दिल लुभाता कोई       
जाने तू या जाने ना,
तू या माने ना”

पण ती गाण गुणगूणत अचानक रडू लागली…

स्वराला काहीच कळेना.

स्वराने विचारलही का रडतीय तर ती अजूनच रडायला लागली.इतक छान गाणं म्हणत होतीस आणि अचानक काय झाल तुला??

“प्लिज मयू,रडणं थांबव आधी आणि सांग काय झाल??”

मयुरी दिसायला सुंदर ,पण स्वभावाने अबोल होती.नेहमी शांत शांत असायची.स्वराची आणि तिची तशी अलीकडचीच ओळख त्यामुळे मयुरीबद्दल पर्सनल गोष्टी माहीत नव्हत्या.

पण मयुरीचे रडणे पाहून स्वराला खुप सारे प्रश्न पडले आणि त्या प्रश्नाची उत्तरे मिळवण्यासाठी तिला बोलत करावच लागणार होत.

पुन्हा स्वराने विचारल…”मयू काय झालय…मनमोकळेपणाने बोल ग..जे मनात आहे ते सांगून टाक सगळ तुला मोकळ वाटेल ग.”

मयुरीला ही कुणाला तरी सांगाव, खुप खुप रडावस वाटत होत आणि मयू व्यक्त व्हायला सुरु झाली..

 स्वरा ,प्रारब्ध काय असत ना ते जवळून अनुभलय ग मी…ते आपल्या हातात नसत मुळात कधी…आज काय उद्या,काय घडणारे कुणालाच नाही ग

कळत कधी..

स्वराला मयू काय आणि कश्याबद्दल बोलतीय काहीच कळत नव्हत….

ती म्हणाली, अग मला कळेल असे सांग ना जरा…

हम्म…म्हणत मयू पुन्हा बोलू लागली…

मी आणि केतन ..कॉलेजपासूनचे मिञ.आमचं ऐकमेकांवर खुप प्रेम होत .कॉलेजमध्ये सगळे चिडवायचे पण घरी माहीत नव्हत…पण एक किस्सा असा घडला कि

आम्ही दोघ सिंहगडला फिरायला गेलेलो आणि येताना केतनची बाईक पंक्चर झाली अंधार पडायला आलेला,दोघांच्याही मोबाईल बॕटरिज डाऊन…घरी आईने काळजी करत सगळ्या आमच्या ग्रुपला फोन केले मग तिला कळाल केतनही नाहीये आणि आम्ही दोघ सोबत आहोत.कसे बसे करुन आम्हाला एक सभ्य माणूस भेटला अन् त्याच्या फोरव्हिलरमधून घरी परतलो.तोपर्यंत आमच प्रेमाच गुपित दोघांच्याही घरी कळालेल.आम्हाला तसा घरातून फारसा विरोध नाही झाला पण लगेच आमच लग्न ठरवून टाकल आणि साखरपुडाही  झाला.

स्वरा आश्चर्याने विचारली, ” अग तुझा साखरपुडा झालाय आणि तू हे आज सांगतीयस मला

काय ग तू…किती छान गोष्ट असताना तू का आता रडतीयस…??”

मयूरीच्या डोळ्यातले पाणी येण काही थांबत नव्हते..

स्वरा,सगळच जर मनासारख घडल ,झाल तर ते नशिब कसल ग….??

साखरपुडा होऊन जेमतेम एक महीनाच झाला होता आता पुढच्या महीन्यात लग्न आणि केतन चा अक्सिडेंन्ट झाला.

एका मिञाच्या लग्नाला पनवेलला गेलेले…येताना बाईकला साईडने जाणार्या ट्रक ड्रायव्हरच नियंत्रण गेल आणि त्याला धडक दिली .केतन आणि त्याचा मिञ दोघही डिव्हाडरवळ जोरात आदळले.

दोघेही कोमात गेले.हेलमेट नसल्याने केतनला डोक्याला जबरदस्त मार लागला मरता मरता वाचला पण त्याला सगळ्याच जुन्या गोष्टी पुर्णपणे आठवत नाहीयेत.आठवल तरी पुन्हा विस्मरणात जातो.त्याच्या बाबांनाही ह्या धक्याने पॕरेलेसिस अटॕक आला.आता घरी कमावणार कुणीच नाही.खर्च आजारपण ही खुप आहे.आई बिचार्या एकट्या पडल्या.आता ‘माझा’ तोच ते काय त्यानां आधार.

स्वरा खुप हळवी होऊन म्हणाली…अग मयु खुप वाइट झाल पण तुमच लग्न नाही ना झाल..मग सगळी जबाबदारी तू का एकटीवर घेतलीस??

स्वरा,अग लग्न होणारच होत…फक्त आमच प्रारब्ध आडव आल ग..जे व्हायच होत ते घडून गेल पण….    अजूनही  केतनवर माझ खुप प्रेम आहे .आजही तो माझ्या स्पर्शाने नक्कीच सुखावत असेल.त्याच्या डोळ्यात पाहील की अजून तो माझाच केतन वाटतो.. म्हणूनच ते गाण म्हणताना मला रडायला आल गं.

लग्न झाल असते तर मी काय सोडुन गेले आसते का त्याला??मी त्याला माझ मानलंय.लग्न झाल नसल तरी मी त्याची मनाने बायकोच आहे .त्याच्यासाठी माझ्या घरच्याचा विरोध पत्करुन त्याच्यासोबत रहातीय .मला खाञी आहे आज ना उद्या सार काही ठिक होईल.

त्याला आज पुर्णपणे आठवत नाही पण तरीही तो मला ‘मयू’ म्हणून हाक मारतो…तू जाऊ नकोस म्हणतो…याचा अर्थ त्याला माझा सहवास आवडतो.त्याची मला वाटणारी काळजी आवडते.माझा आधार वाटतो.

आणि स्वरा कस असत ना…” सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडल्यातर ते आयुष्य कसले.आयुष्य आपली परिक्षा घेत असते…आपण फक्त परिक्षार्थी बनून पुरेपुर परिक्षेला उतरायच.निर्णय परमेश्वराच्या हाती”....बस…मी इतकाच विचार करुन पुढे,चाललीय .

चल “केतन माझी वाट पहात असेल ग”

मी निघते म्हणत चप्पल पायात घालती आणि म्हणाली

“तू नको जास्त विचार करुस स्वरा…”

आता अजून काय प्रारब्धात घडायच ते घडू दे ग.

त्याला आठवेल तेव्हा सगळे आठवू दे, मी त्याची वाट पाहीन माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत.

स्पंदन@सोनाली कुलकर्णी 

0 comments: