आज बऱ्याच दिवसांनी कर्नाटक पद्धतीने पातळ पोह्याचे दडपे पोहे केले..
खरतरं जसा गाव , भाग, राज्य बदलेल तश्या पदार्थांच्या करण्याच्या पद्धती बदलत जातात. तसेच बायकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा लग्न झाल्यानंतरचा बदल म्हणजे सासरची पद्धत आणि माहेरची पद्धत...यामध्येच नक्कीच होत.
माहेरी जाड पोह्याचे दडपे पोहे आई बनवायची त्यामुळे मला तीच पाककृती माहित होती पण सासूबाईंची पध्दत वेगळी...जी खरतर मला खूप आवडली सुद्धा आणि सोईस्कर वाटलीसुद्धा...
तर सांगते.... कर्नाटक पद्धतीने पातळ पोह्याचे दडपे पोहे कसे करायचे ते....
• पातळ पोहे चाळून घेऊन त्यावर चवीनुसार
लाल मिरची पावडर(तिखट) , मिठ ,चवीनुसार साखर , मेतकूट घालून घ्यायचे.
•त्यानंतर फोडणी करून घ्यायची.
फोडणी मध्ये
तेल ,तेलात मोहरी जिरे,हिंग हळद ,शेंगदाणे , डाळ ,कडीपत्ता घालून खमंग फोडणी करून घ्यायची.आणि ती थंड करून घ्यायची.(या फोडणीमध्ये भाजलेले शेंगदाणे घातले तर अजून टेस्टी लागतात)
•फोडणी थंड झाली की ती पाळत पोह्यांवर घालायची.
आणि पोहे छान हाताने mix करून घ्यायचे.
हाताने mix केले की प्रत्येक पोह्याला तिखट मीठ साखर आणि फोडणी लागते.
याला आमच्याकडे पोहे लावून ठेवणं म्हणतात..😄
आम्ही असे एकदम अर्धा किलो पोहे लावून ठेवतो आणि जेव्हा हवे असेल तेव्हां नंतर दडपून दडपे पोहे करतो.असे केल्याने गडबडीच्या वेळी खूप सोप पडत. फोडणी करण्यापासून सगळ करत बसावं लागत नाही.खूप वेळ वाचतो.
आता दडपे पोहे बनण्यासाठी..
(जर लावलेले पोहे 4 वाटी घेतल्या तर त्याप्रमाणे पुढील साहित्य)
ओल्या नारळाचा चव अर्धी वाटी, काकडी खिसलेली अर्धी वाटी, एक कांदा ,एक टोमॅटो बारीक चिरून घालायचे,
आणि हे पोह्यांवर घालून लिंबू पिळायला ,कोथिंबीर घालायची.(मोठा लिंबू असेल तर अर्धा पिळला तरी पुरेसा होतो)
आता पोह्यामधे घातलेले सगळे जिन्नस हाताने छान mix करून घ्यायचे आणि झाकण ठेवून पोहे दडपून 5 मिन ठेवायचे.
हे दडपे पोहे करताना यामध्ये कुठेही पाणी वापरले नाहीये.
कारण ओला नारळ, काकडी ,टोमॅटो, कांदा यामध्ये ओलसरपणा म्हणजेच पाण्याचा अंश असतोच.... त्यामुळे पोहे आपोआप मऊ होतात आणि सर्व चवी पोह्यांमध्ये मुरतात.
5 मिन नंतर ...ह्या दडप्या पोह्यांवर वरून अगदी थोडेसे ओल खोबरे ,कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
कुणाकुणाला खोबर चालत नाही काकडी चालत नाही तर ह्या गोष्टी स्किप करून तुम्ही फक्त कांदा टोमॅटो घालू शकता
माझ्या माहेरी दडपे पोहे करण्याची वेगळी पद्धत होती तिथे...सगळ्या गोष्टी घालून झाल्या की वरून फोडणी दिली जाते.
पण ही पद्धत सासूबाईकडून मी शिकले.
जेव्हा सण वार असतो तेव्हा आमच्याकडे हमकास नाश्त्यासाठी हे असे दडपे पोहे बनवले जातात , सण असले की घरी कांदा खात नाही त्यामुळे त्यात फक्त कांदा घातलेला नसतो.
परवा मी मेथीची रेसिपी टाकली होती त्यावर इतक्या वेगवेगळ्या रेसिपीज मैत्रिणींनी सांगितल्या की मेथीच्या भाजीवर एक पुस्तक निघेल😍 व्हरायटी मध्ये recipes नवीन कळल्या.
आपल्या सगळ्याच मैत्रिणी खूप सुगरण आहेत...❤️
तुमच्याकडे तुम्ही कसे बनवता दडपे पोहे हे नक्की कॉमेंट करून सांगा ..
@सोनाली कुलकर्णी
She Plans Dinner
#recipeoftheday #recipe #explorarpage #दडपेपोहे #highlight #follower
0 comments: