मेथीची भाजी पुराण..


भाजी कोणती करू म्हणून विचारल्यावर नवऱ्याची फर्माईश आली ...
माझी आई करते तशी मेथीची भाजी कर ग...
Hmmm....
आई करते तशी म्हणण्यावर.....जरा मोठा pause घेऊन म्हणलं...
बरं बरं....करते...

माझी मेथीची भाजी करण्याची पद्धत एकतर पूर्वी पूर्ण वेगळी होती . एकतर मूग डाळ घालून लसूण घालून सुकी हिरव्या मिरचीची फोडणी करून भाजी किंवा मग मेथीची गरगट भाजी मी करायचे...
पण ते असत ना.... आईच्या हाताच्या चवीची सवय असते खाण्याच्या बाबतीत...तीच जरा बायकोने पण शिकली तर बरं होईल असे प्रत्येक नवऱ्याला वाटत असत..
काय करणारं बायकाना शिकावं लावत ...s
बर्याचदा मेथीची भाजी आई कश्या करतात ते पाहील होत मी त्यामुळे...मला आईसारखी भाजी करायला जमेल यात मला शंका नव्हती..आई मेथीची गोळा भाजी बनवतात ,जी अजीबात कोरडी लागत नाही ,डब्याला नेहली तरी खायला एकदम खमंग लागते.

बरं आता तुम्हाला पण रेसिपी सांगुनच टाकते...
सासूबाई कशी बनवतात मेथीची गोळा भाजी...

1मेथीची पेंडी निवडून ,स्वच्छ धुवून घेऊन नंतर ती बारीक चिरून घेऊन..
कढई मध्ये एक चमचा तेल टाकून तेलात चांगली mix करून घ्यायची परतून घ्यायची.. एक मिनिटभर झाकण टाकून भरपूर वाटणारी मेथी वाफेने कमी होते...
मग त्यात थोडस पाणी घालून 2 मिन वाफ द्यायची.
• 2 मिन मेथी शिजली की त्यात .... 2 छोटी आमसूल ,चवीनुसार लाल मिरची पावडर (साधारण दीड चमचा) आणि मीठ चवीनुसार घालायचं....(बाकी कोणताच मसाला नाही घालायचा)

• अगदी थोडेसे पाणी घालून मेथी अजून शिजवून  घ्यायची..

•आता सगळ्यात मोठा twist म्हणजे ह्या भाजीला..
पाव वाटी  शिजवलेली तूरडाळ लागते...
(मेथीची भाजी बनवण्याचा घाट घालण्या अगोदरच कुकरमध्ये तूर डाळ शिजून घ्यावी लागते.....🤣 )

• झालं तिखट मीठ घालून मेथी चांगली शिजली की त्यात ही शिजवलेली तुरडाळ घालायची.
तूरडाळ चांगली घोटून भाजीत एकजीव करून घ्यायची..
परत थोडस पाणी घालून अशी शिजवायची की त्यात थोडस बेसन पीठ घालत की त्याचा गोळा व्हायला हवा...
बऱ्यापैकी पाणी भाजीतले आटले की त्यात 4 चमचे बेसन पीठ घालायचे.आणि पुन्हा बेसन शिजेपर्यंत 2–3 min भाजीला वाफ द्यायची. भाजीचा केला तर मस्त असा गोळा तयार होईल.

झालं भाजी तयार तर झालीय पण तिला आता खमंग बनायचे ...
खमंग बनवण्यासाठी ....
३चमचे तरी तेल घ्यायचं..गरम झाले की त्यात मोहरी ,किंचित जिरे ,हिंग हळद घालायची...आणि त्यानंतर किमान 2 तरी ब्याडगी मिरची फोडणीत घालून खमंग फोडणी करायची.

आणि ही गरम गरम फोडणी लगेच तयार झालेल्या भाजीवर वरून घालायची. छान mix करून गुपचूप जेवताना खावून घ्यायची.

आणि हो सगळ्यात महत्वाचे म्हणजे...
ही अशी भाजी करण्यासाठी तसा वेळ लागतो
तरीही...
नवऱ्याने आई करते तशी कर मेथीभाजी म्हणलं की बीनबोबाटा लवकर उठून करायची.🤣
लवकर होण्यासाठी कुकर मध्ये करायची नाही...कुकर मधे सेम पद्धतीनं भाजी बनवली तरी त्या भाजीची चव वेगळी लागते.. आणि अशी कढई मध्ये वेळ घेऊन केलेल्या भाजीची चव अफलातून लागते.
मेथीमध्ये शिजवलेली तूरडाळ आणि बेसन हे एकत्रीकरण चांगलच लागत.फक्त ही भाजी करताना आमसूल घालायला विसरू नये.... आमसुलने थोडीशी आंबट चव भारी लागते.त्याशिवाय
Byadagi मिरचीची फोडणी खरंच खूप खमंग लागते...

Hmm.. आज म्हणलं मांडाव मेथीभाजीच माझं पुराण तुमच्याकडेही😆
रेसिपी आवडली असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा...तुम्ही अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवता.
आज बनवलीय मेथीची अशीच भाजी...😍
@सोनाली कुलकर्णी

#मेथीचीभाजीपुराण #follwers #exlporepage





0 comments: