सांजवेळ....🧡
हा सूर्य, जेव्हा क्षितिजावर आपले तेज हळूहळू कमी करत मावळायला लागतो, तेव्हा तो फक्त दिवस संपल्याची सूचना देत नाही, तर तो मला तुझी खूप आठवण करून देतो.
आकाशात पसरलेली ती केशरी-लाल सांज, तुझा चेहरा डोळ्यासमोर उभी करते. त्याची शांतता आणि हळुवारपणा सांगतो की दिवसभरचा प्रवास संपला आहे, आता फक्त आठवणीत रमण्याची वेळ आहे.
प्रत्येक मावळणारी किरण जणू काही आपल्या एकत्र घालवलेल्या क्षणांची साक्ष देत असते. जसजसा सूर्य दूर जात अंधार दाटतो, तसतसं तू माझ्या जवळ असावस अशी ओढ अधिकच वाढू लागते.

हा सूर्यास्त कितीही सुंदर असला, तरी तुझ्या असण्याची जागा तो कधीच भरू शकत नाही.
@सोनाली कुलकर्णी 
PC : me😍 #justclick 
 
#सांजवेळ #आठवण #प्रेम #longdistance #explorepage #followers #follower #highlight #marathipost #everyonefollowers

Visit my Blog for more Articles
www.spandankavitaa.com

0 comments: