जगाच्या गर्दीत आपण लाखो लोकांपैकी एक असतो.
आपल्या येण्या-जाण्याने, वेळेवर पोहोचण्याने जगाचा घड्याळाचा काटा थांबत नाही.
पण जेव्हा आपल्या आयुष्यात “आपलं कुणीतरी” असतं, तेव्हा सगळं बदलून जातं.

ते आपल्या प्रत्येक क्षणाला अर्थ देतात 
आपण वेळेवर पोहोचलो, तर त्यांना दिलासा मिळतो;
उशीर झाला, तर त्यांना काळजी वाटते.
आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून, बोलण्यातून, नजरेतून त्यांना आपले अस्तित्व जाणवतं.

हेच खरं “महत्त्व” आहे जे एखाद पद, पैसा प्रतिष्ठा , प्रसिद्धी देत नाही, ते सारे काही क्षणिक असत पण एखाद्याच्या हृदयातल्या मिळालेल्या जागेतून ते आपल्याला ते महत्व मिळत...

जगासाठी आपण एक चेहरा असू,
पण त्या व्यक्तीसाठी आपण भावना, शांतता ,प्रेम. आधार आणि घर असतो.
त्यांचं “तू आलास/आलीस का?” " आज उशीर होणारे का??"
 हे विचारणं, आपल्या अस्तित्वाला अर्थ देतं.

कधी कधी, आयुष्याचं खरं समाधान असतं कोणीतरी आपल्या येण्याची वाट बघतंय..♥️
@सोनाली कुलकर्णी | स्पंदनकविता 
Follow me on Instagram @spansankavitaa 


#followers #highlight #marathistatus #मराठीलेख #fbviralpost2025シ #fbpost #स्पंदनकविता

0 comments: