कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी | kojagiri pornima puja | Kojagiri pornima puja kashi karavi

कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी | kojagiri pornima puja | Kojagiri pornima puja kashi karavi

 

कोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)

कोजागरी पौर्णिमा ही  आश्विन पौर्णिमा या तिथीला साजरी  करतात.

कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात

कोजागिरी. को जा गरती, म्हणजे कोण जागे आहे ??, असे लक्ष्मी विचारते. म्हणजेच कोण जागे आहे,कोण आपले कर्तव्याला जागे आहे, त्याला लक्ष्मी धन देते म्हणून आपण कोजागिरी सण साजरा करतो.

कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो.आणि त्यामुळे तो मोठा दिसतो.  या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जो जागा आहे, त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते, अशी कथा आहे.

कोजागिरी चे महत्त्व

या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे, संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून नारळाचे पाणी व पोह्याचा नेवैद्य दाखवून तो उपवास सोडण्याची पद्धत आहे. 

या दिवशी, चंद्र अतिशय तेजस्वी आणि ऊर्जावन असतो, ज्यामध्ये 16 कलांचा समावेश आहे आणि असे मानले जाते की या दिवशी चंद्राच्या किरणांनी अमृत वर्षाव केला जातो. 

म्हणून चंद्राची पूजा करून मसाला  दुधाचा प्रसाद  नेवेद्य दाखवला जातो. 

शरद पौर्णिमेला मसाला दुधाचे  विशेष महत्त्व आहे. या रात्री मसाला दुध चंद्राच्या प्रकाशात ठेवल्याने त्यावर अमृताचे थेंब पडतात असे मानले जाते, जे प्रसाद म्हणून घेणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

आयुर्वेदानुसार या ऋतूमध्ये पित्तप्रकोप वाढतो, त्यासाठी औषध म्हणून थंड दूध पिणे आवश्यक असते, (मसाला दूध आटवून त्यात केशर,पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, नैवेद्य दाखविला जातो. )

कोजागिरी पौर्णिमेला इंद्र ,लक्ष्मी कुबेर,चंद्र यांची पूजा कशी करावी ??त्याला लागणारे साहित्य ,आणि विधी

 उत्सव साजरा करण्याची पद्धत

‘आश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने) प्राशन करण्याचा  दिवस. नवीन पीक येते त्या अन्न प्राशन करण्यसाठी हा मुहूर्त सांगितलं आहे 

या दिवशी श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. लक्ष्मी आणि इंद्र यांच्या पूजेत पोहे आणि नारळाचे पाणी वापरतात. पोहे हे आनंद देणारे, तर नारळाचे पाणी हे शीतलता प्रदान करणारे आहे.

पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पून नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात . इंद्र आणि लक्ष्मी देवीची आराधना करून उत्तम आरोग्य आणि वैभवप्राप्तीसाठी रात्रभर जागरण करून व्रत केले जाते.

या दिवशी चंद्राची पूजा करतात रात्रीच्या बारा वाजण्याच्या सुमारास चंद्रास शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. 

चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची आयुर्वेदिक शक्ती आहे. त्यामुळे हे दूध आरोग्यदायी आहे. या रात्री जागरण करतात. बैठे खेळ खेळून रात्रीचे जागरण करतात 

कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि इंद्र यांचे पूजन का करतात ??

लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते 

कोजागिरी पौर्णिमा ही देवी लक्ष्मीचा जन्मदिन. देव-दानवांच्या समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते. हाती अमृतकलश घेऊन संचार करीत असता, देवी लक्ष्मी ‘को जागर्ति’ असा प्रश्‍न करीत असतेे, अशी श्रद्धा आहे. Kojagiri pornima puja in marathi,Kojagiri pornima puja kashi karavi,kojagiri pornima puja,kojagiri purnima puja vidhi,kojagiri purnima puja vidhi in marathi,kojagiri purnima vrat katha,sharad purnima 2021,sharad purnima puja,कोजागिरी पौर्णिमा पूजा,कोजागिरी पौर्णिमा माहिती,कोजागिरी पौर्णिमा माहिती मराठी,कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी,कोजागिरी पौर्णिमा पूजा विधी,कोजागिरी पौर्णिमा पूजा कशी करावी,kojagiri purnima,kojagiri purnima pooja vidhi,कोजागिरी पौर्णिमा

0 comments: