आज काहीतरी वेगळं लिहायला सुचलं आहे..
निवडणुका वातावरण सुरूय आणि .....लग्नाचा सीजन सुद्धा सुरूच आहे... तर
लग्न करण्यासाठी उतावळ्या असणाऱ्या लोकांसाठी एक भन्नाट प्रेम पत्र......
आवडल पत्र तर नक्की कमेंट करून सांगा पत्र आवडल का ते...😃
प्रिय …….
निवडणुका जवळ येऊ लागल्या तश्या ,
एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश होऊ लागले आहेत...
तर ह्या पक्षांतराच्या मौसम मध्ये....
मीपण म्हणतेय तुझ्या पक्षात प्रवेश करावा....
तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य जगण्याची संधी देशील का??
हो… मला
तुझ्या साथीत, तुझ्या मायेच्या सावलीत,
आणि तुझ्या हृदयाच्या राज्यात
पूर्ण आयुष्यभर मुक्काम करायचाय.
तू परवानगी दिलीस तर…
मी तुझ्या आयुष्यात
अधिकृतपणे प्रवेश घेऊ का?
मी तुला वचन देते की,
निष्ठा कायम ठेवेन,
प्रेमाची मतं रोज जिंकत राहीन,
आणि एकदा का तू “हो” म्हटलंस…
तर या आपल्या नात्यात डिफेक्शन कधीच होणार नाही.
तर सांग…
तुझ्या पक्षात
पूर्ण आयुष्याचा /आयुष्याची सदस्य म्हणून
मला स्वीकारशील का?
माझ्याशी लग्न करशील का????
तुझीच / तुझाच......
⭐⭐⭐♥️♥️♥️
#प्रेमपत्र #नातं #प्रेम #followers #highlight
0 comments: