मनाचंसामर्थ्य

#मनाचंसामर्थ्य

क्षणभर मागे वळून पाहिलं की,
"पूर्वीचे आपण आणि आजचे आपण "
यामध्ये बदलत गेलेलो आपण याचा ग्राफ.....आणि मधल्या घडून गेलेल्या असंख्य गोष्टी ,घडामोडी, सुख दुःखाचे क्षण....आलेले चढउतार....एका चित्रफिती सारखे डोळ्यासमोरून झरकन निघून जातात...

प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येऊन गेलेले असतात की ,त्यावेळी पूर्ण नकारात्मकता आपल्या भोवतीने असतानाही आपण तरून निघून सकारात्मक झालो,त्या त्या  प्रसंगातून त्रास झाला तरी व्यवस्थित सही सलामत बाहेर पडलो.आपल्या आयुष्याचा आपणच आनंद शोधत शोधत इथे पर्यन्त आलो आहोत.
आणि मग एक जाणीव होते,
आपल्यात प्रचंड potential आहे कोणत्याही परिस्तिथीला सामोरे जाण्याचे.कोणत्याही गोष्टीला साकार करायला जिद्द जितकी महत्वाची असते तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे "मनाचं सामर्थ्य"
कारण गोष्ट,प्रसंग कोणताही असो मनानं एखादी गोष्ट  खंबीरपणे ठरवली की...वेळ लागेल पण सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तश्या घडू शकतात,साकार होऊ शकतात.
फक्त आपल्या मनाची इच्छाशक्ती प्रबळ हवीय.

इच्छाशक्ती प्रबळ असेल तर
कितीही दुःख ,अडचणी वाट्याला आले तरी ...
ते कुरवाळत बसण्याऐवजी....आपण विचारांनी सामर्थ्यवान होतो.आणि अशक्य गोष्टी शक्य करण्याकडे आपण सरसावतो.

म्हणूनच फक्त मन कुमकुवत होऊ न देणे हे प्रत्येकाला जमलेच पाहिजे त्यामुळे अवघड वाटणार आयुष्य सुंदर आपल्यालाही दिसत.
©सोनाली कुलकर्णी

0 comments: