आयुष्य असंच असतं...
कधी माणसांनी, भावनांनी,
आणि उबदार क्षणांनी भरलेलं,
तर कधी न सांगता, न कळता रिकामं होतं...
ती पोकळी बाहेरून कधी दिसत नाही,
पण मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात
तिचा आवाज सतत घुमत राहतो.
एखादं ठिकाण, एखादी आठवण,
कधी शांततेतही कितीतरी बोलून जाते...
काही माणसंही असतात ,रिकाम्या झुल्यासारखी…
जे कुणाच्या येण्याची वाट पाहतात,
आणि त्या प्रतीक्षेत हळूहळू
स्वतःचं अस्तित्व हरवून बसतात...
@सोनाली कुलकर्णी
0 comments: