तुझं अस्तित्व...

तुझं अस्तित्व अगदी माझ्या मनात ह्या पहाडी सारखच
अगदी भव्य,दिव्य , कणखर ,अगदी हवंहवंसं वाटणार.
पण तुझ्यापर्यत पोहचण्याचा प्रयन्त करायचा म्हणजे तू हजारो अंतरापासून माझ्यापासून दूर...
मग शोधत राहते रस्ते,तुला भेटण्यासाठी
कित्येक वेळा भरकटते मी रस्ता तुझ्यापर्यत पोहचण्यासाठी...
बऱ्याचदा,
धडपडते ,चाचपडते
मनाचा तोल घसरतो,
स्वतःवरच चिडते,रागावते,
श्वासांची चलबिचल होते,
तरीही मन डगमगत नाही
त्याला ध्यास फक्त "तुझाच" असतो..
वाटत राहतं डोळे  बंद करावे आणि क्षणात पोहचावे तुझ्यापर्यत .....अगदी तुला घट्ट मिठी मारण्यासाठी..
तुझा सहवास अनुभवण्यासाठी....
तुझ्यात स्वतःला विसरून जाण्यासाठी
तुझ्या डोळयांत माझं प्रतिबिंब पाहण्यासाठी,
तुझ्यात स्वतःला झोकून देण्यासाठी,
तुझी ओढ मनाला इतकी असते की
हे मनाचे खेळ सतत सुरूच राहतात..
तुझ्यापर्यंत पोहचण्याचा ध्यास आणि भास दोन्हीही होतच राहतो
तरीही,
असंख्य पराकोटीचे प्रयन्त करून देखील मी तुझ्यापर्यत पोहचेन की नाही याची शाश्वती न देणार आपल्यातल अंतर....कधीही न संपणार...
तरीही हवंहवंसं वाटणार माझ्या मनातलं तुझं अस्तित्व....अगदी ह्या पहाडी सारखं....कणखर.!!
©सोनाली कुलकर्णी

0 comments: