खिडकीबाहेर पाऊस सुरू झाला आणि त्या क्षणी त्याला वाटलं, की हा पाऊस त्यांच्या दोघांसाठीच बरसत आहे.😍
त्याने दोन कप कॉफी आणली. एक तिच्यासमोर ठेवली. 
तिने कप हातात घेतला, 
पण तिचं लक्ष कॉफीपेक्षा त्याच्या ’डोळ्यांकडेच’ होतं.
त्याने तिच्या नजरेला नजर देऊन तो हळूच म्हणाला, 
"तुला माहितेय का, तुझ्या हास्याशिवाय ही कॉफीही फिकीच वाटते," 

तिच्या डोळ्यांत ह्या एका वाक्यानेच एक चमक आली. 
तिने काहीच उत्तर दिलं नाही, 
पण तिच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य सगळं काही सांगून गेलं. कॉफीच्या वाफेचा हलका पडदा त्यांच्यामध्ये होता, पण त्यांच्या नजरेतून त्यांचं प्रेम एकमेकांशी बोलत होतं. 

तो क्षण फक्त कॉफी पिण्याचा नव्हता,
तर प्रेमाच्या प्रत्येक थेंबाचा आस्वाद घेण्याचा होता.

त्याला जाणवलं ,
ही सकाळ म्हणजे कॉफीसारखीच आहे… थोडीशी गोड, थोडीशी कडवट, पण तिच्याशिवाय अपुरी.

कॉफीचा प्रत्येक घोट त्यांच्या नात्याला अजून घट्ट करत होता.
आणि दोघांनाही उमगलं ,
"प्रेम म्हणजे फक्त बोलणं किंवा एकत्र असणं नाही,
तर अशा शांत क्षणांत एकमेकांच्या अस्तित्वाचा अनुभव घेणं आहे."♥️

सर्वांना  International Coffee Day ☕💕च्या  शुभेच्छा!
@सोनाली कुलकर्णी 

#hilights #follower #आयुष्य #fbpost #coffeeday  #प्रेम #लघुकथा

0 comments: