कंपोस्ट खत घरच्या घरी कसे बनवायचे आणि कंपोस्ट खताचे फायदे -

कंपोस्ट खत  हि नैसर्गिक आणि कमी खर्चिक प्रक्रिया असून ती तुमच्या स्वयंपाक घर आणि 

बागेतील कचऱ्याचे रूपांतर बागेसाठी आवश्यक  अश्या खतामध्ये केलं जात .

घरी निर्माण होणारा ओला कचरा घरच्या घरी मुरवला जाऊन त्यातून कंपोस्ट खतनिर्मिती करता येते 

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतीजन्य व प्राणीजन्य पदार्थ असतात.

कंपोस्ट खत हे सेंद्रीय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूच्या सहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. 

सेंद्रीय पदार्थ

सेंद्रीय पदार्थ कार्बनच्या अनेक संयुगाने बनलेले असतात.सेंद्रीय पदार्थाचे सूक्ष्मजीव वापर bविघटन होते 

सेंद्रिय पदार्थांचे विघटन जिवाणू  हवेच्या सान्निध्यात घडवून आणत असतात. आणि कार्बन व ते नायट्रोजन यांचे गुणोत्तर कमी होते अशा विघटन झाल्यावर पदार्थ यांनाच कंपोस्ट खत असे दोन म्हणतात.


1) खतकुंडीसाठी शक्यतो मातीची आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगली भोकं असलेली कुंडी वापरावी. प्लास्टिकची कुंडीपण आपण वापरू शकतो.मात्र तिला सर्व बाजूंनी चांगली भोके पाडून घ्यावी. मातीची कुंडी किंवा प्लास्टिकची जास्तं भोकं असलेली कुंडी घेण्यामागचे कारण म्हणजे खताच्या कुंडीत भरपूर हवा खेळणं आवश्यक आहे. 

2) कंपोस्ट डबा भरताना तळाचा लेअर मध्ये ब्राउन कलर खोक्याचे पुट्टे ,नारळाच्या शेंड्या तुकडे करुन घालावेत 

त्यावर ओला किचन कचरा 

त्यानंतर माती घालावी पुन्हा 

पुन्हा सुका कचरा पुन्हा ओला कचरा घालावा त्यानंतर थोडस जिवाणू तयार होण्यासाठी ताक घालावं किंवा 

काळ्या गुळाचं पाणी घालावं किंवा तुमच्याकडे असेल तर कंपोस्ट खत घालव

पुन्हा माती ,ओला कचरा सुका कचरा रिपीट करावे 

जसा कचरा साठत जाईल तसे रोजच्या रोज तुम्ही हि प्रोसेस रिपीट करू शकता . कंपोस्ट डबा खचाखच भरू नये कारण डब्यात हवा खेळती राहणं देखील गरजेचं आहे 

यामध्ये पाणी घालण्याची फारशी गरज नसते कारण किचनच्या ओल्या कचऱ्यात पाण्याचा अंश असतो.आणि आपण छिद्र पाडल्यामुळे कंपोस्ट डब्यात हवा आता मध्ये खेळती राहते 

त्यामुळेसेंद्रीय पदार्थांचे विघटन जिवाणू  हवेच्या सान्निध्यात घडवून आणत असतात. 


कंपोस्ट खताचे फायदे -

1) कंपोस्ट खतनिर्मिती ही खर्चिक नसून, आर्थिकदृष्ट्या हि परवडणारे आहे 

2) कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून सूक्ष्म जीवांची संख्या वाढते.

3)जमिनीची / मातीचा पोत सुधारून सुपीकता वाढते  फुले व फळे यांचे भरघोस व दर्जेदार उत्पादन मिळते.

4) फुलझाडांची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि  तसेच झाडामध्ये रोग प्रतिकारकता वाढते 

5)नायट्रोजन, फोस्फोरस आणि पोत्याशीयम सारखी मुलद्रव्ये भरपूर प्रमाणात मिळतात.

6) पर्यावरणातील प्रदूषण कमी होण्यास हातभार लागतो.

7)  झाडाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशक फवारण्या वाचतात.0 comments: