#नात्याचेंगमक #positivityonly 

कधी कधी समोरच्या व्यक्तीकडून काही गोष्टी आपल्या 
मनासारख्या नाही घडल्या तर,
त्या व्यक्तीचा राग येण्याऐवजी,आपल्याला खूप वाईट वाटत,
खरंतर बऱ्याचदा राग हा तात्पुरता असतो
आणि वाईट वाटणंही क्षणिक असत,
तो क्षण ,तो प्रसंग ,ती परिस्थिती ती वेळ घडून गेल्यावर
एका रात्रीच्या झोपेनंतर
आपण त्या mind set मधून आपोआपच बाहेर येतो.
नाही म्हणल तरी ,
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत हेच घडतं.
आपल्याला राग येणं, वाईट वाटणं साहजिक असत पण, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत आपण हळवे असतो , त्यांच्या असंख्य चुकांना आपण माफ करू शकलो तर आपलं नात हे अजून
" नात घट्ट करण्याच्या" वळणावर आहे हे नक्की समजावे.
आणि नेहमी लक्षात ठेवावे की,

"आयुष्यात काहीही घडलं, कसलीही कोणत्याही परिस्थिती आली तरी  ,सहनशिलतेच्या पलीकडे जरी वेळ आली , असंख्य अडचणी आल्या तरी ,त्यावर
वेळ जाणं ,काळ जाणं हाच उपाय असतो."

@सोनाली कुलकर्णी - शब्द माझ्या अंतरीचे 
@सोनाली कुलकर्णी

0 comments: